
यवतमाळ: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय (Political) घडामोडी वेगाने बदलत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांचे लक्ष या घडामोडींकडे आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर अर्थव्यवस्था (Economy) आहे. तो शेतकरीच मात्र दुर्लक्षित आहे. गेल्या एक जून ते २२ ऑक्टोबर या जवळपास १४० दिवसांत जिल्ह्यात १,२१६.०३ मिमी पाऊस झाला.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा १४३ टक्के पाऊस बरसला. पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली असली तरी ओल्या दुष्काळाकडे शासनाची डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान झाला आहे.
गेल्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला. पावसाने पिकांची वाढ खुंटली असून, पुरामुळे शेत खरडून गेलेले आहे. यंदा नऊ लाख हेक्टरपैकी पाच लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. ही मदतही तोकडी असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून सुरू आहे. प्रत्यक्ष नुकसान झाल्याच्या तुलनेत मिळाली मदत अत्यंत कमी आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. अजूनही शासनाने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस लांबल्याने उत्पादनात घट झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९२६.३० मिमी आहे. पावसाचे दिवस सुरू झाल्यानंतर एक जून ते २२ ऑक्टोबरपर्यंत १,२१६.०३ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष १४३ टक्के पाऊस झाला आहे. सात जून ते ३० सप्टेंबर हे पावसाचे दिवस मानले जातात. यंदा पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे.
आतापर्यंत झालेला पाऊस (मीमीमध्ये)
यवतमाळ ११,६५.८
बाभूळगाव १,१६४
कळंब १२,६१.८
दारव्हा १,०१२.४
आर्णी १,५३९.१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.