Rural Entrepreneurship : गाढेजळगाव (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील अशोक व शोभा या गाडेकर दांपत्याची केवळ दीड एकर शेती आहे. दोन मुलांपैकी मोठा मच्छिंद्र बारावीपर्यंत शिकलेला तर धाकटा आकाश कृषी पदवीपर्यंत शिकलेला आहे. मच्छिंद्र यांची पत्नी कीर्ती कला शाखेची पदवीधारक असून, आकाश यांची पत्नी सुषमा यांनी इलेक्ट्रिकल विषयात आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. मच्छिंद्र यांना जानव्ही, साई व राम ही मुले, तर आकाश यांना भाविक हा मुलगा आहे. .आर्थिक घडी केली मजबूतकेवळ दीड एकर शेती असल्याने उत्पन्नाला मर्यादा होत्या, कुटुंबाचं जिणं हातावरच अवलंबून होतं. प्रसंगी अशोक व शोभा या दांपत्यानं मोलमजुरी केली. मुलं मोठी होत गेली तसतशी त्यांची मदत होऊ लागली. मच्छिंद्र यांनी छत्रपती संभाजीनगर येथील इलेक्ट्रिकल दुकानात बारा वर्षे नोकरी केली. आकाशयांचे कृषी शाखेतीलच शिक्षण असल्याने त्यांनी आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेती कसण्यास सुरुवात केली. पारंपरिक पिकांपेक्षा बाजारपेठेत मागणी कायम राहील व वर्षभर उत्पन्न सुरू राहील या पद्धतीने अभ्यासातून फुलशेतीचा पर्याय कुटुंबाने निवडला. गुलाब, झेंडू, शेवंती, गलांडा, बिजली आदी अशी विविध फुलपिके घेण्यास सुरुवात केली. कुटुंबातील सर्वांच्या एकत्रित परिश्रमातून फुलशेतीत जम बसू लागला. पंधरा वर्षांच्या या सातत्यपूर्ण कामातून व अनुभवातून आज या कुटुंबाने फुलशेतीतून कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत केली आहे. गुलाब, गलांडा बारा महिने, झेंडू, शेवंती जून ते डिसेंबर, तर बिजली नोव्हेंबर ते एप्रिल असे लागवड व उत्पादनाचे नियोजन बसवले आहे. फुलांच्या विक्रीसाठी घरून व करमाड येथे महामार्गानजिक छोटे केंद्र सुरू करून थेट विक्रीचाही प्रयत्न केला. मात्र कुटुंबाला मजबूत आर्थिक आधार देण्याइतकी उत्पन्नाची हमी त्यातून मिळत नव्हती..Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’.फुलांचे केले मूल्यवर्धनफुलशेती चांगली फायद्यात आणायची तर मूल्यवर्धन केले पाहिजे असे कुटुंबाला वाटू लागले. त्यातूनच मग छोटे हार तयार करण्यास सुरवात झाली. आकाश यांनी बुके तयार करण्याचे प्रशिक्षण मित्राकडे जाऊन घेतले. सुरुवातीला ग्राहकांचा प्रतिसाद अल्पच होता. मात्र ग्राहक जोडण्याची कला दोन्ही भावंडांनी चिकाटीने आत्मसात केली. प्रयत्नांना फळ आले. आज गाढे जळगावसह परिसरातील विविध २५ किलोमीटर परिसरातील गावांपर्यंत गाडेकर कुटुंबाने हार, बुके यांना मार्केट तयार केले आहे. लहान- मोठे व्यावसायिक, घरगुती तसेच वाहनचालक त्यांच्या हारांचे रोजचे ग्राहक बनले आहेत. या रूपाने दररोज ५०० व त्याहून अधिक हारांची विक्री होते. शेंद्रा एमआयडीसी येथील इस्कॉन मंदिरातही दररोज सहा मोठे हार पुरविण्यात येतात. सण व ग्राहकांची मागणी यानुसार हारांचे आकार व त्यानुसार २० रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत दर असतात. विवाहासाठी हाराच्या जोडीचे दर पाच हजार रुपयांपर्यंत असतात. सर्व प्रकारच्या मूल्यवर्धनासाठी दररोज ५० ते ६० किलो विविध प्रकारच्या फुलांची आवश्यकता भासते. घरच्या शेती व्यतिरिक्त बाहेरून देखील फुलांची खरेदी केली जाते. गणपती-गौरी उत्सवाच्या काळात मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढते. फूल उत्पादनात वर्षभरात कुठे खंड पडू नये यासाठी विहीर, बोअर व ठिबक सिंचन अशी सोय केली आहे..Flower Farming : पतीच्या समवेत शेती फुलवली, पुढे नेली.घरातील सर्वांची मदतघरातली सर्व कामे आटोपून कुटुंबातील सर्व महिला देखील हारनिर्मितीत व्यस्त होतात. रोजची कामे आटोपून दुसऱ्या दिवशीच्या ‘ऑर्डर’ची तयारी करण्याचीही मोठी जबाबदारी असते. घरातील सर्वांचे बळ शेतीत असल्याने मजूरटंचाईच्या आजच्या मुख्य समस्येवरही काही प्रमाणात मात केली आहे. कुटुंबातील चिल्ल्यापिल्ल्यांची देखील मदत होते. याविषयी शोभा म्हणाल्या, की घरातील मुलांना शाळा कण्यासोबतच फुलशेतीच्या कामात मदत करण्याची लहानपणापासूनच सवय आहे. शाळेतून आल्यानंतर ती देखील अभ्यासातून जमेल तसा वेळ आनंदाने त्यासाठी देतात. हार आणि अन्य साहित्य निर्मितीतून आम्ही केवळ व्यवसाय पाहिलेला नाही तर देवाची सेवा करण्याचे भाग्यही आम्हाला लाभले आहे..सजावटीतही घेतली उडीकेवळ फुले हार, बुके बनविण्यापुरते मर्यादित न राहता गाडेकर बंधूंनी फुलांची सजावट (डेकोरेशन) करून देण्याच्या व्यवसायातही उडी घेतली. मंदिर, पुतळे, वाहने, गृहवास्तू, विवाहस्थळ व अन्य कार्यक्रम आदी ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करून देण्यात येते. त्यासाठी तीन हजारांपासून ते पुढे दर आकारण्यात येतात. आज गावात गाडेकर यांचे संत सावता फूल भंडार हे फूल विक्रीचे एकमेव केंद्र आहे. हा व्यवसाय कुटुंबाच्या अर्थकारणाचा मुख्य कणा बनला आहे. त्यातून कुटुंबाला चांगली आर्थिक प्रगती व सामाजिक प्रतिष्ठा साधता आली आहे. मात्र सुरुवातीला त्यासाठी संघर्षही बराच करावा लागला आहे. छत्रपती संभाजी नगर मार्गावरील सर्व हार, फुलांची पोहोच करण्याचे काम मच्छिंद्र तर गाढे जळगाव ते जालना मार्गावर ही पोहोच करण्याचे काम आकाश करायचे. वडील करमाड येथील फूल भंडाराचे काम सांभाळायचे. आज वाहतुकीसाठी रिक्षा घेणे शक्य झाले. करमाळा येथे प्लॉट खरेदी करता आला. छोटेखानी इलेक्ट्रिकलचे दुकान थाटता आले.आकाश गाडेकर ७७७४८४१४०३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.