नागपूरात मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर स्थिर

मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर स्थिर
मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर स्थिर

नागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून जेमतेम आवक असलेल्या मुगाच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात ३९०० ते ४१०० रुपये क्‍विंटल असलेल्या मुगाचे दर ४००० ते ४३०० रुपये क्‍विंटलवर पोचले. मुगाची आवक ३ ते १९ क्‍विंटल अशी आहे.

बाजारात तुरीची आवक ३५० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. गेल्या आठवड्यात तूर ३४५० ते ३७३० रुपये क्‍विंटल होती. या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होत हे दर ३४०० ते ३७१५ रुपये क्‍विंटलवर आले. तुरीची आवकदेखील घटल्याचे सांगण्यात आले. आठवड्यात तुरीची आवक ३५० वरून २५० क्‍विंटलवर पोचली. ३००० ते ३२७४ रुपये क्‍विंटल हरभरा दर होते. या आठवड्यात हे दर ३००० ते ३३३५ रुपयांवर पोचले. हरभरा दरात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली. ९०० ते १००० क्‍विंटल अशी हरभऱ्याची आवक आहे.

लुचई तांदूळ २२०० ते २५०० रुपयांवर गेल्या पंधरवड्यापासून स्थिर असून आवक २५ ते ३० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. उडदाची ६ क्‍विंटलची आवक होत दर ३८००  ते ४००० रुपये क्‍विंटल राहिले. बाजारात जवसाचीदेखील आवक होत असून ती ६ ते ८ क्‍विंटलच्या घरात आहे. जवसाचे व्यवहार ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटलने झाले. सोयाबीनची बाजारातील नियमित आवक आहे. सोयाबीनची कधी १००, तर कधी ५०० क्‍विंटलची आवक नोंदविली जाते. ३००० ते ३३७५ रुपये क्‍विंटल असलेले सोयाबीन या आठवड्यात ३२०० ते ३४५२ रुपये क्‍विंटलवर पोचले.

मोसंबीची नियमित आवक कळमणा बाजार समितीत मोसंबीची आवक नियमित आहे. मोसंबीच्या मोठ्या आकाराचे फळाचे दर ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलवर स्थिर आहेत. मध्यम आकाराच्या फळाचे दर २४०० ते २८०० रुपये, तर लहान आकाराच्या फळांना १२०० ते १४०० रुपये क्‍विंटलचा दर होता. बाजारात डाळिंबाचे व्यवहार २००० ते ६००० रुपये क्‍विंटलने होत आहेत. डाळिंबाची आवक ५०० ते ५५० क्‍विंटलची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com