Honey Production Business: अभियंता युवकाची मधनिर्मिती उद्योगात भरारी
Farmer Success Story: कान्होलीबारा (जि. नागपूर) येथील युवा शेतकरी व अभियंता शुभम येणूरकर यांनी काही वर्षांपूर्वी मधमाशीपालनाला सुरुवात केली. प्रशिक्षण, व्यावसायिक दृष्टिकोन व कठोर परिश्रम यांच्या आधारे व्यवसाय वाढवला. प्रक्रियायुक्त मधाचा ‘हाइव्ह हनी’ ब्रॅण्ड विकसित केला. मेण, हनी कोंब यांचेही उत्पादन घेत व्यवसायात चांगली भरारी घेतली आहे.