
Nagar News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज मैदानावर होत असलेल्या ‘अहमदनगर महोत्सवात’ पावणेसहाशे स्टॉल असणार आहेत.
बचत गट उत्पादनांना स्टॉलसाठी कोणतेही शुल्क नाही. बचत गटांच्या सातशे महिलांचा राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी महोत्सवाची माहिती दिली. कृषी उपसंचालक रवींद्र माने, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता उद्घाटन होणार आहे. या वर्षी कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या बचत गटासाठीची स्वयंसाह्यता यात्रा एकत्र होत आहे.
पाच दिवस चालणाऱ्या साईज्योती या जिल्हास्तरीय साईज्योती स्वयंसाह्यता यात्रा, कृषी महोत्सव स्वयंसाह्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन २०२३ मध्ये उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यातील स्वयंसाहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, तसेच खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी एकूण खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी एकूण ३०० स्टॉल, धान्य, फळे, कृषी अवजारे व कृषी निविष्ठा यांचे प्रदर्शनासाठी २२० स्टॉल, पशुसंवर्धन विभागाचे पशू-पक्षी, पशुधन, विविध जातींची चारापिके यांचे प्रदर्शनासाठी २० स्टॉल आणि शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम शेतकरी व नागरिकांना माहिती होण्यासाठी विविध शासकीय विभागांचे ३० स्टॉल लावण्यात येणार आहेत.
अहमदनगर महोत्सवात असे एकूण ५७० स्टॉल लावण्यात येणार करण्यात आले आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
१) बचत गट उत्पादनांना स्टॉलसाठी कोणतेही शुल्क नाही.
२) बचत गटांच्या सातशे महिलांचा राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था.
३) सुरक्षेसाठी सीसीटीव्ही पोलिसांसह खासगी सुरक्षारक्षक तैनात राहणार
४) पोलिस मुख्यालय मैदानावर वाहनतळाची व्यवस्था.
५) विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन आहेत. लहान मुलांसाठी आनंदमेळा व सोबतच दररोज सायंकाळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.