Inspiring Women Story: परंपरेनं पुरुषांचं वर्चस्व असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या माळावर चिंचाळे (जि. सांगली) येथील ऊर्मिला माणिकशेठ गायकवाड यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. घरचा साज ‘राजा’ आणि ‘अर्जुन’ खोंडांना माळावर उतरविताच केवळ स्पर्धक म्हणूनच नव्हे, तर धाडसी गाडा मालक म्हणूनही त्यांनी ओळख प्रस्थापित केली आहे..छत्रपती संभाजीनगरचा जांभळीचा माळ...अंगाला झोंबणारी थंडी... सूर्य जसजसा वर चढू लागला, तसतसं माळ तापू लागलं... ढोल-ताशांनी आसमंत दणाणून उठला. बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. निवेदकाचा आवाज मैदानभर घुमत होता..गाडा मालकांची नावं... बैलांची ओळख...अन् प्रत्येक नावामागे दडलेली एक स्वप्नकथा...!गाड्या चाकोरीत उभ्या राहिल्या, निशाण फडकलं...आणि क्षणार्धात बैलगाड्यांनी वेग पकडला!माती उसळली, धुरळा उडाला, डावीकडची जोडी किंचित पुढे...पण उजवीकडची जोडी हार मानायला तयार नाही!आता शेवटचा टप्पा… संपूर्ण मैदान श्वास रोखून पाहत होतं.एकच गर्जना... एकच लाट...आणि होऽऽऽ! गाडी रेषा ओलांडतेय!.Women Success Story: वडिलांचे शेती प्रेम, तळमळीने डॉक्टर कन्या झाली शेतकरी.त्या धुरळ्यातून एक नवं नाव हवेत तरंगलं...ऊर्मिला माणिक गायकवाड! ऊर्मिला यांचा ‘राजा’ आणि अमितशेठ भाडळे, वाघोली (जि. पुणे) यांचा ‘चिमण्या’ यांनी थेट मराठवाडा केसरी किताबावर नाव कोरलं. परंपरेनं पुरुषांचं वर्चस्व असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानात चिंचाळे (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ऊर्मिला गायकवाड (मथुरा फार्म, चिंचाळे) यांनी अग्रस्थान मिळविलं आहे. ऊर्मिलाताईंचे माहेर खानापूर तालुक्यातील बलवडी भाळवणी. त्यांच्या माहेरी शेती. झुंज खेळणारी धिप्पाड बैलं. .त्यामुळे शेती आणि खिलार जनावरं त्यांच्या रक्तातच. लग्न झाल्यानंतर सासरची शेती असल्यामुळे शेतीशी नाळ तुटली नाही. त्यांचे पती माणिकराव गायकवाड यांचा शिमोगा (कर्नाटक) या ठिकाणी व्यवसाय. दोघेही इथे राहतात. पण त्यांचं सारं मन गावाकडंच. मुऱ्हा म्हशींचा गोठा. दावणीला खिलार गाय आणि गरुडा खोंड. त्यांनी पुसद (जि. यवतमाळ) येथून जिवा खोंडाची खरेदी केली. त्या गावाकडे महिन्यातून एकदा येतात. आल्यानंतर आठ ते पंधरा दिवस शेतात असतात. गरुडा आणि जिवा या खोंडांची शर्यतीसाठी तयारी करून घेतात..Agriculture Success Story: गवारीच्या खेळत्या पैशाने दिला मोठा आधार.बैलगाडा शर्यत म्हटलं, की ईर्षा अन् चुरस ओघानंच येते. माळावरचा हा खेळ आजतागायत पुरुषांच्याच ताकदीचा, पुरुषांच्याच नावाचा मानला जातो. शर्यतीच्या मैदानात उतरणारे हात पुरुषांचेच आणि त्या शर्यती पाहणारी गर्दीही बहुतांशी पुरुषांचीच. महिलांची उपस्थिती क्वचितच दिसायची आणि त्यांनी मैदानात उतरण्याचा प्रश्नच नव्हता. ऊर्मिलाताई मात्र दोन वर्षांपूर्वी शर्यतीत उतरल्या. अर्थात शर्यतीत उतरणं जितकं धाडसाचं, तितकंच जोखमीचंही. .कणदूर (जि. सांगली) येथील एकनाथ पाटील यांचा ‘राजा’ नावाचा खोंड त्यांनी निम्म्या भागीदारीवर शर्यतीसाठी घेतला. त्याच वेळी अंबड (जि. जालना) येथील विलास पवार यांचा ‘अर्जुन’ हा खोंड शर्यतीसाठी करारावर घेतला. या दोन खोंडांसोबत ऊर्मिलाताईंचा शर्यतींचा प्रवास सुरू झाला. माळावरचा हा प्रवास सोपा नव्हता. सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांतील यात्रा-जत्रांच्या शर्यतींच्या मैदानावर त्या खोंड घेऊन जात होत्या. कधी जीत, कधी हार असं असलं, तरी मैदानावरून परतताना त्या कधीही खचल्या नाहीत..राज्यभरात नावगेल्या वर्षभरात राज्यभरात होणाऱ्या शर्यतीच्या मैदानात त्या पोहोचल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील निमसोड येथील महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांच्या घरच्या साजने पटकवला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी ऊर्मिला यांच्या गाडीचे चालक अप्पा कारुंडेकर आहेत. त्यांच्या कसबीपणामुळेच यश मिळाले आहे. ‘राजा’ चार वेळा हिंदकेसरीचा मानकरी झाला, तर ‘अर्जुन’ दोन वेळा महाराष्ट्र केसरीच्या गुलालाचा मानकरी झाला..ऊर्मिलाताई सांगतात, की मी अनेक मैदानं फिरले, शर्यती केल्या, अनुभव गोळा केला. त्या प्रवासात कौतुकही झालं. काहींनी ट्रोलही केलं. तुमच्या गावातही मैदान घेऊन दाखवा, असंही बोलू लागले. गावात मैदान भरविण्याचं पक्कं केले. तारीख ठरली. गाड्यांची नोंदणी झाली अन् गावात चिंचाळे केसरीचे मैदान पार पडले. या मैदानासाठी गाड्या कमी आल्या, पण ज्यांनी मला ट्रोल केलं त्यांना मी दाखवून दिलं, की स्त्रीदेखील शर्यतीचे मैदान घेऊ शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.