Rural Entrepreneurs Success : सोलापूर जिल्ह्यात सोलापूर- बार्शी मार्गावर सासुरे गावात नागझरी नदीच्या काठावर फुलचंद आवारे यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. यामध्ये उडीद, सोयाबीन, कांदा, गहू अशी पिके घेतली जातात. सन २००२ पासून आवारे यांना शेतीचा अनुभव आहे. त्यांना पत्नी वैशाली यांची शेतीत मोलाची साथ मिळते. नदीकाठावरील बोअरमुळे पाण्याची चांगली सोय आहे, .दरवर्षी कुटुंबापुरते चांगले उत्पन्न हे दांपत्य मिळवते. मात्र अनेकदा बाजाराची शाश्वती नसणे, कमी उत्पादन, हवामान यांचा फटका बसतो. यंदाही प्रचंड अतिवृष्टीमुळे त्यांच्याकडील दोन एकर कांदा, सोयाबीनचे तीन लाखांहून अधिक नुकसान झाले.फळबागांसारखी मोठी पिके घेणे, त्यातील गुंतवणूक, खर्च, मिळणारा दर व नफा यांचा विचार करता अर्थकारण फारसे फायदेशीर होत नव्हते. दरवर्षी सोयाबीन, उडीद, तूर अशा हंगामी पिकांवरच या दांपत्याची भिस्त असते.उत्पादन कमी मिळेल, परंतु उत्पन्नाची हमी दिसते असा त्यांचा अनुभव आहे..Vermicompost Production: लेंडीपासून गांडूळ खतनिर्मिती.गांडूळ खतनिर्मिती व्यवसायाचा पर्यायशेती सांभाळण्यासह वैशाली सात- आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानात (उमेद) कृषीसखी म्हणूनही कार्य करतात. तिथे त्यांना गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण मिळाले. आपल्या शेतीत उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार करण्याची ही संधी होती. त्यानुसार या व्यवसायात पाऊल टाकले. गावातील अन्य शेतकऱ्यांनी तसेच बचत गटातील महिलांनीही त्यांना मार्गदर्शन केले. सध्या आवारे यांच्याकडे गांडूळखत निर्मितीचे सात बेडस आहेत. प्रति बेड पाच क्विंटल खत तयार होते. .साधारण दोन महिन्याच्या प्रति बॅचच्या कालावधीत एकूण ३५ क्विंटलच्या दरम्यान खतनिर्मिती होतो. वर्षभरात सुमारे बॅचेस होतात. शेतातील एका झाडाच्या सावलीखाली स्वच्छ जागेत उत्पादन घेण्यात येते. सेंद्रिय घटकांचे थर, शेतातील पीक अवशेष, कडब्यांचे अवशेष यांचे थर रचून त्यावर पाणी शिंपडण्यात येते. त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडल्या जातात. साधारण काळसर, मृदू, गंधरहित, कुरकुरीत स्वरूप आले की बेडमधील खत तयार झाले असे समजले जाते..ब्रॅंड तयार केलाएक किलो, पाच किलो ते दहा किलो ते सुट्या पद्धतीनेही खताची विक्री होते. त्यासाठी ‘रुक्मिणी` नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे. बार्शी परिसरासह जिल्ह्यातील तालुक्यांमधील शेतकऱ्यांना विक्री करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बाहेरील जिल्ह्यांमधून मागणी येईल त्याप्रमाणेही पुरवठा केला जातो..फळबागा, कांदा या पिकांसाठी तसेच परसबाग किंवा गच्चीवरील बागेसाठी देखील शहरांमधून आपल्या खताला मागणी असल्याचे फुलचंद सांगतात. गुणवत्तेत कुठेही तडतोड नसल्याने ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दहा ते पंधरा रुपये प्रति किलो असा दर आहे. या व्यवसायातून महिन्याला खर्च वजा जाता २५ हजार ते त्यापुढे उत्पन्न मिळते. याशिवाय ३०० रुपये प्रति किलोने गांडूळ कल्चरचीही विक्री होते..Vermicompost Production: गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन.वैशाली झाल्या प्रेरणेचा स्रोतआज वैशाली परसबाग आणि गांडुळखताविषयी उत्तम मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रेरणेतून सुमारे दहा महिलांनी गांडूळ खतनिर्मिती सुरू केली असून त्यांच्या शेतात बेडस पाहण्यास मिळतात. शिवाय घरच्या शेतीत देखील त्यांना या खताचा स्रोत तयार झाला आहे. वैशाली संस्था आणि संघटनांच्या पुरस्काराच्या मानकरी देखील झाल्या आहेत. उमेद अभियानानेच आवारे दांपत्याच्या शेतीला नव्हे तर खऱ्या अर्थाने आयुष्यालाच कलाटणी देणारी उमेद मिळाली आहे. स्वनिर्मित खताच्या वापरातून आपल्या सोयाबीन, कांदा, तूर आदींचे दर्जेदार उत्पादन घेणे त्यांना शक्य झाले आहे. मातीचा पोत सुधारला आहे..मागील पाच- सात वर्षांपासून व्यवसायात चांगले स्थैर्य मिळवले आहे. त्याच्या बळावर मुलांना उत्तम शिक्षण देणे, त्यांना आपल्या पायावर उभे करणे शक्य झाले आहे. मोठा मुलगा ऋषीकेश आयटी इंजिनिअर असून पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस आहे. दुसरा मुलगा रितेश बीएस्सीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. पशुखाद्य आणि सेंद्रिय खत म्हणून उपयोगी ठरणाऱ्या अझोलाचे उत्पादनही आवारे घेतात. गांडुळखताच्या प्लॅस्टिक बेडमध्येच कमी जागेत व कमी खर्चात त्याची निर्मिती करणे शक्य झाले आहे. दररोज किमान ५०० ते ६०० ग्रॅम अझोलाची काढणी होते.फुलचंद आवारे ९३७३८१००३२वैशाली आवारे ९८५०७४९९३६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.