संजय खंदारे Farming Innovative: सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेले ताणतणाव हे मोठे प्रश्न आहेत. अशा काळात पारंपरिक ज्ञान, संशोधन आणि जिद्दीच्या बळावर शेतीत वेगवेगळे प्रयोग करत शेतकऱ्यांना नवा आशेचा किरण दाखविणारे नाव म्हणजे संजय मधुकर खंदारे. ‘हॅप्पी ट्री ॲग्रो’च्या माध्यमातून त्यांनी सेंद्रिय शेती आणि जिवाणू कल्चरचा संगम घडवत शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी पर्याय उभा केला आहे..संजय मधुकर खंदारे यांचा जन्म एका पारंपरिक व्यावसायिक कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सायन येथील डीएस हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी घाटकोपर येथील के. जे. सोमय्या कॉलेजमधून बी.कॉम. पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या पारंपरिक लेदर व्यवसायात पाऊल टाकले. हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबात तब्बल अकरा पिढ्यांपासून सुरू आहे. लहानपणापासूनच त्यांचा कल ‘एअरफोर्स’मध्ये जाण्याचा होता. देशसेवेची भावना आणि शिस्तप्रिय जीवनशैलीकडे त्यांचा ओढा होता. मात्र काही शारीरिक मर्यादांमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. तरीही त्यांनी हार न मानता एनसीसी कॅम्पमध्ये पाच वर्षे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून त्यांच्या अंगी आलेली शिस्त, चिकाटी आणि नेतृत्वगुण पुढे त्यांच्या व्यवसायात आणि शेतीतील प्रयोगांमध्ये उपयोगी ठरले..Farmer Success Story: भांगे- पाटील यांच्या हुरड्याची दिल्लीपर्यंत ओळख.शेतीकडे वळण्यामागील प्रेरणालहानपणापासूनच संजय खंदारे यांच्या मनात शेती आणि मातीविषयी आकर्षण होते. निसर्गाशी जोडलेले जीवन, स्वतः काहीतरी नवे निर्माण करण्याची इच्छा आणि ग्रामीण भागाशी असलेली ओढ यामुळे त्यांनी शेती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. ‘हॅप्पी ट्री ॲग्रो’ या कंपनीची स्थापना ही केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी करण्यात आली. त्यांच्या ‘केके मँगो फार्म’ या उपक्रमांतर्गत ‘केके मँगो’ या ब्रँडद्वारे त्यांनी मुंबई बाजारपेठेत आंब्यांची विक्री सुरू केली..वडिलांच्या मार्गदर्शनाखाली २०२० मध्ये संजय खंदारे यांनी झरे (ता. आटपाडी, जि. सांगली) गावात स्वतःच्या शेतात पाच हजार केसर आंबा कलमे लावली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. मात्र पुढील दोन वर्षे कलमांची वाढ झाली नाही. अनेक उपाय करूनही अपेक्षित परिणाम मिळत नव्हते. या अपयशामुळे संजय आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये निराशा पसरली. या शेती प्रकल्पावर सुमारे २५ लाख रुपयांची गुंतवणूक झाली होती. .अखेर त्यांच्या वडिलांनी बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र याच क्षणी संजय यांनी हार मानली नाही. त्यांनी कुटुंबीयांना विश्वास दिला मला माझ्या पद्धतीने प्रयोग करू द्या, मी यावर नक्कीच शाश्वत मार्ग काढेन. यानंतर संजय यांनी सखोल अभ्यास सुरू केला. त्यांनी प्राचीन भारतीय शेती पद्धतींचा अभ्यास केला. रासायनिक खतांचा वापर सुरू होण्यापूर्वी शेती कशी केली जात होती, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला..या अभ्यासातून त्यांना एक महत्त्वाची गोष्ट समजली ती म्हणजे, मातीतील उपयुक्त जिवाणू कल्चर हेच शेतीचे मूळ आहे. जमिनीतील उपयुक्त जिवाणू योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे सक्रिय असतील, तर शेती नैसर्गिक पद्धतीनेही भरघोस उत्पादन देऊ शकते. याच विचारातून त्यांनी सेंद्रिय शेती आणि जिवाणू कल्चर यांचा समन्वय साधत एक नवीन उत्पादन विकसित केले..Farmer Success Story: वीस वर्षांपासून शेतीत ‘बिनहाती’ झुंज....‘जीवामृतधारा’चा जन्मसंजय खंदारे यांनी विकसित केलेल्या उत्पादनाचे नाव जीवामृतधारा असे ठेवले. हे उत्पादन मातीची सुपीकता वाढविणारे, झाडांची वाढ सुधरविणारे आणि मुळांना बळकट करणारे आहे. हे उत्पादन पूर्णतः सेंद्रिय तत्त्वांवर आधारित असून, त्यामध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त जिवाणूंचा समावेश आहे. प्रत्येक जिवाणू विशिष्ट कार्य करतो. काही जिवाणू पोषकद्रव्ये तयार करतात, काही मातीचा पोत सुधरवतात, तर काही झाडांच्या वाढीस मदत करतात. या उत्पादनासाठी त्यांनी पेटंटसाठी अर्ज देखील केला आहे, जे त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता दर्शविते..व्यवसायाचा विस्तारसंजय खंदारे यांनी ‘हॅप्पी ट्री ॲग्रो’ या माध्यमातून ‘बी टू सी’ मॉडेलवर काम सुरू केले. त्यांच्या उत्पादनाचा थेट वापर शेतकरी करतात. सुरुवातीला शून्य गुंतवणुकीपासून सुरू झालेला हा प्रवास आज मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. आज अनेक शेतकरी जीवामृतधाराचा वापर करून आपल्या शेतीत सकारात्मक बदल अनुभवत आहेत. उत्पादनात वाढ, मातीची सुधारलेली गुणवत्ता आणि खर्चात घट या गोष्टींमुळे शेतकरी समाधानी आहेत..व्यवसायाच्या पलीकडे जाऊन संजय खंदारे यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. नैराश्यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना ते मोफत मार्गदर्शन करतात. शेतीतील विविध समस्यांवर उपाय सांगतात, आपल्या संशोधनाचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि आत्मविश्वास वाढला आहे..कुटुंबाचा आधारसंजय खंदारे यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. आई शिला खंदारे आणि वडील मधुकर खंदारे यांचा आशीर्वाद, तसेच मित्रपरिवाराची साथ यामुळेच ते या प्रवासात ठाम राहू शकले. ते नेहमी सांगतात, की संघर्षाच्या काळात कुटुंबाची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. संजय खंदारे यांची वाटचाल ही जिद्द, संशोधन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा उत्कृष्ट नमुना आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विचारांचा समन्वय साधत त्यांनी शेतीत एक नवा मार्ग दाखविला आहे. आजच्या काळात, जेव्हा शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत, तेव्हा संजय यांच्यासारखे प्रयोगशील उद्योजकच शेतकऱ्यांना नव्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. त्यांच्या कार्यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर संपूर्ण समाज अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे..डिजिटल क्षेत्रात वेगळी ओळख२०१२ मध्ये संजय खंदारे ‘Being Marathi Recipes’ या नावाने यू-ट्यूब चॅनेल सुरू केले. या चॅनेलवर पारंपरिक मराठी रेसिपीज त्यांच्या इतिहासासह सादर केल्या जातात. आज या चॅनेलचे सुमारे ३.५ लाख सबस्क्राइबर्स असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे..‘जीवामृतधारा’ची वैशिष्ट्येमातीचा पोत सुधारतो, एकरी खर्चात घट.मुळांना बळकटी मिळते, उत्पादनात वाढरासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी.पूर्णतः सेंद्रिय व पर्यावरणपूरक, सर्व पिकांसाठी उपयुक्त..‘शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर तो जीवनाचा आधार आहे. मी स्वतः अनुभवले आहे, की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. दोन वर्षे झाडांची वाढ झाली नाही, तेव्हा खूप निराशा आली होती. पण त्या अपयशानेच मला शिकवले, की निसर्गाशी जुळवून घेतल्याशिवाय शेतीत यश मिळत नाही. आज ‘जीवामृतधारा’च्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवता येत आहे, हीच माझ्यासाठी सर्वांत मोठी समाधानाची गोष्ट आहे. पुढील काळातही अधिक संशोधन करून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि शाश्वत उपाय देण्याचा माझा प्रयत्न असेल.- संजय खंदारे, संस्थापक, हॅप्पी ट्री ॲग्रो८६९२८८०००७/९६१९८५३७४८happytreeagro@gmail.com.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.