राज्यात गवार प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये

गवार
गवार

पुण्यात प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.९) गवाराची सुमारे ७ टेम्पाे आवक झाली. या वेळी गवारीस ३००० ते ५००० रुपये दर हाेता. गवारीची आवक प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून हाेत आहे. आवक तुलनेने कमी असून, दर तेजीत असल्याचे आडत्यांनी सांगितले. बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

दिनांक      आवक      किमान     कमाल 
९ नोव्हेंबर    ९८  ३०००     ५०००
८ नोव्हेंबर   २४५     ३०००     ५०००
७ नोव्हेंबर  ९४     २५००     ५०००
६ नोव्हेंबर २१६     ३०००     ५००० 
५ नोव्हेंबर  २६५     २५००     ५०००

   औरंगाबादेत प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये  औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) गवारची १३ क्‍विंटल आवक झाली. या गवारला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. गत महिनाभरातील गुरुवारच्या दराचा आढावा घेता गवारचे दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले.  बाजार समितीमध्ये ५ ऑक्‍टोबरला १४ क्‍विंटल आवक होऊन ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १२ ऑक्‍टोबरला आवक ९ क्‍विंटल तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १९ ऑक्‍टोबरला २ क्‍विंटल आवक होऊन ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६ ऑक्‍टोबरला १० क्‍विंटल आवक तर दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १ नोव्हेंबरला १० क्‍विंटल आवक होऊन ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ नोव्हेंबरला १४ क्‍विंटल आवक तर दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६ नोव्हेंबरला १५ क्‍विंटल आवक झाली होती, तर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ नोव्हेंबरला २५ क्‍विंटल आवक तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८ नोव्हेंबरला ११ क्‍विंटल आवक होऊन ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  मुंबईत प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गवारीची आवक वाढली असून दर प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपयांपर्यंत आहे. मागील महिनाभरात आवक वाढली असून दरदेखील वाढले आहेत. सध्या बाजार समितीत ५५ गाड्या आवक होत आहे. महिनाभरात आवक आणखी वाढेल, असे व्यापारी प्रशांत जगताप यांनी सांगितले. गवारीची आवक वाढल्याने दादर मार्केटमधे गावरान गवारीचे दहा किलोचे दर ८०० रुपये आहेत. साधी गवार ४०० रुपये प्रतिदहा किलो असून स्थानिक बाजारात ग्राहकांना गवार १०० रुपये प्रतिकिलो इतक्या दराने विक्री होत आहे असे स्थानिक व्यापारी सोमनाथ पवळे यांनी सांगितले.  बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

दिनांक      आवक      किमान     कमाल     सरासरी
८ नोव्हेंबर  १७५     २५००     ३०००     २७५०
१ नोव्हेंबर  ६२७     २४००     २८००     २६००
२५ ऑक्टोंबर   १७४     २५००     ३५००     ३०००
१८ ऑक्टोंबर   १६६     ३६००     ४२००     ३९००
११ ऑक्टोंबर  ३१०      ३००० ३६००     ३३००

  परभणीत प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये परभणी: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ९) गवारीची १५ क्विंटल आवक होती. गवारीला ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथे स्थानिक परिसरातून गवारीची आवक येत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ७ ते १५ क्विंटल आवक झाली. सरासरी २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गुरुवारी (ता.९) १५ क्विंटल आवक झाली होती. घाऊक विक्रीचे दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल होते तर किरकोळ विक्री ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंट/रुपये)

तारिख     आवक     किमान     कमाल
१९ आॅक्टोबर ५     २५००     ३५००
२६ आॅक्टोबर १०     २५००     ३५००
२ नोव्हेंबर  ८     ३०००        ३५००
९ नोव्हेंबर १५     ३५००     ४०००

जळगावात प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारची अतिशय कमी आवक होत आहे. तीस गुरुवारी (ता.९) २००० ते ३२०० व सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे. त्यामुळे दर चढेच असल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.   आवक जामनेर, पाचोरा येथून होत आहे. महिनाभरापासून किरकोळ आवक होत असल्याने दर चढेच आहेत. १९ ऑक्‍टोबर रोजी लक्ष्मीपूजन होते, त्यामुळे १९ ऑक्‍टोबरला कुठलीही आवक बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये झाली नाही. नंतर आवक सुरू झाली, पण ती जेमतेम होती. महिनाभरात प्रतिदिन सरासरी चार क्विंटल गवारची आवक झाली आहे. परतीच्या पावसात गवारचे पीक अनेक ठिकाणी खराब झाले. ते शेतकऱ्यांनी काढून क्षेत्र रिकामे केले. यामुळे आवकेवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.  बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

तारीख     आवक     किमान     कमाल     सरासरी
९ नोव्हेंबर  ०३     २०००     ३२००     २५००
२ नोव्हेंबर ०४     १५००     ३०००     २१००
२६ ऑक्‍टोबर ०५     २०००     ४०००     ३०००

साताऱ्यात प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.९) गवारीची सात क्विंटल आवक झाली. गवारीस क्विंटलला ३५०० ते ४००० रुपये असा दर मिळाला होता. गत महिन्यापासून गवारीस क्विंटलला ३००० ते ४५०० रुपयांदरम्यान दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कोरेगाव, खटाव, फलटण, सातारा तालुक्‍यातून गवारीची आवक होत आहे. १५ ऑक्‍टोबरला गवारीची नऊ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ३५०० ते ४००० रुपये असा दर मिळाला. १२ ऑक्‍टोबरला सहा क्विंटल आवक होऊन क्विंटलला ३००० ते ४००० रुपये असा दर मिळाला होता. तर २ नोव्हेंबरला ११ क्विंटल आवक होऊन ३००० ते ४००० रुपये क्विंटलला दर मिळाला होता. गवारीची किरकोळ विक्री ५० ते ७० रुपये प्रतिकिलो प्रमाणे केली जात आहे.  कोल्हापुरात प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपये कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीत गवारीस प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपये दर मिळाला. गवारीची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक झाली. परतीचा पावसामुळे वाढलेले गवारीचे दर अद्यापही कायम असल्याची माहिती बाजारसमितीच्या सूत्रांनी दिली. बाजारसमितीत गवारीच्या आवकेत गेल्या आठ दिवसांपासून वाढ होत आहे. परंतु मागणी कायम असल्याने गवारीचा दर तेजीत टिकून असल्याचे बाजारसमितीतून सांगण्यात आले. 

बाजार समितीतील आवक व दर (दहा किलोस/रुपये)

दिनांक     आवक     किमान     कमाल 
८ नोव्हेंबर  ४५७     २००     ४५०
१ नोव्हेंबर  ३२२      २२०     ४००

अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते २८०० रुपये अकोला  ः गवारच्या शेंगांना येथील बाजारात सध्या प्रतिक्विंटल २००० ते २८०० रुपये दरम्यान दर मिळत अाहेत. गवारची अावक सध्या मंदावली असून दरही स्थिर झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अकोला बाजारात दररोज गवारची पाच ते अाठ किंटलदरम्यान अावक होत अाहे. दहा किलो गवारीस २०० ते २८० रुपये याप्रमाणे विकत अाहे. पितृपक्षात गवारचे दर वाढले होते. त्यानंतर हे दर कमी होऊन सध्या सरासरी २२ रुपये किलो प्रमाणे विकत अाहे. किरकोळ बाजारात गवार ५० ते ६० रुपये किलोने ग्राहकांना सर्रास विकली जात अाहे. अकोला तसेच वाशीम जिल्ह्यातून गवारची प्रामुख्याने अावक होत अाहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com