Rural Success Story: सातारा जिल्ह्यातील कालेटेक (ता. कऱ्हाड) या छोट्या गावातील दिव्या नारायण यादव यांनी पशुखाद्य निर्मिती करून यशस्वी उद्योजिका म्हणून आपली ओळख तयार केली आहे. शेतीची आवड, पशुपालनाची जाण, दृढ इच्छाशक्ती, गुणवत्ता आणि कुटुंबाचे सहकार्य या गोष्टींच्या बळावर त्यांनी व्यवसायाचा आलेख उंचावला आहे. श्री. दिव्यजीत ॲग्रोवेट हा पशुखाद्याचा ब्रॅण्ड लोकप्रिय केला आहे..आज अनेक शेतकरी महिला केवळ शेतीपुरत्या मर्यादित न राहता शेतीपूरक तसेच प्रक्रिया उद्योगात पुढाकार घेऊन हे क्षेत्र गाजवू लागल्या आहेत. स्वतःबरोबर त्यांनी अन्य महिलांसाठी देखील रोजगार निर्माण केला आहे. सातारा जिल्ह्यात महिला देखील त्यात मागे नाहीत. कऱ्हाड तालुक्यातील कालेटेक येथील दिव्या नारायण यादव यांनी याच पद्धतीने पशुखाद्य उद्योगात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. पाटण तालुक्यातील डोंगरी येळेवाडी गावातील आर्थिक गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिव्या यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. माध्यमिक शिक्षण काळगाव येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण आचरेवाडी येथे त्यांनी पायी प्रवास करून पूर्ण केले. एफवाय बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण कऱ्हाड येथे घेतले..Farmer Success Story : भाताला भाज्या-केळीची जोड शेतीचे अर्थकारण झाले गोड .विवाहानंतरची जबाबदारीसन २०१५ मध्ये कालेटेक येथील नारायण जयवंत यादव यांच्याशी दिव्या यांचा विवाह झाला. सासरी घराची जबाबदारी सांभाळण्यासह शेती व जनावरांच्या गोठ्यातील कामांमध्येही त्यांचा पुढाकार राहिला. पती नारायण यांनी डेअरी पदविका घेतली असून ते पशुसेवा देतात. या व्यवसायातूनच दर्जेदार पशुखाद्याची आवश्यकता व मागणी याबाबत अधिक माहिती दिव्या यांना होत गेली..त्यातूनच त्यांना पशुखाद्य निर्मितीची संधी दिसली. पुढाकार घेऊन आपणच या व्यवसायाची जबाबदारी सांभाळावी असे त्यांना वाटू लागले. घरच्यांनीही त्यांच्या या निर्णयाला होकार दिला. मग पुणे, दहिवडी, बारामती आदी भागांत असलेल्या व्यवसायांना भेटी देण्यास त्यांनी सुरुवात केली. आवश्यक कच्चा माल, यंत्रे तसेच खाद्यनिर्मितीतील बारकावे त्यांनी समजून घेतले. व्यवसायाच्या सखोल माहितीसाठी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेतून सातारा येथे तीनदिवसीय तसेच अन्य महिला उद्योजकता प्रशिक्षण घेऊन स्वतःमधील कौशल्याला चालना दिली..व्यवसायाला झाली सुरुवातसुरुवातीला कमी खर्चात व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी घरासमोर पूर्वी असलेल्या पीठगिरणी इमारतीतील मोकळ्या जागेचा वापर केला. घरची दोन लाख रक्कम तर बँकेचे तीन लाख कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध केले. सन २०२२ मध्ये श्री दिव्यजीत ॲग्रोवेट या नावाने सुरुवात झाली. मिक्सर, ग्राइंडर, पॅलेट यंत्र, १२ फुटी स्क्रू कन्वेअर आदींची खरेदी केली. सांगली, बारामती, उंब्रज तसेच हरियाना, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतूनही कच्चा माल मिळवला..पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून उत्पादनास सुरवात झाली. शासनाचे अनुदानही मिळाले. कच्च्या मालाच्या गुणवत्तेबाबत कधीच तडजोड केली नाही. कारखाना व गोदामात रसायनांचा वापर न करता यांत्रिक पद्धतीने ‘पेस्ट कंट्रोल’ केले. निर्मिती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे लोखंडी कण, तुकडे खाद्यात मिसळले जाऊ नयेत व जनावरांना इजा पोचू नये यासाठी यंत्रात लोहचुंबकाचा वापर केला. मका, मिनरल मिक्शर, मोहरी, शेंगदाणा पेंड आदींचा वापर करून पशुखाद्याची निर्मिती केली जाते..Farmer Success Story : व्यावसायिक वृत्ती जोपासून मिळवली समृद्धी.व्यवसायाचा आलेखपन्नास किलो प्लॅस्टिक बॅगेत पॅकिंग केले जाते. सहा विक्रेत्यांच्या माध्यमातून विक्री व्यवस्था तयार केली आहे. गोठ्यातूनही थेट विक्री होते. व्यवसायाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आत्तापर्यंत पाच हजारांहून अधिक बॅग्जची विक्री झाली आहे. पहिल्या वर्षी नऊ लाख, दुसऱ्या वर्षी ११ लाख तर तिसऱ्या वर्षी म्हणजे यंदा साडेअकरा लाखापर्यंत उलाढाल करण्यापर्यंतचा पल्ला गाठला आहे. गावातील दोन व्यक्तींना रोजगारही दिला आहे.शेतीचे नियोजनपशुखाद्याचा व्याप सांभाळून शेतीमधील कामे देखील दिव्या करतात. पती नारायण, सासरे जयवंत, सासू मंदा असे कुटुंबातील सर्व सदस्य शेतात राबतात. नारायण व दिव्या यादव दांपत्याची जयेंद्र आणि श्रीयांश ही मुले शालेय शिक्षण घेत आहेत. कुटुंबाला प्रयोग करण्याची त्यांना आवड आहे. साई सरबती या लिंबू वाणाच्या ८३ झाडांची लागवड केली आहे. बागेत फळधारणा सुरू झाली आहे..नव्या बागेत आंतरपीक म्हणून मलबेरीची लागवड केली आहे. मधल्या पट्ट्यात निशिगंध लागवडीचा मानस आहे. पश्चिम बंगाल राज्यातील गोविंद भोग या भातवाणाचा प्रयोग करून कुटुंबाने आपल्याकडील प्रचलित जातीच्या बरोबरीने उत्पादन मिळवले आहे. ऊसशेती करताना जमीन सुपीकता जपली आहे. त्यात हिरवळीचे खत म्हणून ताग घेण्यात येतो. तीन गाई, म्हैस व दहा कोंबड्याचे संगोपन केले आहे. ट्रॅक्टरसह सर्व अवजारे असून यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. दिव्या यांनी ट्रॅक्टर चालविण्यात कौशल्य मिळवले आहे..कार्याचा सन्मानश्रीनिवास पाटील फाउंडेशनतर्फे कृषीलक्ष्मी साताऱ्याची या पुरस्काराने दिव्या यांना सन्मानित करण्यात आले आहे. मळाई ग्रुपकडून आदर्श शेतकरी व पशुपालन विभागांतर्गत पशुखाद्य निर्मिती तसेच कालेटेक ग्रामपंचायतीकडून महिला नव उद्योजिका असा गौरवही झाला आहे. सातारा आकाशवाणीतर्फे आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात मुलाखत झाली आहे. पशुखाद्य निर्मिती उत्पादनाची जबाबदारी दिव्या सांभाळतात..तर विक्री व कच्चा माल खरेदी यात पतींची मोठी मदत होते. घरच्या सर्वांचा भक्कम पाठिंबा असल्यानेच व्यवसायाला वेळ देणे शक्य झाले. पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. अकुंश परिहार, उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, कृषी अधिकारी नितीन सावंत, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ भूषण यादगीरवार यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. प्रकल्पास शासकीय अधिकारी, परिसरातील शेतकऱ्यांनी भेट देऊन व्यवसायाची प्रेरणा घेतली आहे.दिव्या यादव ७४४७७७४४८६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.