कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर चढे 

ढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी मागणी होती. मात्र विकेंड लॉकडाउनमधील बाजार बंदमुळे बाजारात हापूस आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध न झाल्याने दरात वाढ झाली होती. परिणामी ग्राहकांना यंदाच्या सणाला आंब्याची चव चाखता आली नाही.
कोरोना संकटामुळे हापूसची  आवक कमी, दर चढे Hapus due to corona crisis The lower the income, the higher the rate
कोरोना संकटामुळे हापूसची  आवक कमी, दर चढे Hapus due to corona crisis The lower the income, the higher the rate

पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी मागणी होती. मात्र विकेंड लॉकडाउनमधील बाजार बंदमुळे बाजारात हापूस आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध न झाल्याने दरात वाढ झाली होती. परिणामी ग्राहकांना यंदाच्या सणाला आंब्याची चव चाखता आली नाही. त्यामुळे आता ग्राहकांना अक्षय्यतृतीयेची वाट बघावी लागणार आहे. 

कोरोना टाळेबंदीचा फटका या वर्षी देखील बसत असून, आंब्याच्या आवक आणि विक्रीवर परिणाम झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात आंब्याची मागणी असते. मात्र शनिवार, रविवार सलग दोन दिवस बाजार समिती बंद राहिल्याने आवक कमी झाली होती. सोमवारी (ता.१२) कोकणातून कच्च्या आंब्याची सुमारे ३ हजार पेट्याची आवक झाली.

मात्र ही आवक दुपारपर्यंत होत होती. बाजारात तयार आंबा अत्यल्प उपलब्ध होता. त्यामुळे घाऊक बाजारात पेटीचे, तर किरकोळ बाजारात डझनाचे दर अधिक होते. हे दर अनेकांना परवडणारे नाहीत. आवक जोपर्यंत वाढणार नाही, तोपर्यंत दर चढेच राहतील, असा अंदाज आंब्याचे व्यापारी मोरे यांनी व्यक्त केला. 

प्रतिक्रिया कोरोनाची भीती, त्यातच दोन दिवस बाजार बंद, मुंबईतून वाढणारी मागणी यामुळे पुण्यातील आंब्याची आवक कमी झाली. परिणामी एक ते दीड हजार रुपये डझनप्रमाणे नागरिकांना आंबा खरेदी करावा लागत आहे. गेल्या वर्षी ५०० ते ७०० रुपये डझन आंब्याचे भाव होते.  - युवराज काची, आंब्याचे व्यापारी, पुणे 

दर्जानुसार घाऊक बाजारातील हापूसचे दर 

  • तयार ४ ते १० डझन ३ ते ६ हजार 
  • तयार १ डझन ८०० ते १५०० रुपये 
  • कच्चा ५ ते १० डझन २.५ ते ५ हजार 
  • कच्चा ४ ते ७ डझन २ ते ३.५ हजार 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com