पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार ४०० क्विंटल आवक

पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणि खबरदारीनंतर रविवारी (ता. ५) गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात ४७८ लहान मोठ्या वाहनांमधून भाजीपाल्याची सुमारे ९ हजार ४०० क्विंटल आवक झाली होती.
Pune Bazar Samiti in 9 thousand 400 quintals of vegetables Incoming

तसेच मोशी आणि मांजरी उपबाजारात अनुक्रमे २१६ आणि १६० वाहनांमधून ५ हजार ७०० आणि १ हजार ९३० अशी एकूण ८५४ वाहनांमधून १७ हजार ३० क्विंटलची आवक झाली होती, अशी माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. 

गेल्या आठवड्यापासून चक्राकार पद्धतीने भाजीपाला आणि फळांचा विभाग दिवसाआड सुरू असून, ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची शिस्त बाजार घटकांनी लागल्यामुळे बाजार सुरळीत सुरू आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com