Rural Entrepreneurship Success : नांदेड शहरापासून दहा किलोमीटरवर खडकी (ता. जि. नांदेड) गाव आहे. येथील व्यंकटी ऊर्फ अमोल गोविंदराव कदम यांचे संयुक्त कुटुंब आहे. अमोल यांचे चुलते मारोतराव भोजजी कदम, वडील कै. गोविंदराव, सर्वात लहान चुलते लक्ष्मण अशा पहिल्या पिढीतील तीन भावांच्या कुटुंबाचा हा पसारा आहे. दुसऱ्या पिढीत अमोल यांच्यासह सख्खे व चुलतभाऊ मिळून सात भाऊ आहेत. एकत्रित व्यवहार आहे.वडिलोपार्जित शंभर एकर शेती आहे. त्यात सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा. ऊस, हळदअशी पिके असतात. .दुग्धव्यवसायाने वाट दाखवलीअमोल यांनी २०१८ मध्ये एलएलबीची पदवी घेतली. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात ते प्रॅक्टिस करू लागले. दरम्यानच्या काळात कोरोनाचे संकट उद्भवले. साहजिकच व्यवसायात अडथळे निर्माण झाले. अशावेळी शेतीनेच त्यांना पुढील दिशा दाखवली. शंभर एकर शेतीला व्यावसायिक पद्धतीच्या जनावरे संगोपनाची जोड देण्याचे ठरवले. कुटुंबाचा विस्तार मोठा असल्यामुळे घरी दुधासाठी दोन म्हशी असायच्या. त्यांच्यापासून दररोज १६ लिटर दूध मिळायचे. घरी वापरून शिल्लक दुधाची विक्री व्हायची. हळूहळू २०२० पासून आर्थिक नियोजन करीत म्हशींची खरेदी सुरू केली. पाच वर्षात जाफराबादी, बन्नी व मुऱ्हा या तीन जातींची संख्या गोठ्यात वाढू लागली. आजमितीला ४० दुधाळ तर ३५ गाभण म्हशी आहेत. तर ५० पर्यंत वासरे आहेत. शिवाय जातिवंत रेडाही पाळला आहे.नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही पद्धतीने रेतन केले जाते..Dairy Farming Success : दुधाच्या घागरीतून उमललेला आत्मसन्मान.गोठा व्यवस्थापनअमोल सांगतात की पहाटे पाच ते सहाच्या सुमारास दूध दहा किलोमीटवर असलेल्या नांदेड येथील डेअरीला पोचवायचे असते. त्यामुळे गोठ्यातील कामकाज पहाटे दोन वाजताच सुरू करावे लागते. उत्तर प्रदेशातील पाच मजूर कामास ठेवले आहेत. मजुरांसोबत पहाटे अमोल देखील कामास सुरवात करतात. पहाटे शेण काढण्याची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर खुराक देण्यात येतो. पहाटे तीनच्या दरम्यान दूध काढणीला सुरवात होते. सकाळी साडेपाच वाजता नांदेड शहरात त्याचा पुरवठा होतो. पहाटे साडेपाचच्या सुमारास पुन्हा शेण काढून म्हशींना धुतले जाते. त्यानंतर गव्हाण साफ करून पिण्यासाठी पाणीभरले जाते. दुपारच्या सत्रात पुन्हा सकाळचीच प्रक्रिया पार पाडली जाते. संध्याकाळी पाचच्या दरम्यान दूध नांदेडला पोचवले जाते..चाऱ्याची व्यवस्थाजनावरांची संख्या जास्त असल्याने चाऱ्याची दहा एकरांत व्यवस्था केली आहे. यातील सहा एकरांत नेपियर गवत आहे. सुमारे ३० ते ३५ कर ऊस आहे. त्यातील चार एकरांमधील उसाचा चाऱ्यासाठी वापर होतो. वर्षभर लागणारे हरभरा व गव्हाचे कुटार (भुसा) यांचा शंभर टनांपर्यंत साठा संकलित करून वर्षभर पुरेल असे नियोजन केले जाते. त्यासाठी कष्टही कमी नाहीत. हरभरा काढणीच्या हंगामात दररोज शंभर किलोमीटरवर असलेल्या धर्माबाद येथे वाहन पाठवून हे खाद्य दररोज संकलित करण्याचे काम केले जाते. दर महिन्याला तीन टन सरकी पेंड, तीन टन हरभरा चुन्नी, तेवढीच मका चुनी व अन्य खाद्य लागते. दुधाळ जनावरांना कॅल्शिअम कमी पडणार नाही याचीही व्यवस्था केली जाते..गोठ्याची सहा शेडमध्ये उभारणी‘टेल टू टेल’ या रचनेत गोठ्याचे सहा शेड उभारले आहेत. यामध्ये ४८ बाय तीस फूट ४० बाय १५ फूट व अन्य क्षेत्रफळ आकार आहेत. यातील एका शेडसाठी शंभर बांबू व दुसऱ्या शेडसाठी १२५ बांबू असा वापर करून त्यांच्यापासून तट्टी तयार केली आहे. नांदेड भागात उन्हाळ्यात तीव्र तापमान असते. अशावेळी शेडवरील लोखंडी पाइपवर बांबू तसेच या तट्ट्यांचा छप्पर म्हणून वापर केला आहे. या तट्ट्यांवर ५०० मायक्रॉन आकाराची ताडपत्री वापरली आहे..Dairy Farming Tips : गोपालनातील बारकावे अभ्यासून पैदाशीवर भर.जनावरांच्या आरोग्याची काळजीम्हशींच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. जेजेराम केंद्रे यांच्याकडे आहे. ते गोठ्याला भेट देऊन जनावरांची नियमित तपासणी करतात. यासोबतच वर्षभराचे लसीकरण वेळापत्रक पाळले जाते. खुराकही नैसर्गिकरीत्याच बनवलेलाच दिला जातो. यामुळे दुधाची प्रत उत्तम असते.दूध संकलन व विक्रीदररोज एकूण चारशे लिटरच्या आसपास दूध संकलन होते. कदम कुटुंबाची नांदेड येथे स्वतःची डेअरी देखील आहे. अमोल यांनी आपल्या जीजा या छोट्या मुलीचे नाव डेअरीला दिले आहे. सुमारे २०० लिटरच्या आसपास दुधाची थेट ग्राहकांना ८० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. उर्वरित दुधाचा पुरवठा स्थानिक खासगी डेअरीला केला जातो. एकूण खर्च वजा जाता महिन्याला सुमारे ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत नफा या व्यवसायातून होतो. जनावरांची विक्री शक्यतो केली जात नाही. न वर्षांपूर्वी पूर्णा रस्त्यावरजिजा पशुखाद्य विक्री केंद्र सुरू केले आहे. यामध्ये सर्व प्रकारचा पौष्टिक खुराकाची विक्री केली जाते.शेणखताची उपलब्धताशेतात मोठी विहीर बांधली आहे.शेण व मूत्र तसेच गोठा धुतल्यानंतरचे पाणी त्यात एकत्र आणले जाते. तेथून ते मडपंपाद्वारे शेतीला देण्यात येते. दरवर्षी १०० ते १२० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याचाही वापर स्वतःच्या शेतातच केला जातो. या सर्व व्यवस्थापनामुळे रासायनिक खतांवरील खर्च ५० टक्क्याने कमी झाला आहे. जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत मिळत आहे.कुटुंबाने उचललेली जबाबदारीदुसऱ्या पिढीच्या सातही भावांनी दुग्धव्यवसायातील कामे वाटून घेतली आहेत. त्यातून व्यवसायात सुसूत्रता निर्माण करता आली. एकमेकांवरील विश्वास, एकोपा जपता आला. अमोल खुराक खरेदी,गोठा व्यवस्थापन या बाबी पाहतात. त्यांचे मोठे सख्खे बंधू दत्ता म्हशीची देखभाल, दूध व्यवस्थापन,वाहतूक पाहतात. तर चुलतबंधूंमध्ये एमकॉम झालेले नागेश चारा व्यवस्थापन, बी.टेक. झालेले गणेश व डी.फार्मसी झालेले जनार्दन कदम डेअरी व दूधविक्री, डीएमएलटी झालेले राजेश पशुखाद्य व्यवसाय सांभाळतात. त्यांना शिक्षण सांभाळून अमोल यांचे चुलतबंधू रितेश मदत करतात.व्यंकटी ऊर्फ अमोल कदम ९५९५९ ९७१७०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.