Pomegranate Market Update : आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे डाळिंब फळाला वर्षभर मोठी मागणी असते. त्यानुसार बाजारपेठेतील संधी ओळखून महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक बहार व्यवस्थापन करीत असतात. राज्यातील काही पट्ट्यांमध्ये आंबिया बहरात उत्पादन घेऊन बांगलादेश, नेपाळ येथे प्रामुख्याने निर्यात होते..त्याचबरोबर देशातील प्रमुख शहरांमध्ये मागणीनुसार पुरवठा होतो. त्यामुळे राज्यातील डाळिंब क्षेत्र व उत्पादन वाढत आहे. यंदाचे चित्र पाहायचे झाल्यास आवकेत वाढ होऊन दरांत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सवानंतर दरात घसरण दिसून आली तरी तोंडावर असलेल्या नवरात्र, दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दरवाढ अपेक्षित आहे..यंदाचे चित्रयंदा मे महिन्यापासून राज्यभरात विविध भागांत पाऊस होता. त्याचा डाळिंब पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. ज्यामध्ये तेलकट डाग, मर यांसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. अशाही प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी उत्पादन घेऊन त्याचा दर्जा टिकविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार जुलै महिन्यापासून टप्प्याटप्प्याने माल बाजारात येऊ लागला. वर्षभर बाजारात डाळिंबाची आवक कमी असल्याने तुलनेत दर चांगले मिळायचे. मागील वर्षी निर्यातक्षम मालाला प्रति किलो २५० रुपयांवर दर मिळाले होते..Pomegranate Farming: डाळिंब उत्पादनात २५ टक्के घटीचा अंदाज.त्यानुसार यंदा गुणवत्तेच्या मालाला महानगरांमध्ये पसंती असली तरीही दुय्यम प्रतवारीच्या मालाला उत्तर भारतात प्रामुख्याने मागणी असल्याचे डाळिंब उत्पादकांनी सांगितले. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र पवार म्हणाले, की पूर्वी लागवड क्षेत्र जास्त होते. तेलकट व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने ते कमी झाले. .आता पुन्हा महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात व राजस्थान येथे क्षेत्र वाढले आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर, निर्यातक्षम व ‘रेसिड्यू फ्री उत्पादन’ हाच पर्याय समोर दिसतो आहे. यंदा उत्पादनात वाढ झाली तर तुलनेत कमी दराने खरेदी झाली. मात्र गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणाऱ्यांना दरांमध्ये फायदा झाला आहे..Pomegranate Farming: गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादनासाठी प्रयत्न.मागणी संतुलित ठेवण्याचा प्रयत्नधुळे जिल्ह्यातील काळगाव (ता. साक्री) येथील प्रगतिशील डाळिंब उत्पादक कृषिभूषण संजय भामरे म्हणाले, की मे महिन्यापासून पाऊस कायम असल्याने यंदा अडचणी वाढल्या. त्यात आर्द्रता ८० टक्क्यांपर्यंत कायम राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. यापूर्वी प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात आंबिया बहर उत्पादन घेतले जायचे. मात्र दर चांगले मिळत असल्याने अन्य डाळिंब उत्पादक पट्ट्यात देखील उत्पादन वाढते आहे. त्यामुळे मागणीवर काहीसा परिणाम दिसून आला आहे. त्यानुसार बाजारात आवक दाटणार नाही व ती संतुलित राहील असे नियोजन केले जात आहे..मागणी व पुरवठाडाळिंबाचा आकार, रंग, चकाकी व एकंदरीत प्रतवारीनुसार वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये मागणी वेगवेगळी आहे. साधारण ५०० ते ७०० ग्रॅम मोठ्या आकाराच्या निर्यातक्षम मालाला प्रामुख्याने बांगलादेश व नेपाळमध्ये मागणी असून पुरवठा होत आहे. देशांतर्गत मुंबई, कोलकता, बंगळूर हैदराबाद व चेन्नई या बाजारातही चांगला उठाव आहे. मागील काही दिवसांत उत्तर भारतात जोरदार पाऊस झाल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. दरांत घसरण तर आवक वाढल्याचा हा परिणाम होता. आता मागणीत पुन्हा वाढ होऊन आवक स्थिर होईल असे दिसते. त्यामुळे आगामी काळात दरवाढीचे चिन्ह आहेत..लहान व मध्यम फळांसह दुय्यम प्रतवारीच्या मालाला उत्तर प्रदेशातील लखनौ, आग्रा,कानपूर, झाशी, वाराणसी या बाजारांमध्ये मागणी आहे. तसेच जयपूर, ग्वाल्हेर, सुरत, अहमदाबाद, बडोदा या बाजारपेठांमध्ये मागणीनुसार पुरवठा होत आहे. उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून पुरवठा होत आहे..ताज्या दरांची स्थिती (प्रति किलो रुपये)किमान कमाल सरासरीजुलै १२५ २०० १५०ऑगस्ट ८० १५० ११०सप्टेंबर ५० ११० ८० ते ९०रवींद्र पवार ९८२३०३३६००संजय भामरे ९७६४८०७७६५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.