Vedkasturi Tourism Centre: जुन्नरची वैभवशाली संस्कृती जपणारे वेदकस्तुरी पर्यटन केंद्र
Junnar Tourism: शिवनेरी किल्ल्यापासून सहा किलोमीटरवरील पारूंडे येथील अमोल व कल्याणी या पुंडे डॉक्टर दांपत्याने आपली शेती सांभाळताना वेदकस्तुरी कृषी पर्यटन केंद्र विकसित केले आहे. ऐतिहासिक वैभवासह मोठी जैवविविधता लाभलेल्या निसर्गरम्य जुन्नर तालुक्याची संस्कृती, परंपरा, आहारशैली यांचे जतन केंद्राच्या माध्यमातून दांपत्याने केले आहे.