सांगलीत गुळाची आवक वाढली

गुळ
गुळ

सांगली ः येथील बाजार समितीत गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात ४५७ क्विंटलने गुळाची आवक अधिक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ३५६७ ते ४३६५ रुपये, तर सरासरी ३९६६ असा दर मिळाला. चालू सप्ताहात गुळाच्या दरात तेजी राहिली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. हळदीची आवक गतसप्ताहापेक्षा ३० क्विंटलने वाढली आहे. राजापुरी हळदीची ६७ क्विंटल आवक झाली होती. तीस प्रतिक्विंटल ६१६७ ते ९००० रुपये दर मिळाला. परपेठी हळदीची ६८ क्विंटल आवक झाली होती. या हळदीस ५९०० ते ७७५० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळ दुय्यम बाजार आवारात कांद्याची १०९४८ क्विंटल झाली होती. कांद्यास ५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. बटाट्याची ५६३७ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात लसणाची आवक सरासरी १०० क्विंटलने कमी झाली आहे. चालू सप्ताहात २३३ क्विंटल आवक झाली होती. त्यास ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता. सफरचंदाच्या आवकेत गतसप्ताहापेक्षा १०० पेट्यांनी वाढ झाली आहे. चालू सप्ताहात सफरचंदाची १०५८१ पेट्यांची आवक झाली होती. सफरचंदास ८०० ते २००० रुपये प्रतिपेटीस दर होता. आल्याची आवक वाढली होती, १७ क्विंटल आवक होऊन त्यास १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. संत्र्यांची ११५० डझन आवक झाली होती. त्यास २०० ते ३०० रुपये प्रतिदहा किलोस असा दर मिळाला होता. गतसप्ताहापेक्षा डाळिंबाची आवक २००० डझनांनी वाढली आहे. चालू सप्ताहात ४३६५८ डझन आवक झाली होती. त्यास २०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलोस असा दर होता. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते २५० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची दररोज २०० ते ३०० पोत्यांची आवक होते. भेंडीला ७० ते १०० रुपये असा दर मिळाला. भेंडीची दररोज २२५ करंड्यांची आवक होते. गतसप्ताहातील शेतमालीची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

शेतीमाल     आवक     किमान     कमाल     सरासरी
खपली     ३५     १७००     १७८३     १७४२
हरभरा     २८     ४३१७     ४९१७     ४६१७
मूग     ५६     ५५७५     ६०००     ५७८८
मटकी     ७९     ४५००     ६५१७     ५५०८
उडीद     २८     ५४००     ५५००     ५४५०
ज्वारी (हायब्रीड)  २७     १७००     २०१७     १८५८
ज्वारी (शाळू)  ३०     १७५०     २६६७     २२०८
गहू     ४०     १७१७     २६६७     २१९२
तांदूळ     ७०     २१४२     ६४००      ४२७१
वाटाना     ४५     ३०००     ३२००     ३१००
मसूर     ४५     ४२२०     ४५२०     ४३७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com