नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट; दरात वाढ

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट; दरात वाढ
नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट; दरात वाढ

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या तुलनेत लसणाच्या आवकेत घट झाली. दरांत वाढ झाली आहे. आवक ११२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५००० ते २२५०० असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक ७७८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५५० ते ५५०० दर मिळाला. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. बटाट्याची आवक ९८९० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २३०० दर होते. अद्रकाची आवक १४८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ६००० दर मिळाला. 

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ६१६४ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १६०० दर मिळाला. घेवड्याला प्रतिक्विंटल २२०० ते ३५०० दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ७७० क्विंटल झाली. मागणी कमी असल्याने दर कमी होते. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १६०० ते २५००, तर ज्वाला मिरचीला प्रतिक्विंटल १५०० ते २००० दर मिळाला. वाटण्याची आवक १९७० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २३०० ते ३१०० दर मिळाला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ४१०, वांगी १५० ते २५०, फ्लॉवर १२० ते २१० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. कोबीला ६० ते १०५ असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची २१० ते ३५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा १७०  ते २५०,  कारले १५० ते ३५०,  गिलके १७० ते ३५०, भेंडी ३०० ते ४८० असे प्रति १२ किलोस दर मिळाले, तर काकडीला ३०० ते ६००, लिंबू  १२० ते २५०, दोडका ४०० ते ६०० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १०० ते १५५०, मेथी २५० ते ११००, शेपू ३०० ते ११००, कांदापात १८०० ते ४६००, पालक १५० ते ३००, तर पुदिन्याला १३० ते २१० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले. 

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबांची आवक २६१० क्विंटल झाली. दर स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ३०० ते ३१०० व मृदुला वाणास प्रतिक्विंटल ४०० ते ६००० दर मिळाला. केळीची आवक ५०० क्विंटल झाली. तिला ६०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला. पपईची आवक १७० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल९०० ते १८०० दर मिळाला. बोरांची आवक ८९५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १८०० दर मिळाला. नारळांची आवक ९३९ क्विंटल झाली. त्यास २३०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. संत्र्यांची आवक १५४० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १७०० ते ३३०० दर मिळाला. मोसंबीची आवक १४४ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल २२०० ते ३३०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com