नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक टिकून

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक ४२७५ क्विंटल झाली. मागणी वाढल्याने दरांत सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळाले.
Pomegranate prices rise in Nashik
Pomegranate prices rise in Nashik

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक ४२७५ क्विंटल झाली. मागणी वाढल्याने दरांत सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळाले. सध्या मालाच्या प्रतवारीनुसार दर मिळत आहेत. मृदुला वाणास ५०० ते १२५०० तर सरासरी ८५०० रुपये दर मिळाला. सरासरी दरात क्विंटलमागे २५०० हजार रुपयांनी वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक सर्वसाधारण राहिली. आवक २०२५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते २८५२ तर सरासरी दर १९५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ३६०९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ११०० ते २२००, तर सरासरी दर १५०० रुपये राहिला. लसणाची आवक २२० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते १००००, तर सरासरी दर ८५०० रुपये राहिला. काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाली.

घेवड्याला प्रतिक्विंटल २००० ते ४०००, तर सरासरी दर ३२५० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक ३५६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० तर सरासरी दर  ३००० रुपये राहिला. गाजराची आवक ३९३५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ३२०० तर सरासरी दर २५०० रुपये राहिला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते ९००, तर सरासरी ६००, वांगी ३०० ते ४२५, तर सरासरी ३७५ व फ्लॉवर १०० ते ३५० सरासरी २५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ८० ते २०० तर सरासरी ६० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ५०० ते ७०० तर सरासरी दर ६०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते ३२५, तर सरासरी २००, कारले १०० ते ३५० तर सरासरी २५०, गिलके १७० ते ३००, तर सरासरी २३५ व दोडका २४० ते ४५०, तर सरासरी दर ३५० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ८९० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १५०० तर सरासरी दर १२५० रुपये मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com