Cashew MSP : काजूच्या हमीभावासाठी ‘वंचित आघाडी’चा मोर्चा

Cashew Market : काजू बीला हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह तालुक्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी चंदगड तालुका बहुजन आघाडीच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मंगळवारी (ता. २३) मोर्चा काढण्यात आला.
Cashew MSP
Cashew MSPAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : काजू बीला हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह तालुक्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी चंदगड तालुका बहुजन आघाडीच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मंगळवारी (ता. २३) मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार हेमंत कामत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

Cashew MSP
Cashew Crop : काजू विकासासाठी ५३ कोटींचा आराखडा

जुन्या बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठ, रवळनाथ मंदिर मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर आला. मोर्चासमोर बोलताना प्रा. ए. डी. कांबळे म्हणाले, की चंदगड तालुक्यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र व्यापारी आणि दलाल वर्गाकडून काजू बीला योग्य दर दिला जात नाही.

Cashew MSP
Cashew Rate : काजू बियांनाही हमीभाव आवश्‍यक

जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. प्रा. व्ही. एस. कार्वेकर म्हणाले, की सर्वाधिक उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग असताना काजू बोर्डाचे कार्यालय कोकणात नेले आहे. हा चंदगड विभागावर अन्याय आहे.

प्रा. एन. एस. पाटील म्हणाले, की बारा वर्षांपूर्वी दौलत कारखान्याकडे शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ची उर्वरित रक्कम थकित आहे. जप्त केलेल्या साखरेचे सर्व पैसे पतसंस्थांना दिल्यामुळे शेतकरी हक्काच्या पैशापासून वंचित आहेत.

मोर्चात आर. पी. कांबळे, एल. डी. कांबळे, डी. के. कदम, रामजी कांबळे, रणजीत देसाई, कृष्णा रेगडे, भेबा कांबळे आदी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com