Honey Producer: पालघर जिल्ह्यातील आगर गावातील विनय पाटील यांनी पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर जात पूर्णवेळ मधमाशीपालनात करिअर उभारले. ‘विपानी बी हाऊस’ या ब्रँडद्वारे दर्जेदार मध विकत असून, ते मधमाशांच्या संवर्धन, संशोधन आणि जनजागृतीचे कामही मनापासून करतात.