सोयाबीनमध्ये तेजीचाच कल

चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचा दर ४००० ते ४३०० दरम्यान मिळतो आहे. त्यामुळे सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे.
soybean
soybean

अकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू असताना बाजार समित्यांमध्ये आवकही वाढत आहे. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचा दर ४००० ते ४३०० दरम्यान मिळतो आहे. त्यामुळे सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. 

यंदा सप्टेंबरमधील पाऊस तसेच आताच्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. मळणीच्या काळातील पावसाने सोयाबीन डागी झाले. मालाचा दर्जासुद्धा काही प्रमाणात खालावला. अशा स्थितीत चांगल्या प्रतीचे सोयाबीन खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये चुरस दिसून येत आहे. या भागातील बाजार समित्यांमध्ये दररोज सोयाबीनच्या दरात वाढ दिसून येत आहे.

यंदाच्या मोसमात १२ ऑक्टोबरला वाशीम बाजार समितीत उच्चांकी ४३११ रुपये दर मिळाला होता. त्यानंतर वाढीव दराचा ट्रेंड बाजारात टिकून आहे. आता आवक सातत्याने वाढत असली तरी दर फारसे कमी झालेले नाहीत. शनिवारी (ता.२४) वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ३६०० ते ४३५१ दरम्यान विक्री झाले. सुमारे साडेसात हजार पोत्यांची आवक झाली होती. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची जवळपास एवढीच आवक होती. येथे सोयाबीन ३३०० ते ४१५० रुपयांदरम्यान विक्री झाले. सरासरी ३९०० रुपये दर मिळाला. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी सोयाबीनची २७४० क्विंटल आवक होती. येथे सोयाबीन ३००० ते ४२६० रुपये दर मिळाला.

सध्या सोयाबीन काढणी वेगाने सुरु झालेली आहे. परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यात या भागात धुमाकूळ घातल्यानंतर आता पाऊस सर्वत्र ओसरला आहे. यामुळे सोयाबीन मळणीचे काम वेगाने सुरु झाले. मळणीनंतर जागोजागी सोयाबीन चुकविण्याचेही कामही केले जात आहे. आणखी आठवडाभर हा हंगाम जोमात राहणार आहे. 

दरवाढीची शक्यता शेतीमाल बाजार विश्‍लेषक श्रीकांत कुवळेकर म्हणाले, की मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात सात ते पंचवीस टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे अंदाज येत आहेत. तर बाजारातील आवकदेखील मागील वर्षाच्या तुलनेत २०-२५ टक्के कमीच आहे. दर्जानुसार ४,४५० रुपये क्विंटलचा भाव मिळाल्याची माहिती आहे. तर जागतिक बाजारात देखील पुढील सहा महिन्यांतील सोयाबीन पुरवठ्यावर ला-निना या हवामान संकटामुळे प्रश्न चिन्ह निर्माण झाल्यामुळे सोयाबीन अनेक वर्षाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. चीनच्या खाद्यतेल क्षेत्रातील मागणी-पुरवठा असंतुलनामुळे मागणी वाढतीच राहण्याची अनुमाने आहेत. त्यामुळे चॉइस ब्रोकिंग आणि इतर काही दलाल कंपन्यांनी सोयाबीनमध्ये येत्या काही महिन्यांत ८-१० टक्के तेजीची शक्यता वर्तवली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com