सोलापुरात गाजर, काकडीला उठाव

सोलापुरात गाजर, काकडीला उठाव
सोलापुरात गाजर, काकडीला उठाव

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडीला उठाव मिळाला. त्यांची आवक ही तशी बऱ्यापैकी होती. पण, मागणीतील सातत्यामुळे त्यांचे दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजराची आवक प्रतिदिन २०० ते ३०० क्विंटलपर्यंत आणि काकडीची आवक प्रतिदिन २० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. त्यांची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. पण, त्यांना चांगली मागणी असल्यामुळे त्यांचे दर टिकून राहिले. गाजराला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये आणि काकडीला किमान ३०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. संपूर्ण सप्ताहभर किरकोळ चढ-उतार वगळता दर काहीसे स्थिर आणि टिकून राहिले. त्याशिवाय फळभाज्यांमध्ये गवार, भेंडीला या सप्ताहात पुन्हा चांगली मागणी राहिली. त्यामुळे दरही तसेच तेजीत राहिले. गवार आणि भेंडीची आवक प्रत्येकी १० ते २० क्विंटलपर्यंत अगदी जेमतेम राहिली. गवारीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये तर भेंडीला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरव्या मिरचीलाही या सप्ताहात मागणी राहिली. हिरव्या मिरचीची आवक मात्र खूपच कमी ८ ते १० क्विंटलपर्यंत राहिली. हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.  कांद्याच्या दरात या सप्ताहात काहीसा चढ-उतार झाला. कांद्याची आवक प्रतिदिन १०० ते २०० गाड्यापर्यंत राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com