Onion Market Rate : गंगापूर बाजार समितीसमोर शेतकऱ्यांकडून कांद्याचा अंत्यविधी

Kanda Bajarbhav : गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ९) तालुक्यातील सिद्धपूर येथील एका शेतकऱ्याने एक ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी आणला होता.
Onion Market
Onion MarketAgrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : जिल्ह्यातील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ९) तालुक्यातील सिद्धपूर येथील एका शेतकऱ्याने एक ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी आणला होता.

परंतु या कांद्याला लिलाव झाल्यावर चक्क १ रुपया ५ पैसे किलोचा भाव मिळाला. त्यामुळे त्या शेतकऱ्याने सर्व कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर टाकून निषेध म्हणून मंगळवारी (ता. ९) रात्री कांद्याचा अंत्यविधी केला होता.

गंगापूर तालुक्यातील सिद्धपूर येथील शेतकरी गणेश गणगे यांनी मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एक ट्रॅक्टर कांदा गंगापूर येथील मार्केटमध्ये आणला होता. त्याची प्रतवारी चांगली असताना देखील व्यापाऱ्यांनी या कांद्याला बोली लावून १०५ रुपये क्विंटल भाव लावल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे होते.

Onion Market
Onion Damage : कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

ती बाब त्यांनी बाजार समितीच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. खरेदी दराशी संबंध नाही मात्र थोडीफार मदत समिती करू शकते, अशी भूमिका घेतल्यानंतर शेतकऱ्याच समाधान न झाल्याने त्याने कांदा बाजार समितीसमोर टाकला.

जोपर्यंत दर मिळत नाही तोपर्यंत कांदा न उचलण्याचा इशारा दिला व तडक तहसीलदारांकडे धाव घेतली. योग्य भाव न मिळाल्यास, आत्महत्या करतो असा इशारा दिला. या वेळी उपस्थित शेतकरी व पोलिस यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

Onion Market
Onion Rate : कांद्याला दर कमीच, पावसामुळे हानी

यानंतर सायंकाळी गणेश गणगे यांना बरोबर घेऊन शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी टाकलेल्या कांद्याचा अंत्यविधी करून निषेध व्यक्त केला. तीन दिवसांच्या आत गणेश गणगे यांच्या कांद्याला दहा रुपये किलो भाव न दिल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्या वतीने मुंडण करून दहावा घालून आंदोलन करण्यात येईल, असा शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी दिला.

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १० मे रोजी शेतकरी गणेश गणगे यांना पत्र दिले आहे. आपण कांदा बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर टाकला होता. तो उचलून न नेल्यामुळे बाजार समितीने तो उचलून समिती स्तरावर त्याची विल्हेवाट लावल्याचे कळविले आहे.

याविषयी घटनेनंतर झालेल्या चर्चेतून मार्ग निघाला नव्हता. दुसरीकडे किमान दहा रुपये प्रति किलोचा दर मिळावा, असे अपेक्षित असल्याचे शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com