Agriculture Success Story : वर्षभरातील सण समारंभ लक्षात घेऊन शेतकरी त्या त्या विशेष दिनाची मागणी लक्षात घेऊन लागवड ते काढणीचे स्मार्ट नियोजन करताना दिसत आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. या दहा दिवसांच्या काळात विविध फुलांसह, फळे व काही विशिष्ट भाज्यांना मोठी मागणी असते. साहजिकच त्यांची आवक देखील या काळात वाढते. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे भोपळा. पूर्वीच्या काळी काळी डांगर (गोल भोपळा) व चक्री भोपळा (स्थानिक भाषेत चक्की) या दोन वेलवर्गीय फळभाज्यांची लागवड पूर्वी कौटुंबिक गरजेसाठी बांधावर, विहिरीच्या कडेला केली जायची. मात्र अलीकडील काळात या फळभाज्यांना विविध पाककृती व प्रक्रियेसाठी मागणी वाढलेली आहे. .त्यामुळे सणासुदीला पितृपक्ष व नवरात्रोत्सव काळापुरते मर्यादित न राहाता वर्षभर त्यांची आवक होताना दिसत आहे. त्यादृष्टीने बियाणे कंपन्यांनी या भोपळ्यांचे विविध वाण विकसित केले आहेत. त्यामध्ये लंबगोलाकार, गोल, लांबट असे विविध प्रकार आहेत. यामध्ये काहींचा रंग फिकट तर काहींचा गर्द हिरवा असतो. शेतकरी बाजारपेठेतील मागणी ओळखून या पिकांची व्यावसायिक पद्धतीने लागवड करीत आहेत. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातून देखील या फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वर्षभर होत असते. भोपळ्यांची टिकवणक्षमता चांगली असल्याने शेतकरी टप्प्याटप्प्याने दरांचा अंदाज घेऊन त्यांच्या विक्रीचे नियोजन करीत असतात..Red Pumpkin : नवरात्रोत्सवात काशीफळ वेधतेय लक्ष .डांगर लागवडीचे नियोजनप्रामुख्याने पितृपक्ष पंधरवडा व नवरात्र काळात डांगरला विशेष मागणी असते. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यासह जळगाव, संभाजीनगर, बीड, जालना येथून आवक होते. बाजार आवारामध्ये चक्कीची आवक नांदगावसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या दोन तालुक्यांतून होते. .अनेक शेतकरी प्रामुख्याने बांधालगत डांगराची लागवड करतात. असे किरकोळ उत्पादन घेणारे शेतकरी थोडाफार माल स्वतःच्या वाहनातून बाजार समिती आणून विक्री करतात. अलीकडे शेतकरी व्यावसायिक पद्धतीने लागवड करत असल्याने व्यापारी थेट बांधावर येऊनही खरेदी करतात. येवला, नांदगाव,चांदवड, देवळा, इगतपुरी सिन्नर अशा तालुक्यांमध्ये अशा लागवडी पाहण्यास मिळतात..Red Pumpkin Cultivation : वेलवर्गीय काशीफळाची लागवड.दररोजच्या आवकेचे चित्रनाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने येवला, नांदगाव, चांदवड या भागांतील निवडक शेतकरी डांगर व चक्की यांची लागवड करत आहेत. नवरात्रीनिमित्त उपवासाच्या पदार्थांमध्ये तिखट, झणझणीत तसेच गोडसर पदार्थ बनवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. नाशिक जिल्ह्यासह जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना नंदुरबारसह कर्नाटक राज्यातूनही नाशिक बाजार समितीत आवक होते. दररोज ती सरासरी १२ ते १५ क्विंटलदरम्यान आहे. त्यास प्रति क्विंटल किमान ६०० ते कमाल १,५०० रुपये तर सरासरी २०० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत..दक्षिण भारतात वर्षभर सांबरमध्ये या शेतीमालांचा वापर होत असल्याने तेथेही वर्षभर पुरवठा केला जातो. भीमा चव्हाण सहा- सात वर्षांपासून डांगर व चक्की यांच्या व्यापारात आहेत. ते सांगतात की काळ्या पाठीचे गावरान डांगर जळगाव जिल्ह्यातून नाशिक बाजारात येते. पितृपक्ष नवरात्र काळात त्याला चांगली मागणी राहते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डांगराच्या दरांची स्थिती चांगली आहे. प्रति किलो सहा रुपयांपासून १२ ते २० रुपयांपर्यंत प्रतवारीनुसार दर राहिले आहेत. या शेतीमालाच्या व्यापारामध्ये मेहनत तुलनेने अधिक असते. त्यामुळे यामध्ये व्यापारी हाताच्या बोटावर मोजणारेच आहेत. फळे उचलूनच त्याची गुणवत्ता ग्राहकांना दाखवावी लागतात..दरांची स्थिती (रुपये प्रति किलो)प्रकार खरेदी दर घाऊक विक्री किरकोळ विक्रीडांगर ८ ते १२ १२ ते २० ३० ते ४० रु.चक्की १६ ते १८ २५ ते ३० ४० ते ६० रु.शेतकरी अनुभवखरीप हंगामाच्या सुरवातीला काही शेतकरी या पिकांची लागवड करतात. अन्य पिकांच्या तुलनेत खर्च व मेहनत कमी असल्याने शेतकऱ्यांना भोपळावर्गीय पीक किफायतशीर वाटत आहे. वडाळी बुद्रूक (ता.नांदगाव) येथील दीपक किसन घोलप सांगतात की पूर्वी खरीप हंगामात मुगाची पेरणी करत होतो. त्यानंतर कांदा लागवड करायचो. मात्र शेंगा तोडणी, वाळवणी, मळणी अशा कामांना अधिक मेहनत लागत असे. त्यावर पर्याय म्हणून डांगर व चक्की लागवडीचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला. पहिल्या वर्षी एक एकर क्षेत्रावर लागवड केली. चांगले व्यवस्थापन करून एकरी २० ते २२ टनांपर्यंत उत्पादन घेणे शक्य होत आहे. आता लागवड सहा एकरांपर्यंत विस्तारली आहे. फळांची टप्प्याटप्प्याने विक्री करणे सोपे झाले आहे..उपवासासाठी रताळ्यांनाही मागणीनवरात्रोत्सवात रताळ्यालाही देखील चांगली मागणी असते. वास्तविक गणेश उत्सवात हरतालिकेच्या उपवासानिमित्त असलेली मागणी पुढे कायम सुरू राहते. त्यानुसार आवक वाढण्यास सुरुवात होत असते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रताळ्याची सर्वाधिक आवक सातारा,कोल्हापूर व बेळगाव (कर्नाटक) भागातून होते. नाशिक जिल्ह्यातून सटाणा, कळवण, देवळा व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमधूनही आवक होते. मात्र यंदा ती कमी झाली आहे. बेळगाव परिसरातील रताळ्यांना सरासरी प्रति किलो २५ ते ३० रुपये किलो, तर सातारा, कोल्हापूर भागातून येणाऱ्या देशी रताळ्यांना ३५ ते ४० रुपये दर मिळत आहेत. नाशिक बाजार समितीमध्ये दररोज सरासरी १५ टन विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक बाजारात प्रति किलो सरासरी दर १५ ते २० रुपयांनी कमी आहेत.दीपक घोलप ९४०३११८४९६भीमा चव्हाण ९९२१३००२९१(डांगर व्यापारी, वडाळीभोई, ता. चांदवड)बाबासाहेब पाटील कदम ९५१८९३०३९८(भाजीपाला व्यापारी, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.