Dairy Success Story: सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील रामभाऊ कड यांनी मुक्त गोठा पद्धत, आधुनिक यंत्रणा, कुटुंबाचा सहभाग आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांच्या जोरावर दुग्ध व्यवसायात शाश्वत वाटचाल केली आहे. गोठ्यात पशुधनाची संख्या वाढवण्यापेक्षा प्रति गाय दूध उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण आणि आरोग्य व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे आहे,’ असा त्यांचा ठाम विश्वास आहे..पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी (ता. हवेली) हे गाव प्रामुख्याने नर्सरी व्यवसायासाठी ओळखले जाते. मात्र, या गावातील प्रगतिशील शेतकरी रामभाऊ बबन कड यांनी शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे. सातत्य, योग्य नियोजन आणि आधुनिक व्यवस्थापनाच्या जोरावर आदर्श दुग्ध व्यवसाय त्यांनी उभा केला आहे. मागील १८ ते २० वर्षांपासून ते या व्यवसायात कार्यरत असून आज त्यांचा डेअरी व्यवसाय परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे..कमी संख्येतून अधिक उत्पादनदुग्ध व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात रामभाऊ कड यांच्याकडे १५ ते २० गाई होत्या. व्यवसायातील अनुभव वाढत जाईल तसे पशुसंख्या वाढवीत ९० ते ९५ गाईंपर्यंत नेली. परंतु, वाढता खर्च, मजुरी आणि व्यवस्थापनातील अडचणी लक्षात घेऊन पशुसंख्या कमी करून गुणवत्तेवर भर देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सध्या गोठ्यात ४० गाई आणि १५ वासरांचे संगोपन केले जात आहे. ‘फक्त गोठ्यात पशुधनाची संख्या वाढवण्यापेक्षा प्रति गाय दूध उत्पादन, खर्च नियंत्रण आणि आरोग्य व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे आहे,’ असा त्यांचा ठाम विश्वास आहे..Dairy Farming: गोपालनात नियमित व्यवस्थापन हीच गुरुकिल्ली.मुक्त गोठा पद्धतीचा प्रभावी अवलंबरामभाऊ कड यांनी आधुनिक मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब केला आहे. सुमारे २० गुंठे क्षेत्रात ६० बाय ४०० फूट आकाराचा प्रशस्त गोठा जनावरांसाठी उभारला आहे. या पद्धतीमुळे गाईंना मोकळे वातावरण, स्वच्छता आणि नैसर्गिक हालचालींसाठी पुरेशी जागा उपलब्ध होते. याचा थेट परिणाम गाईंच्या आरोग्यावर आणि दुधाच्या उत्पादनावर होतो. याशिवाय वासरांसाठी स्वतंत्र गोठा, दूध काढण्यासाठी वेगळी जागा आणि यांत्रिकीकरणाची सोय करण्यात आल्याने संपूर्ण व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध व कार्यक्षम झाले आहे..चारा, पूरक खाद्याचे काटेकोर नियोजनरामभाऊ कड यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून त्यापैकी दोन एकर क्षेत्रावर चारा पिकांची लागवड असते. त्यात नेपिअर आणि कडवळ ही मुख्य चारा पिके आहेत. दररोज सुमारे दोन टन हिरवा चारा गाईंना दिला जातो. सकाळ आणि संध्याकाळी चारा दिला जातो. पूरक खाद्य म्हणून सुग्रास गोळी, सरकी पेंड आणि भुस्सा दिला जातो. यासाठी दर महिन्याला सुमारे २०० गोण्या (प्रति गोणी ५० किलो) वापरल्या जातात. संतुलित आहारामुळे गाईंचे आरोग्य उत्तम राहून दूध उत्पादन स्थिर राहते, असे ते सांगतात..स्वतःचे संकलन केंद्रसध्या गोठ्यातील ४० गाईंपासून दररोज सरासरी ५५० ते ६०० लिटर दूध उत्पादन मिळते. याशिवाय त्यांनी ‘नर्मदा डेअरी फार्म’ या नावाने स्वतःचे दूध संकलन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर सुमारे ४ हजार लिटर क्षमतेचे दोन कुलर, फॅट तपासणी मशिन आणि स्वतंत्र संकलन वाहन अशी सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यातून दररोज सुमारे २ ते २.५ हजार लिटर दूध संकलन केले जाते. या संकलन केंद्राची संपूर्ण जबाबदारी त्यांचा मुलगा आदित्य कड सांभाळतो..Dairy Farming: शेती, दुग्ध व्यवसायानेच दिला खरा आनंद.कुटुंबाचा सक्रिय सहभागदुग्ध व्यवसायात कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग असतो. त्यामुळे दुग्धव्यवसायातील कामांचे योग्य नियोजन सोपस्कर झाले आहे. गोठा व्यवस्थापनात मुलांची मदत मिळत असल्यामुळे दैनंदिन कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे बाहेरील मजूर ठेवण्याची गरज भासत नाही. याचा फायदा खर्च नियंत्रित राहून नफा वाढीस झाला आहे. यामागे रामभाऊ कड यांच्या पत्नी उषा आणि दोन मुलांचा मोठा वाटा आहे. मोठा मुलगा आदित्य संकलन केंद्राचे व्यवस्थापन पाहतो, तर लहान मुलगा डॉ. सिद्धार्थ कड हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्यामुळे पशू आरोग्य, लसीकरण आणि उपचारांसाठी बाहेरील पशुवैद्यकीय तज्ज्ञांवर अवलंबून राहावे लागत नाही. यामुळे खर्चात बचत होत असून पशुधन निरोगी राहते. कुटुंबाची एकत्रित मेहनत हेच दुग्ध व्यवसायाच्या यशाचे गमक असल्याचे रामभाऊ कड सांगतात..आर्थिक गणितदररोज एकूण सुमारे ३ हजार लिटर दूध संकलन केले जाते. हे दूध हडपसर, पुणे शहर आणि सह्याद्री डेअरी फार्म येथे विक्रीसाठी पाठवले जाते. दुधाला साधारणतः प्रति लिटर ३६ ते ३८ रुपये दर मिळतो. दुग्ध व्यवसायातून दर महिन्याला सुमारे ५.५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होते. चारा, खाद्य, मजुरी व इतर खर्च वजा जाता सुमारे १ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. दूध संकलन केंद्रातून प्रति लिटर एक रुपया शिल्लक राहत असून त्यातून दर महिन्याला सुमारे ६० हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते..दुग्धव्यवसायात वेळ आणि शिस्त महत्त्वाचीदुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी वेळ आणि शिस्त महत्त्वाची असल्याचे रामभाऊ कड यांचे मत आहे. गोठ्यातील कामकाज सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होऊन रात्री १०-११ वाजेपर्यंत चालते. दररोज गोठ्याची साफसफाई, नियमित निर्जंतुकीकरण, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि योग्य वायुवीजन यावर विशेष भर दिला जातो. प्रत्येक गाईच्या दूध उत्पादनाची, खाद्याची आणि आरोग्याची स्वतंत्र नोंद ठेवली जाते. त्यासाठी नोंदवही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या गाईच्या दूध उत्पादनात घट आली तर त्याचे कारण त्वरित लक्षात येते. वेळेवर लसीकरण, जंतनाशक आणि गाभण काळातील व्यवस्थापन यामुळे गाईंचे उत्पादन चक्र सुरळीत चालते.- रामभाऊ कड ९७६४४३३५०९, ८७६७५६९४५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.