महिला गटाला मिळाली पशुपालनाची साथ...

महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्या पूरक उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकतात, हे भाटमरळी (जि. सातारा) येथील दुर्गामाता महिला शेतकरी बचत गटाच्या महिलांनी दाखवून दिले आहे. या महिलांना बचतीबरोबर दुग्ध व्यवसायामध्ये स्वतंत्र ओळख तयार केली आहे.
Women Self Help Group
Women Self Help Group Agrowon

सातारा शहरापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावरील भाटमरळी हे छोटेसे गाव. गावशिवारातील बहुतांश कुटुंबीयांचा व्यवसाय हा शेती (Agriculture) हाच आहे. बहुतांश शेती ही बागायती आहे. २००५ मध्ये ॲवॉर्ड संस्थेने या गावात महिला बचत गट चळवळीला चालना दिली. त्यामुळे गावामध्ये विविध बचत गटांची (Women Self Help Group) स्थापना झाली. गावातील प्रयोगशील महिला शेतकरी सविता पवार यांनी समविचारी महिलांना एकत्रकरून कीर्ती बचत गट स्थापन केला. ॲवॉर्ड संस्थेच्या सहकार्याने महिलांना विविध व्यवसायासाठी कर्जही उपलब्ध करून देण्यात आले. पुढील टप्प्यात गटातील महिलांनी शेती विकासाला चालना देण्यासाठी दुर्गामाता शेतकरी महिला बचत गट स्थापन केला. बँकाकडून कर्ज तसेच स्वगुंतवणूक करत गाई, म्हशीची खरेदी केली. हा शेतकरी गट कृषी विभागाच्या (Agriculture Department) आत्मा विभागास जोडण्यात आला आहे. शेती करतानाच महिलांनी शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Based Business) करता यावेत, यासाठी ॲवॉर्ड, आत्माच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. पूरक उद्योगासाठी गटाच्या अध्यक्षा अमिता राहुल पवार आणि सचिव सविता भरत पवार यांनी पुढाकार घेतला.

Women Self Help Group
Dairy : ‘आरे’चे दूध वितरण, संकलन बंद

शेतीपूरक उद्योगाला चालना ः

ॲवॉर्ड संस्था आणि कृषी सहायकांनी गटातील महिलांना पूरक उद्योगाबाबत सातत्याने मार्गदर्शन केले. महिलांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन हे व्यवसाय निवडले. सविता पवार यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे आठ मुऱ्हा म्हशी आहेत. दररोज ५० लिटर दूध गावातील खासगी डेअरीला त्या देतात. दुग्ध व्यवसायामुळे कुटुंबाला आर्थिक साथ मिळाली आहे.

Women Self Help Group
Dairy : कुटुंबाच्या एकीतून विनामजूर यशस्वी दुग्धव्यवसाय

सविता पवार यांच्यासोबत दीपाली पवार, कल्पना पवार, सुमन पवार, रेखा जाधव, आरती जाधव, कोमल जाधव, सुनीता जाधव, मनीषा जाधव, सुवर्णा जंगम याही दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली आहे. गटातील सदस्या बेबीताई बोडरे यांनी शेळीपालन आणि कुक्कुटपालनाला चालना दिली आहे. काही महिलांनी गटाच्या माध्यमातून भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला आहे. संस्थेच्या माध्यमातून शेतकरी गटाला शेळीपालन व्यवसायासाठी २२ हजार पाचशे रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून बेबीताई आणि सविता पवार यांनी शेळ्यांची खरेदी केली.

गटातील बहुतांश महिलांनी गाई व म्हशीची खरेदी केली आहे. सध्या गटातील सदस्यांकडे ३० म्हशी आणि २० गाई आहेत. दिवसाकाठी म्हशीचे ८० लिटर आणि गाईपासून ४० लिटर दुधाचे संकलन होते. यातील ७० टक्के दुधाची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. म्हशीचे दूध प्रति लिटर ४० रुपये आणि गाईच्या दुधाला २५ रुपये दर मिळतो. ॲवॉर्ड संस्था, आत्मा विभागाची मदत आणि कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनाला महिलांनी कष्टाची जोड दिली आहे. त्यामुळे शेतीच्या बरोबरीने पूरक व्यवसायामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे.

‘‘शेतकरी महिला बचत गट स्थापनेतून आम्हाला शेतीपूरक व्यवसाय करण्याची संधी मिळाली. ॲवॉर्ड संस्था, कृषी विभागाच्या आत्माचे पाठबळ मिळाले. त्यामुळेच दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनातून आर्थिक मिळकत वाढली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आम्ही पूरक उद्योगामध्ये वाढ करत आहोत.’’
सविता पवार, ८७६७४४७००६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com