जळगावात चवळी शेंगा प्रतिक्विंटल २८०० रुपये

चवळी शेंगा
चवळी शेंगा

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात मंगळवारी (ता. २) चवळी शेंगांची फक्त एक क्विंटल आवक झाली. तिला एकच २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  चवळी शेंगांची लागवड जिल्ह्यात फक्त जामनेर, पाचोरा, जळगाव भागात केली जाते. सध्या वातावरण थंड असल्याने चवळीच्या वाढीसह काढणीवर परिणाम झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी रब्बी चवळीचे पीक चांगले न बहरल्याने ते शेतकऱ्यांनी काढून टाकले. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, बाजारातील आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे.  बाजारात आल्याची ७५ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २४०० रुपये दर होता. वाटाण्याची ४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला. कांद्याची ७२० क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १२०० ते ३३२० रुपये दर होता. बटाट्याची २०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २७५ ते ४७५ रुपये दर मिळाला. मेथीची १३ क्विंटल आवक झाली, तीस प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर होता. टोमॅटोची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ९०० रुपये दर मिळाला. भरीताच्या वांग्यांची ३५ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपये दर होता. फूलकोबीची १८ क्विंटल आवक होऊन १५०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  भेंडीची १० क्विंटल आवक तर १२०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. बोरांची १३ क्विंटल आवक झाली तर दर प्रतिक्विंटल १००० ते १७०० रुपये होता. पेरूची दोन क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक झाली, तीस प्रतिक्विंटल ११०० ते २२०० रुपये दर मिळाला. गवारची कुठलीही आवक झाली नाही. तसेच पालक, पोकळ्याचीही जेमतेम अशीच आवक होती, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com