दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर

दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर
दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची घटलेली आवक गेल्या एक महिन्यापासून स्थिर आहे. बटाटा, हिरवी मिरची, गवार, मटार यांची आवक घटल्याने दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांच्या दरातदेखील वाढ झाली होती.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून सुमारे ८ ट्रक मटार आणि १० ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक कोबी आणि मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ६ हजार गोणी तर बंगलोर येथून आले २ टेम्पो आवक झाली होती. तर शिवरात्रीनिमित्त कर्नाटक आणि स्थानिक सुमारे ३० ट्रक रताळ्याची आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० गोणी, टॉमेटोे सुमारे ५ हजार क्रेट, कोबी ५ तर फ्लॉवर सुमारे १० टेम्पो, ढोबळी मिरची ८ टेम्पो, हिरवी मिरची ३ टेम्पो, भुईमूग शेंग ४० पोती आणि शेवगा ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, तर कांदा नवीन सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची ४० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  कांदा - ४५-५५, बटाटा : ९०-१४०, लसूण : १५०-३५० आले : सातारी ६५०-७००, बंगलोर  -६००-६५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान -६००-८००, टोमॅटो : १४०-१६०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ४००-६००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : ३००-३५०, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी- ३५०-४०० पांढरी २५०- ३००, पापडी : २००-२५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर :१००-१२०, कोबी : १००-१२०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २५०- ३००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी ३५०- ४००, जाड : २००-२२०, शेवगा : ३००-३५०, गाजर : १२०-१४०, वालवर : २५०-३००, बीट : १४०-१५०, घेवडा : ४००-५००, कोहळा : २००-२२०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ५५०-६००, पावटा : ४५०-५००, मटार : २४०- २६०, तांबडा भोपळा : ८०-१२०, चिंच अखंड - ३५०-४००, सूरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. रताळी ः कराड - २४०-२५०, कर्नाटक -१८०-२००.

फळबाजार फळबाजारात रविवारी (ता. ३) मोसंबीची जुन्या आणि नव्या बहाराची सुमारे ७० टन, संत्री ४० टन डाळिंब सुमारे २५० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे अडीच हजार गोणी, चिक्कू २ हजार ५०० बॉक्स आणि गोणी, पेरू ४०० क्रेट, कलिंगड ३० टेम्पो, खरबुज २० टेम्पो, बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, विविध जातींची बोरे अवघी ६० गोणी आवक झाली होती. तर विविध द्राक्षांची सुमारे ८० टन, स्ट्रॉबेरीची सुमारे ४ टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ३००-६००, मोसंबी : (३ डझन) : ८०-४५०, (४ डझन ) : २५-२५०, संत्रा : (३ डझन) १४०-४५०, (४ डझन) : ६०-१५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, आरक्ता १०-४० गणेश -५-२५, कलिंगड : ५-१२, खरबुज : १०-२५, पपई : ५-१५, चिक्कू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-७००, बोरे : उमराण (१० किलो) -९०-१००, चमेली (१० किलो) १८०-२२०, चण्यामण्या ४००- ४५०. द्राक्षे : जंबो (१० किलो) ४५०-७००. सुपर सोनाका - ७५०-१०००, शरद सिडलेस (१०)- ३५०-५००, ताश ए गणेश - ५००-६००, स्ट्रॉबेरी-१००-१८० (२ किलोचे पनेट).

फुलबाजार फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०,  गुलछडी : १५०-२२०, बिजली : १०-४०, कापरी : २०-४०, सुट्टा कागडा : २००-४००, मोगरा : ३००-६००, ऑस्टर : १२-२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ३०-६०, लिलिबंडल : ६-१२, जर्बेरा - १०-४०, कार्नेशियन : ४०-८०.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे ६० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ४००-८००, मेथी : ३००-७००, शेपू : ६००-७००, कांदापात : ५००-७००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-२५०, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ५००-७००, चुका : ४००-६००, चवळई : ५००-८००, पालक : ३००-४००, हरभरा गड्डी : ४००-६००.

मटण-मासळी गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीची सुमारे ३०० किलो तर नदीची सुमारे दीड टन आवक झाली होती. तसेच आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणी कमी असली तरी दर टिकून असल्याचे मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) पापलेट :  कापरी : १५००, मोठे १४००, मध्यम : १०००-११००, लहान ८००-८५० भिला : ६५०, हलवा : ६५०-७००, सुरमई : ७००-७५०, रावस-लहान : ६५०, मोठे ७५० घोळ : ६५०, करली : ३२०, करंदी (सोललेली) : ३६०, भिंग ४००, पाला : ६०० - १०००, वाम : लहान ४००- ४८०.

कोळंबी ः   लहान : २८०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स :१४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी :  ३२०, मांदेली : १००-१२०, राणीमासा : १८०, खेकडे : १८०-२००, चिंबोऱ्या : ५००-६००.

खाडीची मासळी :  सौंदाळे : २४०, खापी २००, नगली : ३२०-  ५५०, तांबोशी ४८०, पालू : ३२०, लेपा : २४०, शेवटे : २४० बांगडा : लहान १६० मोठा २४०, पेडवी : ६०, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : १८०-२००, खुबे १२०-१४०, तारली :१६०.

नदीची मासळी :  रहू:  १२०-१६०, कतला :१६०-१८०, मरळ : ३६०, शिवडा : २४०, खवली : २४०, आम्ळी : १२० खेकडे : २४०, वाम : ५२०.

मटण :   बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.

चिकन :  १५०, लेगपीस : १८०,जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.

अंडी :  गावरान : शेकडा : ७००, डझन : ९६ प्रति नग : ८ इंग्लिश : शेकडा : ४७० डझन : ६० प्रतिनग: ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com