राजगोपाल वाडीवेल, योगेश्वर सिंग. डीडी नांगरेउथळ, खडकाळ जमिनीत डाळिंब शेती यशस्वी करण्यासाठी चारी किंवा खंदक पद्धतीची लागवड किंवा रुंद खड्डे पद्धती अधिक प्रभावी ठरते. या पध्दतीने व्यवस्थापन केलेल्या झाडांची वाढ, मुळांचा विकास, अन्नद्रव्यांचे शोषण, फळांची गुणवत्ता आणि एकरी उत्पादन या बाबींची वृद्धी होण्यास मदत होते. बारामती येथील राष्ट्रीय अजैविव ताण व्यवस्थापन संस्थेने अनेक वर्षांच्या केलेल्या संशोधन चाचण्या व प्रयोगांमधून हा निष्कर्ष पुढे आला आहे. अशा प्रकारे नापीक, ओसाड जमिनींचे पुनरुज्जीवन होऊन समृद्ध, उत्पादत बागांमध्ये त्यांचे रूपांतर करण्यास चालना मिळाली आहे. .बारामती (जि. पुणे) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट) ही संस्था कार्यरत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत संस्थेचे कामकाज चालते. विविध पिकांवर येणारे विविध अजैविक ताण, ते कमी करण्यावर संशोधन व उपाय शोधण्याचे काम संस्थेतील शास्त्रज्ञांकरवी केले जाते. संस्थेत उथळ व खडकाळ जमिनीत डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने आठ वर्षांपासून संशोधन केले आहे. त्यादृष्टीने संस्थेने आपल्या प्रक्षेत्रात चाचण्या व प्रयोग करून त्याचे निष्कर्षही सादर केले आहेत..Pomegranate Farming: डाळिंब बागेत पीक संरक्षणासह मधमाशी संवर्धनासह भर.उथळ जमिनींची समस्यादख्खन पठार प्रदेशात जमीन उथळ आणि खडकाळ असते. अशा ठिकाणी शेती करणे विशेषतः डाळिंबासारख्या फळपिकाचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. या जमिनींतील मातीची खोली कमी म्हणजे बहुतांशवेळा ५० सेंमीपेक्षा कमी असते. तर ७० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण दगडांचे असतात. अशा ठिकाणी सेंद्रिय पदार्थ, पोषक घटकांची उपलब्धता कमी असते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील कमी असते. सुपीकता कमी असते. मुळांची जागा खूप मर्यादित असते. झाडांना खोलवर मुळे विकसित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दुष्काळाचा ताण जास्त काळ सहन करावा लागतो. पर्यायाने उत्पादन कमी मिळते. शिवाय दर्जाही कमी असतो. लहान खड्डे लागवडीच्या पारंपरिक पद्धतींत मुळांचा विकास कमकुवत होतो. झाडांची वाढ समाधानकारक होत नाही..प्रयोगांमधून समस्येवर उपायसमस्येवर उपाय शोधण्यासाठी संशोधन केले. त्या अनुषंगाने डाळिंब पिकात सर्वांत प्रभावी लागवड पद्धती शोधण्याच्या दृष्टीने विविध लागवड पद्धतींच्या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये चारी किंवा खंदक आणि ट्रेंच अर्थात रुंद खड्डा पद्धत लागवड पद्धत सर्वांत प्रभावी व यशस्वी ठरल्याचे प्रयोगांमध्ये आढळले आहे. यामध्ये तीन चौरस मीटरचा तसेच दोन चौरस मीटर आकाराचा रुंद खड्डा खोदणे या पद्धतीचा समावेश आहे. स्थानिक आणि काळ्या मातीच्या १- १ मिश्रणाने खड्डे भरल्यास ते परिणामकारक आढळले आहे..Pomegranate Farming: डाळिंबासाठी रोग, किडीपेक्षा हवामानबदल घातक.या पद्धतीचे झालेले फायदेखंदक आणि रुंद खड्डे पद्धतीने लागवड केलेल्या झाडांनी लक्षणीयरीत्या चांगली वाढ दर्शविली. प्रति झाड ७० किलोपेक्षा जास्त बायोमास (जैविक वस्तुमान) मिळाले.लांब आणि मजबूत, विस्तीर्ण मुळांची प्रमाली (४.६ मीटर पर्यंत) मिळाली. त्यामुळे पाणी आणि पोषक घटक शोषण्यास मदत मिळाली.कोरड्या जमीन परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता झाडांमध्ये तयार झाली.झाडांच्या पानांमध्ये प्रमुख पोषक घटकांचे विशेषतः नत्र व स्फुरदाचे प्रमाण ०.२८ टक्क्यांपर्यंत, तर पालाशचे प्रमाण १.८१ टक्क्यापर्यंत होते..फळांची गुणवत्ता आणि उत्पादनात लक्षणीय सुधारणा झाली.शेतकऱ्यांच्या पारंपरिक पद्धतीच्या लागवड व्यवस्थापनातून प्रति हेक्टर ५.१६ टन उत्पादन मिळाले. त्या तुलनेत सुधारित तंत्र पद्धतींत हेच उत्पादन हेक्टरी ८.९७ टनांपर्यंत मिळाले. प्रति किलो १०० ते २५० रुपये असा डाळिंबाचा दर गृहित धरला तरी हेक्टरी उत्पन्नही अधिक मिळते.खंदक आणि रुंद खड्डे पद्धतीत वाढविलेल्या झाडांचे डाळिंब मोठे, रसाळ आणि गोड होते. फळांमध्ये रसाचे प्रमाण ४८ टक्क्यांपेक्षा जास्त होते. एकूण विरघळणाऱ्या घन पदार्थांचे (साखर पातळी) ब्रिक्स प्रमाण १६.०५ पर्यंत पोहोचले. याउलट पारंपरिक पद्धतीच्या फळांमध्ये रसाचे प्रमाण ३५ टक्के, तर ब्रिक्सचे प्रमाण ११.५ एवढे कमी होते. राजगोपाल वाडीवेल ८९९९३५९४५२डी. डी. नांगरे ९६६५२०४८९५(लेखक राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापनसंस्थेत शास्त्रज्ञपदी कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.