Horticulture Success: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवणे (ता. देवगड) येथील प्रकाश शिर्सेकर यांच्याकडे एकेकाळी घरापुरते उत्पन्न मिळवण्याएवढीच शेती होती. मेहनत, सातत्य, दुग्ध व्यवसायाची जोड, आर्थिक नियोजन व बाजारपेठ हुशारी या गुणांतून त्यांनी बघता बघता शेतीचा विस्तार केला.