Agriculture Success Story : अमरावती जिल्ह्यातील वरुड बाजार समितीचा विस्तार मुख्य यार्डसह उपबाजार लोणी, ढगा, गाडेगाव, राजूराबाजार व अन्य असा विस्तारित आहे. ब्रिटिशांच्या काळात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण होते. साहजिकच या भागात ब्रिटिशांचा वावर अधिक होता. आपल्या सोईनुसार त्यांनी व्यापारी पेठांचे जाळे विणले. वरुड बाजार समितीअंतर्गत सध्याचा राजुरा येथील जनावरांचा बाजार ब्रिटिशांच्या काळातच सुरू झाला. आजही तो याच जागेवर भरतो. सहा एकरांवर भरणाऱ्या बाजाराच्या जागेची मालकी जिल्हा परिषदेकडे असल्याचे सचिव नंदकिशोर बोडखे सांगतात. जनावरांच्या बाजाराचा विचार करता २०२४-२५ मध्ये १२ हजार ७९३ जनावरांची विक्री झाली. व्यवहारातून १३ लाख ९२ हजार ५९९ रुपयांचे सेसरूपी उत्पन्न बाजार समितीला मिळाले. .प्रातिनिधिक आवक परिस्थितीसन २०२४-२५ या वर्षाची प्रातिनिधिक आकडेवारी सांगायची तर तुरीची सात हजार ८५६ क्विंटल, हरभऱ्याची ४२६२ क्विंटल, सोयाबीन ८२७४ क्विंटल, मका ५८८ क्विंटल, गहू २७७ क्विंटल, गुलाबी हरभरा ५२ क्विंटल, एरंडी १९ क्विंटल अशी आवक झाली. अमरावती जिल्ह्यात वरुड, मोर्शी हे दोन तालुके संत्रा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचा प्रभाव वरूडच्या बाजार समितीवर दिसून येतो. सन २०२४-२५ मध्ये संत्र्याची एक लाख १५ हजार ५६८ क्विंटल तर मोसंबीची नऊ हजार १२२ क्विंटल आवक नोंदविण्यात आली..Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन.मिरची बाजाराचे वेगळेपणवरुडपासून अवघ्या दहा किलोमीटरवरील राजूरच्या उपबाजारात गुरुवारचा अपवाद वगळता दररोज रात्री हिरव्या मिरचीचा बाजार भरतो. सन २०२४-२५ या हंगामात येथील बाजारात हिरव्या मिरचीची ५३ हजार ४७९ क्विंटल आवक नोंदविण्यात आली. त्यापासून बाजार समितीला २२ लाख ४२ हजार ५८४ रुपये सेस मिळाला. या बाजाराचे वेगळेपण म्हणजे सायंकाळी सहा ते सात वाजता सुरू होणारा हा बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो. सायंकाळी आठ वाजता दर उघडतात. त्यानंतर मोजमाप करून शेतकऱ्यांना रोखीने चुकारे केले जातात. मात्र रात्रीच्या वेळी पैसे घेऊन जाणे जोखमीचे ठरते. त्यामुळे सातच्या दरम्यान दर उघडावे, अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. विशेष म्हणजे बाजारात अडत आकारली जात नाही. त्यामुळे त्या लुटीवर नियंत्रण आहे. बाजार समितीने या ठिकाणी शेडची उभारणी केली आहे. व्यापाऱ्यांना स्वतंत्र गाळे असून पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर, कॅनची सुविधा आहे. रात्रीचा बाजार असल्याने गरजू शेतकऱ्यांसाठी निवासाची सोय व अन्य मूलभूत सुविधांवरही भर देण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..बांगला देशातून मागणीव्यापारी लक्ष्मीनारायण राठी म्हणाले, की राजुरा बाजारातील मिरचीला बांगला देशातून मोठी मागणी आहे. त्यामुळेच त्याची अधिकाधिक निर्यात होते. सन १९७१-७२ पासून हा बाजार भरत आहे. सप्टेंबर ते मार्च या कालावधीत मिरचीचा हंगाम राहत असल्याने आवक अधिक होते. शंभर किलोमीटर परिसरातील शेतकरी देखील या बाजारात आपली मिरची विक्रीसाठी आणतात असे व्यापारी मुन्ना चांडक यांनी सांगितले..Agriculture Success Story: वारकेंची तंत्रशुद्ध, बहुविध पीकपद्धती.अलीकडील काळातीलदर रुपये. प्रति क्विंटल२०२२ -२००० ते ३५००२०२३ - १८०० ते ४५००२०२४ - १५०० ते ७६००२०२५ - १७०० ते ३६००शीतगृहाची गरजतत्कालीन आमदार आणि विद्यमान राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी सन २००७ मध्ये दर कोसळल्याने राजुरा येथील बाजारात आंदोलन केले होते. शीतगृहाची सुविधा असल्यास शेतमाल साठविता येऊन शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल असा मुद्दा त्यांनी मांडला होता. परंतु आजवर ही सुविधा उपलब्ध करण्यात ली नसून ती आश्वासनाच्या पातळीपुरतीच मर्यादित राहिल्याचे शेतकरी आवर्जून सांगतात..व्यापक शेतकरी हीत लक्षात घेऊन बाजार समितीने सोईसुविधांच्या उपलब्धतेवर भर दिला आहे. उपक्रमशीलतेमुळे शेतीमालाची आवक वाढली आहे. पूर्वीच्या काळात बाजार उत्पन्न अवघे ७० लाख रुपये असताना शेतकऱ्यांचा विश्वास संपादित करीत ते वार्षिक पावणेदोन कोटींपर्यंत नेण्यात यशस्वी झालो. यापुढील टप्प्यात तीन कोटींच्या उत्पन्नाचा पल्ला गाठण्याचे ध्येय आहे.नरेंद्र ऊर्फ बबलू पावडे , सभापती, बाजार समिती, वरुड ९४२२८ ५८१३५.आमच्या आठ एकरांपैकी एक एकरापर्यंत मिरची लागवड राहते. पूर्वी वरुड बाजार समितीत मिरचीचे व्यवहार होत. मात्र जागेची अडचण येत असल्याने १९ वर्षांपूर्वी बाजाराचे स्थलांतर करण्यात आले. आता आमच्या गावशिवारात ही बाजाराची सुविधा झाल्याने मोठी सोय झाली आहे. मिरची लागवड वाढत आहे.सागर भोंडे ९९७०४१८६६८.आमच्या १४ एकर शेतीपैकी एक एकरावर मिरची लागवड होते. मजुरांची उपलब्धता ही मोठी अडचण या पिकात भासत आहे. त्यामुळेच क्षेत्र वाढविण्याचे धाडस शेतकऱ्यांव्दारे केले जात नाही. परंतु गावातच बाजार असल्याने सोय होऊन वाहतुकीवरील खर्चातही बचत झाली आहे.अतुल शेटे ९०९६००२८६६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.