राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला बाजारात गुरुवारी (ता.३) लसणाचे दर प्रतिक्विंटल ५००० ते ६५०० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
Garlic in the state rate Rs. 3500 to 12000
Garlic in the state rate Rs. 3500 to 12000

परभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये

परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला बाजारात गुरुवारी (ता.३) लसणाचे दर प्रतिक्विंटल ५००० ते ६५०० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

मध्य प्रदेशातून येथील मार्केटमध्ये आठवड्यातील दर मंगळवारी आणि शनिवारी लसणाची आवक होत असते. गेल्या महिन्याभरात या दोन दिवशी २० ते ४८ टन (२०० ते ४८० क्विंटल) लसणाची आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल ४००० ते ६५०० रुपये दर मिळाले. 

मंगळवारी (ता.१) लसणाची २०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५००० ते ६५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.३) किरकोळ विक्री प्रतिकिलो ८० ते १०० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी सुरेश गव्हाणे यांनी सांगितले.

सोलापुरात क्विंटलला ४००० ते ८५०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लसणाची आवक वाढली. पण मागणी असल्याने दरही वधारलेलेच राहिले. लसणाला प्रतिक्विंटलला किमान ४००० रुपये, सरासरी ६००० रुपये आणि सर्वाधिक ८५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लसणाची आवक रोज १०० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. कधी रोज तर कधी एक दिवसाआड अशी आवक राहिली. जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातूनही आवक झाली. पण तुलनेने बाहेरील आवकच जास्त राहिली. पण मागणी असल्याने दरात तेजी राहिली. 

या आधीच्या सप्ताहातही आवकेचे प्रमाण असेच राहिले. प्रतिदिन ८० ते १५० क्विंटलपर्यंत राहिले. लसणाला प्रतिक्विंटलला किमान ३८०० रुपये, सरासरी ५५०० रुपये आणि सर्वाधिक ८२०० रुपये असा दर मिळाला. पण, किरकोळ चढ-उतार वगळता दरातील तेजी या सप्ताहात पुन्हा टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

पुण्यात क्विंटलला ४००० ते ९००० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३) लसणाची सुमारे ५ ट्रक आवक झाली होती. यावेळी दहा किलोला ४०० ते ९०० रुपये दर होता. लसणाची प्रामुख्याने आवक ही मध्यप्रदेश आणि गुजरात येथून होत आहे.

आवक आणि मागणी संतुलित असल्याने दर देखील सरासरी होते. गेल्या आठवड्यातील आवक,  मागणी आणि दर सरासरी होते. परिणामी, दरात विशेष कोणतेही चढउतार झाले नव्हते. परिणामी दर स्थिर होते.

नाशिकमध्ये क्विंटलला सरासरी ८५०० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२) लसणाची आवक १३३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६७०० ते १२५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ८५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवारी (ता.१) लसणाची आवक २२ क्विंटल झाली. त्यास ५५०० ते ११००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ८२०० रुपये राहिला. सोमवारी (ता.३१) लसणाची आवक ५२ क्विंटल झाली. त्यास ७००० ते १२५०० रुपये, तर सर्वसाधारण दर ९२०० रुपये राहिला.

शनिवारी (ता.२९) लसणाची आवक ५२ क्विंटल झाली. त्यास ७२०० ते ११००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९००० रुपये राहिला. शुक्रवारी (ता.२८) आवक ६० क्विंटल झाली. त्या वेळी ७००० ते १२००० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५०० रुपये राहिला. गुरुवारी (ता.२७) लसणाची आवक ३१ क्विंटल झाली. त्या वेळी ६५०० ते १२००० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ८१०० रुपये राहिला.

आठवड्यापासून लसणाच्या आवकेत चढ-उतार सुरू आहे. उठाव झाल्यानुसार दर निघत आहेत. प्रतिक्विंटल ९५०० रुपयांची सरासरी दराचा उच्चांक शुक्रवारी (ता.२८) नोंदवला गेला.

नांदेडमध्ये क्विंटलला ३५०० ते ६५०० रुपये

नांदेड : शहराजवळील बोंडार मार्केटमध्ये सध्या लसणाची आवक दहा टन होत आहे. या लसणाला ३५०० ते६५०० रुपये दर मिळत असल्याची माहिती ठोक व्यापाऱ्याने दिली.

बोंडार मार्केटमध्ये आठवड्यातून रविवारी व गुरुवारी कांदा, लसूण, आले व बटाट्याची आवक होते. या बाजारात सध्या गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह स्थानिक शेतकऱ्यांचा लसूण बाजारात येत आहे. बुधवारी (ता. २) बाजारात दहा टन लसणाची आवक झाली. यात गुजरातच्या लसणाला सहा हजार ते साडेसहा दर मिळाला. तर इतर लसणाला साडेतीन ते चार हजार रुपये भाव मिळाला. या बाजारात सध्या  सरासरी साडेतीन ते साडेसहा हजार रुपये दर लसणाला मिळत असल्याचे ठोक व्यापारी मोहमंद युनूस यांनी सांगितले.

जळगावात क्विंटलला ८००० ते ११००० रुपये

जळगाव  ः जिल्ह्यात लसणाचे उत्पादन अपवाद वगळता घेतले जात नाही. आवक मध्य प्रदेशातून होते. बाजार समितीत दर शनिवारी लसणाची आवक होते. गेल्या शनिवारी (ता.२९) ३२ क्विंटल आवक झाली. दर आठ हजार ते ११ हजार व किमान ९५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाले. 

कोविडमुळे लिलाव प्रक्रिया रखडत सुरू आहे. यामुळे लसणाची आवकही गेल्या महिन्यात हवी तशी झाली नाही. आवक या  महिन्यात सुरळीत होऊ शकते. कारण बाजार समित्या सकाळी सहा ते सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहेत. 

आवक रखडत झाली, तरी दर मात्र स्थिर राहीले आहेत. काही अडतदार, व्यापारी लसणाची मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून मागणी करून घेत आहेत. जळगावच्या बाजारातून जिल्हाभरात लसणाचा किरकोळ व्यापाऱ्यांना पुरवठा केला जातो. हा पुरवठा सुरळीत असल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला ६००० ते १२००० रुपये

औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३) लसणाची ११० क्विंटल आवक झाली. त्याला ६००० ते १२००० दरम्यान, तर सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २३ मे रोजी लसणाची ३७ क्विंटल आवक झाली. या लसणाला ६ हजार ते १२ हजार, तर सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

त्यानंतर १ जून रोजी ७२ क्विंटल आवक झालेल्या लसणाला ४५०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लसणाचे सरासरी दर ७ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com