अभिजित डाकेProcessing Industry Success: जत तालुक्यात बिरुळ (जि. सांगली) येथील कोडलकर यांच्या तीन पिढ्यांनी दुष्काळाचे चटके सोसले. जगण्यासाठी ऊसतोड व अन्य मजुरी केली. मोठा संघर्ष केला. आज कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील दिलीप यांनी सर्व अडचणींवर मात करीत जिद्दीने प्रक्रिया उद्योगातून कुटुंबाचे नाव मोठे केले आहे. ‘यश’ ब्रॅंडने डाळ, बेसन आणि पशुखाद्याच्या निर्मितीतून वर्षाला तीन कोटींच्या उलाढालीचा पल्ला गाठून उत्पादनांच्या ब्रॅंडनेमप्रमाणे यशाला गवसणी घातली आहे. .सांगली शहरापासून वीस किलोमीटरवर सांगली- उरूण ईश्वरपूर राज्य मार्गावर कृष्णा नदीच्या काठावर कारंदवाडी (ता. वाळवा) गाव वसले आहे. ऊस आणि हळद ही इथली दोन प्रमुख पिके. गावातील कोडलकर कुटुंबाची तिसरी पिढी दिलीप यांच्या रूपाने येथे वास्तव्यास आहे..हे कुटुंब मूळ जत या दुष्काळी तालुक्यातील. सन १९७२ चा दुष्काळाचा काळ त्यांच्यासाठी फारच खडतर होता. विहिरी कोरड्या पडल्या होत्या. कित्येक जण स्थलांतर करीत होते. दिलीप यांचे आजोबाही कारंदवाडीत आले. येथील सहकारी साखर काखाख्यान्याकडे ऊसतोड मजूर म्हणून कामाला लागले. पुढे दिलीप यांचे वडील यशवंत आणि स्वतः दिलीप यांनीही अविरत कष्ट सुरू ठेवले. ऊसतोडणीची कामं केली..Agriculture Success Story: ज्योतीताईंनी शोधल्या प्रगतीच्या वाटा.उद्योगाकडे वाटचालप्रतिकूल परिस्थितीत दिलीप यांनी अर्थशास्त्र विषयातून बीएची पदवी घेतली. उरूण ईश्वरपूर येथील एका संस्थेत नोकरी मिळाली. पण मोबदला तुटपुंजा होता. पण पडत्या काळात हाताशी दोन पैसे येत असल्याने चेहऱ्यावर समाधान होते. कामानिमित्त भटकंती करावी लागली. वेळप्रसंगी पुणे, मुंबईला जावे लागे. या काळात शेतकऱ्यांचे प्रक्रिया व्यवसाय पाहण्याची संधी मिळाली. त्यातून प्रेरणा जगली..आपणही व्यवसाय सुरू करावा, स्वतःसह इतरांना रोजगार द्यावा असा विचार आला. अनेक पर्याय शोधताना डाळींना असलेली मोठी मागणी लक्षात आली. डाळ मिल उभारण्याचे नक्की केले. परंतु भांडवलाचा अभाव होता. पुरेसा अभ्यासही नव्हता. नुसतेच विचार करीत राहिलो तर ध्येय कधीच पूर्ण होणार नाही हे उमजून प्रत्यक्ष कृतीस सुरुवात केली. अकोला जिल्ह्यात डाळ मिल उद्योगांचा विस्तार झाला आहे. दिलीप थेट तेथे पोहोचले. तेथील मोठ्या डाळ मिलमध्ये नोकरीला लागले. त्यातून हरभरा खरेदीपासून ते दर्जेदार डाळनिर्मितीपर्यंतची सारी प्रक्रिया प्रत्यक्ष शिकता आली..बेसन व पशुखाद्य निर्मितीदिलीप सांगतात, की एकाच गोष्टीवर अवलंबून राहिलो नाही. वेगवेगळे प्रयोग करीत राहिलो. पहिल्या प्रतीच्या डाळीची विक्री व्हायची. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या ग्रेडच्या डाळीला अपेक्षित दर मिळत नव्हता. अशावेळी बेसन तयार करण्याची संधी लक्षात आली. सन २०२१ मध्ये यश फ्लोअर मिल या नावाने हा व्यवसाय सुरू करण्यास पत्नी विद्या यांनी पुढाकार घेतला..त्याचबरोबर प्रक्रियेतील उपपदार्थांपासून पशुखाद्य निर्मितीला चालना मिळाली. कुटुंबाचा ३५ एचएफ गाईंचा गोठा व दुग्ध व्यवसायही आहे. प्रति दिन २१० लिटर दुधाचे संकलन होते. गाईंना घरचेच पशुखाद्य दिले जात असल्याने बाजारातील खाद्याच्या तुलनेत किलोमागे किमान १५ रुपयांची बचत करणे शक्य झाले आहे. शिवाय दुग्ध व्यवसायातील उत्पन्नातील हिस्सा प्रक्रिया उद्योगात वापरता येत आहे..Agriculture Success Story: जिद्द सुनेला ‘सीए’ करण्याची.....तयार केल्या बाजारपेठाडाळ व बेसनला बाजारपेठा मिळविणे सोपे नव्हते. प्रस्थापित ब्रॅंडसोबत स्पर्धा होती. अशावेळी गावपरिसरातील दुकाने, बझार, ग्रामस्थ यांच्याशी संपर्क केला. त्यांना नमुने दिले. हळूहळू ग्राहकांकडून उत्पादनांना विचारणा सुरू झाली. बेकरी व्यावसायिक, फरसाण, नमकीन पदार्थ तयार करणाऱ्या कारखानादारांकडून बेसनला मागणी येऊ लागली. आजमितीला पलूस, वाळवा, शिराळा आणि मिरज अशा चार तालुक्यांतील गावांत उत्पादनांची विक्री होते..डाळ, बेसन व पशुखाद्य या तीनही व्यवसायांमधून मिळून वर्षाला तीन ते सव्वातीन कोटींपर्यंत उलाढाल पोहोचली आहे. यश हा ब्रॅंड लोकप्रिय झाला आहे. दहा जणांना रोजगार दिला आहे. कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला असून, पलूस येथे दुसरा मोठा प्रकल्प उभा करण्याचे नियोजन आहे. परिसरातील हरभरा उत्पादकांकडून बाजारातील दरांनुसार कच्च्या मालाची खरेदी होते. त्याची गुणवत्ता चांगली असेल तर पुढील उत्पादनेही त्याच दर्जाची होतात..असा दिलीप यांचा अनुभव आहे. जागेवर खरेदी केल्याने शेतकऱ्यांच्या वाहतूक व अन्य खर्चातही बचत होण्यास मदत झाली आहे. व्यवसायासाठी सुमारे दोन कोटींची गुंतवणूक करावी लागली. पंतप्रधान अन्नप्रक्रिया योजनेतून दहा लाखांचे अनुदान मिळाले. सरकारी बॅंकेकडून कर्ज काढावे लागले. त्यासाठी वर्षभर प्रयत्न करावे लागले..विचारांची देवाण-घेवाण महत्त्वाचीव्यवसाय म्हणजे फक्त नफा-तोटा नाही. तर विचारांच्या देवाणघेवाणीतून त्याला पुढे न्यायचं असतं. प्रत्येक अडचणीत दिलीप, पत्नी व वडील एकत्र येतात. तोटा झाल्यास तो कसा, कुठे झाला? व्यवस्थापनामध्ये कोणत्या अडचणी येतात? आपले निर्णय कुठे चुकतात यावर विचार मंथन करतात. त्यातून पुढील मार्ग मिळत जातात. एकमेकांचा आधार असतो, तेव्हा संकटेही कमी भासतात असे दिलीप म्हणतात. विद्या म्हणतात, की उत्पादनांना ग्राहकांकडून पुन्हा पुन्हा मागणी येते. पुणे मुंबईतील ग्राहकांपर्यंत आमची उत्पादने पोचली आहेतच. पण त्यांच्या माध्यमातून ती परदेशातही पोचल्याचा अभिमान आहे. ग्राहकांचा प्रतिसाद नवी ऊर्जा देते..कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना...आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली. त्यासाठी शासकीय परवाने काढले. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी दोन- तीन वर्षांचा काळ गेला. सन २०२० च्या दरम्यान यश फूड प्रोसेसिंग या नावाने डाळ मिल सुरू झाली. यंत्रे अकोला येथून खरेदी केली. त्याच कंपनीकडून तीन महिन्यांसाठी प्रशिक्षित कामगार तैनात केला. त्यातून वडील यशवंत आणि पत्नी विद्या यांना डाळ तयार करण्याचे प्रशिक्षण देता आले..कुटुंबातील तिघेहीजण उद्योगासाठी अहोरात्र मेहनत घेऊ लागले. मेहनत आकारास येऊ लागली. मुळात एखादी नवी गोष्ट सुरू केली की ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ या प्रसिद्ध हिंदी गाण्यातील शब्दांप्रमाणे लोक नावे ठेवण्यास सुरुवात करतात. परंतु दिलीप यांनी लोकांच्या टीकेकडे लक्ष न देता उद्योगवाढीकडे लक्ष केंद्रित केले. पहिल्या प्रयत्नात यश कधीच मिळत नाही. त्यातच येणाऱ्या संकटांवर मात करण्याची चिकाटी हवी. डाळ मिल सुरू झाल्यावर पहिल्यांदाच मोठे नुकसान झाले. परंतु खंबीर राहून त्यावर मार्ग काढला.दिलीप कोडलकर ९५६१०००७९४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.