Akola News : मेहकर तालुक्यातील भोसा या डोंगराळ व सुविधाविरहित गावाने आज अभिमानाने उभारी घेतली आहे. आदिवासी शेतकरी कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींनी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवत गावाला नवा सन्मान मिळवून दिला आहे. .राधा व आरती अशोक बेले या दोन्ही बहिणींची एकाच वेळी एमबीबीएससाठी निवड झाली असून, हा दुर्मीळ आणि प्रेरणादायी क्षण संपूर्ण गावाला आनंद देणारा ठरला. भोसा गावातील कुडाच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबातील राधा व आरतीने बारावीत उल्लेखनीय गुण मिळवत वैद्यकीय प्रवेश परीक्षेत चमक दाखवली. .MPSC Success Story: शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश.राधा ही मेहकरच्या सेंट्रल पब्लिक स्कूलमधून, तर आरती ही चिखलीतील सैनिक स्कूलमधून बारावी उत्तीर्ण झाली. त्यानंतर दोघींनी परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. आजही बेले कुटुंबीय साध्या घरात राहतात. या मुली आता डॉक्टर होऊन गावचे नाव उज्ज्वल करीत आहेत, अशी आनंददायी भावना गावातील अनेक जण व्यक्त करतात. .भोसा हे गाव जरी दुर्गम असले तरी शिक्षणाच्या बळावर इथली तरुण पिढी नवे आकाश गाठते आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षणासाठी सतत मदत करतात. आज राधा व आरतीमुळे भोसा गाव पुन्हा एकदा उजळून निघाले आहे. केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांनी तत्काळ दखल घेत दोघींचा सत्कार केला. .MPSC Success Story : वनरक्षकाचा मुलगा प्रदीप काळेलची ‘महसूल सहायक’ पदी निवड.त्यांना शिक्षणासाठी सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले. सुरेश वाळूकर, समाधान साबळे, केशवराव खुरद आदी उपस्थित होते. बेले कुटुंबाकडे कोरडवाहू चार-पाच एकर शेती आहे. या शेतीत राबतानाच आई-वडील मोलमजुरीचेही काम करतात..भोसा गाव शिक्षणातून पुढारतेयहे गाव दुर्गम व ७० टक्के आदिवासी असले तरी या गावातील तरुण पिढी हे चक्र भेदत आहे. सुविधांची वानवा असतानाही जिद्द, मेहनतीच्या बळावर येथे बदल होत आहे. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आजवर सात जण एमबीबीएस झाले आहेत. एक तरुणी पीएसआय बनली. इतर पदांवरही तरुण झेप घेत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.