जळगावात गवार २५०० ते ४००० रुपये

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१५) गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २२०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
 Guar in Jalgaon 2500 to 4000 rupees
Guar in Jalgaon 2500 to 4000 rupees

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१५)  गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २२०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.

बाजारात मंगळवारी आल्याची २१ क्विंटल आवक झाली. दर ३४०० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. भेंडीची २१ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये दर होता.  हिरव्या मिरचीची २१ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १२०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची ९ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल २००० ते ३८०० रुपये दर मिळाला. 

बीटची सहा क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर होता. काशीफळांची २४ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपये दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २६०० ते ३८०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची १५ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १६००ते २४०० रुपये दर होता. शेवगा शेंगांची तीन क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. 

कोबी १८५० ते २८५० रूपये

कोबीची १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८५० ते २८५० रुपये असा होता. भोपळ्यांची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २०० रुपये दर मिळाला. दोडक्‍यांची ११ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १४०० ते २४०० रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २८०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com