Agriculture Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा-आंबोली मार्गावर बांद्यापासून अवघ्या चार किलोमीटरवर वाफोली हे निसर्गसंपन्न गाव आहे. गावातील बहुतांशी शेतकरी भात, नाचणी, कुळीथ, चवळी आदी पिके घेतात. उन्हाळ्यात कलिंगड, भाजीपाला पिकेही दिसून येतात. गावापासून गोव्याची हद्द पाच- सहा किलोमीटरवर आहे. याच गावातील मधलीवाडी येथे सचिन बाबू सावंत यांचे घर आहे. संयुक्त कुटुंबाची सुमारे साडेपाच एकर तर स्वतःच्या नावाची ६३ गुंठे शेती आहे. काही जमीन कराराने घेतली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सचिन यांनी दहावी शिक्षणानंतर मुंबई गाठली. . दोन- तीन वर्षे खासगी कंपनीत अनुभव घेतल्यानंतर उच्च शिक्षणाची उणीव भासू लागली. नोकरीत असतानाच बारावीची परीक्षा ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. नोकरीची कसरत करीतच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुंबई व गोवा असा एकूण सोळा वर्षांचा अनुभव आयात- निर्यात विषयक कंपनीत घेतला. त्या काळात भाऊ गावी शेती पाहायचे. सन २०१८ मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे सचिन यांना गावी परतावे लागले. कोरोनाची लाट व नोकरीची अशाश्वती ही संकटे त्याच दरम्यान उभी राहिली. त्यामुळे आता मुंबईत नोकरीसाठी कधीच जायचे नाही. गावी राहून पूर्णवेळ शेतीच करायची असा निर्णय घेतला. .शेतीचे पद्धतशीर नियोजनशेतीत उतरण्याचा निश्चय केल्यानंतर पद्धतशीर नियोजनास सुरुवात केली. पाण्याची शाश्वती मिळवण्यासाठी स्वखर्चाने विहीर खोदली. दरम्यान, त्यास शासकीय अनुदान मिळते अशी माहिती मिळाली. कृषी विभागाकडे प्रस्ताव दिला. तो मंजूरही झाला. परंतु किमान अन्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा या हेतूने अन्य शेतकऱ्यांना प्रस्ताव करण्यासाठी भाग पाडले. पाण्याची सोय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पडीक जमीन सिंचनाखाली आली. पॉली मल्चिंग, ठिबक सिंचन आदींचा वापर सुरू केला. पारंपरिक भातपिकावर अवलंबून न राहता बहुविध व व्यावसायिक पीक पद्धतीचा अवलंब केला..Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती....अशी आहे व्यावसायिक पीकपद्धतीखरिपात सुमारे ७० गुंठ्यात भात असतो. एसआरआय पद्धतीने लागवड केली आहे. एकरी तीन टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येते. भात खरेदी- विक्री संघाकडून किलोला २३ ते २७ रुपयांपर्यंत दर मिळतो. वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये पाण्याची उपलब्धता पाहून काकडी, चवळी, दोडका, कारले, भोपळा, वाल, भेंडी आदी सुमारे ११ प्रकारचा भाजीपाला घेण्यात येतो. प्रातिनिधिक उदाहरण सांगायचे तर प्रति दिवसाआड दोडक्याचे पाचशे नग मिळतात. प्रति नग १० रुपये दर मिळतो. काकडीचे तीन हंगाम घेतले जातात. प्रति नग तीन रुपये दर मिळतो. प्रति दिन तीन हजारांपर्यंत काकडी मिळते. भाजीपाला पिकांपासून दीड लाखांहून अधिक उलाढाल होते. सुमारे दीड एकरांत ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात दर १५ दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने कलिंगडाची लागवड केली जाते.त्यामुळे मेपर्यंत विक्री सुरू राहते. दरांची जोखीम कमी करता येते. या पिकात सुमारे १० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. एकरी ८ ते १२ टनांपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. बारा ते १५ रुपये प्रति किलो असा दर मिळतो. दर अत्यंत कमी मिळण्याचे अनुभवही येतात..भाजीच्या केळीची शेतीसचिन यांनी जुन्या व नव्या अशा केळीच्या एकूण १२०० झाडांची लागवड केली आहे. ही केळी भाजी करण्याच्या दृष्टीने उपयोगात येते. साधारण नऊ महिन्यांनी त्याचे उत्पादन सुरू होते. प्रति झाड ५० ते ६० केळी उत्पादन मिळते. नगावर दर असतो. गोव्यातील म्हापसा बाजारपेठेत सचिन केळी विक्रीस घेऊन जातात. त्यास प्रति केळी १० रुपये दर मिळतो. या पिकापासून वर्षाला काही लाखांची उलाढाल होते. सचिन सांगतात की एक काढणी हंगाम संपला की पुन्हा कंदाची नव्याने लागवड करावी लागते. दरवर्षी १२०० ते १४०० पर्यंत झाडांपासून उत्पादन घेण्याचा प्रयत्न असतो. आंबा १०, काजू १५, नारळ १५, सुपारी ५० अशी झाडे आहेत. त्यांच्यापासूनही उत्पन्नाचा मोठा स्रोत तयार झाला आहे..सेंद्रिय पद्धतीवर भरआपल्यासह ग्राहकांना देखील रासायनिक अवशेषमुक्त अर्थात आरोग्यदायी अन्न खाण्यास मिळावे ही सचिन यांची इच्छा असते. त्यामुळेच ८० ते ९० टक्के ते सेंद्रिय पद्धतीने शेतीचे व्यवस्थापन करतात. सहा म्हशींचेपालन केले आहे. शेणापासून दोन युनिटद्वारे गांडूळ खत तयार केले जाते. जिवामृताची निर्मितीही केली जाते. सेंद्रिय निविष्ठांच्या वापरामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आहे..Agriculture Success Story: जिद्द सुनेला ‘सीए’ करण्याची.....दुचाकी ते चारचाकीपर्यंतचा प्रवाससचिन बी.कॉम.चे तर पत्नी सना एलएल.बी.च्या पदवीधर आहेत. दोघेही शेतीत मनापासून काम करतात. दांपत्याला शेतीत आई मंगला, वहिनी सेजल यांचीही मोठी मदत होते. सचिन यांनी मुले कियांश, रिवानव पुतण्या रिधित शालेय शिक्षण घेतात. पूर्वी शेतमालाची काढणी झाल्यानंतर हे दांपत्य ऊन, वारा, पाऊस, थंडी अशी कोणतीही तमा न बाळगता दोन दुचाकींवरून शेतमाल घेऊन म्हापसा बाजारपेठेत जायचे. .एक दिवसाआड येऊन जाऊन करण्याचे हे अंतर ९० किलोमीटरच्या आसपास आहे. शेतातील उत्पादन जसे वाढू लागले तसे त्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले. असा प्रकारे दुचाकी ते चारचाकी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. विहीर खोदणे असो, वाहन घेणे असो की घरातील सर्व दैनंदिन खर्च असोत शेतीतील उत्पन्नातूनच कुटुंबाला आर्थिक प्रगती करता ली आहे. यंदा घराचे नूतनीकरणही केले आहे.सचिन सावंत ७५८८४८३३४२, ८२७५३१५०२०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.