Success Story: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खादगाव (ता. पैठण) येथील शेतकऱ्यांनी सुधारित पीकपद्धती, वाणबदल व फळपिके यांना प्राधान्य देत प्रयोगशीलतेकडे वाटचाल केली आहे. गावात तुरीचे क्षेत्र झपाट्याने विस्तारले असून सुधारित वाणांचाही प्रसार झाला आहे. सिंचन बळकटीकरणातून ऊस तसेच नगदी फळपिके म्हणून मोसंबी, डाळिंबाला गावातील शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.