नाशिकला वांगी, घेवडा, ढोबळी मिरची तेजीत

वांगी
वांगी

नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात वांगी, घेवडा, ढोबळी मिरची या फळभाज्यांना तेजीचे दर मिळाले. कांद्याची आवक स्थिर असून मागील महिन्यापासून प्रतिक्विंटलला २१५० ते ३५०० व सरासरी ३००० रुपये या दरावर कांदा स्थिरावला आहे. या खेरीज भेंडी, हिरवी मिरची या भाज्यांनाही स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारातून होणारी मागणी कायम असल्याचेच चित्र दिसून आले. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, सिन्नर या भागातील अर्ली हंगामातील द्राक्षांची आवक सुरू असून या द्राक्षांना दिल्लीच्या बाजारात प्रतिकिलोला ५० ते १०० रुपये दर मिळाले.  नाशिक जिल्ह्यात गत सप्ताहात सकाळचे किमान तापमान ५ ते ७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. या स्थितीत बाजारातील फळभाज्यांची आवक घटली. परिणामी, स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून मागणी वाढली. वांग्याला हिवाळ्यात मागणी वाढते. गतसप्ताहात वांग्याची दिवसाला सरासरी १०० क्विंटलची आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० व सरासरी २६०० रुपये दर राहिले. घेवडा व हिरवी मिरचीची आवक अत्यल्प झाली. घेवड्याची आवक अवघी १५ क्विंटल झाली. घेवड्याला प्रति क्विंटलला २५०० ते ५००० व सरासरी ३५०० दर मिळाले. हिरव्या मिरचीची आवक तर घेवड्याहून कमी म्हणजे अवघी ८ क्विंटलच्या आसपास होती. हिरव्या मिरचीला क्विंटलला २५०० ते ४१०० व सरासरी ३५०० असे दर मिळाले.  ढोबळी मिरचीची आवक जास्त असून मागणी असल्याने दरही चांगले मिळत आहे. गतसप्ताहात ढोबळीची १०० ते १२० क्विंटलची आवक होती. या मिरचीला २५०० ते ४५०० व सरासरी ३५०० असे तेजीचे दर मिळाले. या वेळी भेंडीची आवक ५० क्विंटल होती. भेंडीचे दर प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० व सरासरी ३७०० असे होते.  द्राक्षांना मागणी वाढली  नाशिक कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागातील अर्लीचा द्राक्ष हंगाम ८० टक्के आटोपला आहे. नाशिक भागात आता सिन्नर व चांदवड भागातील द्राक्षांचे खुडे सुरू झाले आहेत. हा माल रशियाला निर्यात होतो. यातील बहुतांश द्राक्ष माल दिल्लीच्या बाजारात पाठविला जातो. गत सप्ताहात देशांतर्गत बाजारात द्राक्षांना ५० ते ७० व सरासरी ६० रुपये दर मिळाले. यावेळी निर्यातक्षम द्राक्षांना ६० ते १०० व सरासरी ८० रुपये दर मिळाले. नाशिक भागातील कांद्याची मागणी टिकून आहे. गत सप्ताहात कांद्याला प्रतिक्विंटलला २१०० ते ३५०० व सरासरी ३००० रुपये दर मिळाले. येत्या सप्ताहात हे दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com