Agriculture Success Story : परभणी शहराच्या उत्तरेस आठ किलोमीटवर साटला हे दुधना नदीकाठी वसलेले छोटे गाव आहे. लागवडीयोग्य तीनशे हेक्टर जमिनीपैकी जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित झाल्याने जमिनीचे क्षेत्र कमी झाले. खरिपात कपाशी, सोयाबीन तर बागायतीत हळद ही गावची प्रमुख पिके आहेत. रब्बीत हरभरा, ज्वारी,गहू आदी पिके घेतली जातात. खात्रीने पाऊस पडणारा भाग अशी परभणी जिल्ह्याची ओळख होती. परंतु अलीकडील वर्षांमध्ये हवामान बदल, पावसाची अनियमितता, उत्पन्न, दर आदींची जोखीम व समस्या तयार झाल्या. .त्यावर उपाय काढण्यासाठी गावाने पीकपध्दतीत बदल केला आहे. हळद हे जिल्ह्याचे पारंपारिक पीक आहे. मागील आठ-दहा वर्षांत जिल्ह्यातील हळद लागवड क्षेत्राचा विस्तार झाला. पूर्णा, परभणी, जिंतूर हे प्रमुख हळद उत्पादक तालुके असून अन्य तालुक्यांमधील शेतकरीही हळद लागवडीकडे वळू लागले आहेत. गावातील शेतकऱ्यांनी हळद, मिरची-आणि कोथिंबीर अशा मिश्र वा आंतरपीक पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यातून अर्थकारणाला बळकटी दिली आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र ३१० हेक्टर तर लागवडयोग्य क्षेत्र ३०२ हेक्टर आहे. हळदीखालील क्षेत्र ५० हेक्टर असून कपाशीखाली १४० हेक्टर क्षेत्र आहे. ट्रॅक्टर संख्या ८, मळणी यंत्रे ७, हळद शिजविणारी यंत्रे २ अशी काहीशी यांत्रिक सुविधा गावात आहे..Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन.पीकपध्दतीतील व्यवस्थापनसुधारित गादीवाफा (बेड), ठिबक सिंचन पध्दत, व्यवस्थापनात बदल यातून हळदीची हेक्टरी उत्पादकता वाढण्यास मदत झाली आहे. सेलम वाणाचा वापर होतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ड्रीपरच्या जवळ मिरचीच्या दोन बियांची टोकण नागमोडी (झिगझॅग) पद्धतीने होते. मिरचीचा हंगाम पोळ्यापासून सुरु होतो. तो पुढे सहा ते आठ महिने चालतो. हळद काढणीस आल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मिरची काढणीचे नियोजन पूर्ण होते. मार्च-एप्रिल मध्ये हळद काढणी सुरु होते. शेतकरी वाळवलेल्या हळदीचे एकरी २० ते ३० क्विंटलच्या दरम्यान उत्पादन घेतात..बाजारपेठा व विक्रीपरभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये मिरचीची विक्री होते.यंदा लागवड केलेल्या मिरचीचा तोडा सुरु झाला आहे.सध्या दररोज १५० ते २०० क्विंटल मिरची मार्केटमध्ये पाठविली जात आहे. आजवर सरासरी १० ते ३० रुपये प्रति किलो दर मिळाले आहेत. हळदीची विक्री वसमत तसेच जवळा बाजार (ता.औंढा नागनाथ) येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये केली जाते. यंदा हळदीला सरासरी प्रति क्विंटल ११००० ते १३००० रुपये दर मिळाले..सिंचन सुविधेमुळे बागायती क्षेत्रात वाढकाही वर्षापूर्वी मोजक्याच शेतकऱ्यांकडे विहिरी, बोअर हे सिंचन स्रोत होते. दुष्काळी वर्षात सिंचनासाठी पाणी अपुरे पडत असे. परंतु दुधना नदीवर समसापूर येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली. गावशिवारातून वाहणारा धामोडी नाला तसेच अन्य नाल्यांवर बंधारे बांधण्यात आले. त्यातून भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. दुधना नदीवरून पाइपलाइन झाल्या. त्यामुळे हळद तसेच रब्बी हंगामातील हरभरा,गहू आदींचे क्षेत्र वाढले कपाशी हे गावातील अन्य महत्त्वाचे पीक आहे. कपाशीची सघन लागवड पद्धतीने लागवड शेतकरी करतात. एकरी सरासरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कपाशीनंतर हरभरा,गहू ही पिके ते घेतात..Farmer Success Story : प्रयत्नवादातून प्रगतीकडे.कृ़षी विभागाच्या योजना...कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी आर.आर.रेंगे, सहायक कृषी अधिकारी प्रेम जाधव तंत्रज्ञान व शासकीय योजनांचा लाभ बांधावर पोचविण्यात आघाडीवर असतात. पंतप्रधान सिंचन योजना, यांत्रिकीकरणाचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. ‘आत्मा’ अंतर्गत भागवत काकडे यांच्या अध्यक्षतेखाली १० शेतकऱ्यांचा गट गट स्थापन झाला आहे. त्याद्वारे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत सहा हेक्टरवर पेरू लागवडीचे नियोजन केले जात आहे.प्रेम जाधव ८६६८९७२५७३ (सहायक कृषी अधिकारी)भागवत काकडे ९८५०७०७४६८ ( शेतकरी).मिश्र पीक पद्धती ठरली फायदेशीरगावात लहान-मध्यम शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शेतीत बहुतांश शेतकरी दांपत्य राबतात. त्यांच्यासाठी हळद-मिरची-कोथिंबीर ही मिश्र पीक पद्धती किफायतशीर ठरत आहे. आंतरपिकांमधून मुख्य पिकाचा म्हणजे हळदीचा खर्च कमी होत आहे. जमीन कमी असल्यामुळे अनेक शेतकरी पूराक म्हणून दुग्ध व्यवसाया करीत आहे. गावात सुमारे २० ते ३० पर्यंत म्हशी आहेत. दररोज १०० ते १५० लिटरपर्यंत दूध परभणी येथे पाठविले जाते. .आपला अनुभव सांगताना तुकाराम सानप म्हणाले की साडेनऊ एकरांपैकी सहा एकरांत हळद असते. त्यात मिरची, कोंथिबीर, सोयाबीन आदी पिके घेतो. हळदीचे एकरी २५ क्विंटल (सुकवलेले), सोयाबीनचे एकरी ६ ते ७ क्विंटल, मिरचीचे एकरी ४० ते ६० क्विंटल, कोथिंबिरीचे एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मी आणि पत्नी मंगल दोघेच बहुतांश कामे करतो. मजुरांची गरज शक्यतो भासत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होत आहे..आमची पाच एकर जमीन आहे. पाच वर्षापासून हळदीमध्ये मिरची, कोथिंबीर यांचे उत्पादन घेतो. त्यातून अर्थकारणाला गती मिळाली आहे.जगन्नाथ सानप ९९२३३९५५४१.तीन एकरांपैकी दरवर्षी एकरभर हळद व त्यात मिरची, कोथिंबीर असते. वर्षभर टप्प्याटप्प्याने ताजा पैसा हाती येतो. या पीक पद्धतीतून गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.भागवत काकडे.दहा एकरांपैकी चार एकरांत हळद मिरची घेतो. मिश्र पीक पद्धती परवडते आहे. कमीत कमी दर मिळाले तरी एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.दत्तराव सानप.पाच एकरांत हळद हे मुख्य पीक आहे. सोबत चार आंतरपिके घेतो. पंधरा वर्षांपासून दुग्धव्यवसाय करतो. सहा म्हशी आहेत. दररोज ३० ते ४० लिटर दूध मिळते. पूरक व्यवसायामुळे आर्थिक आधार दिला आहे.गोरखनाथ सानप.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.