Success Story: पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील तरुण शेतकरी समीर उत्तम काळे यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक विचारांची जोड देत पेरू शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीतच संधी शोधण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.