Inspirational Farmer Story: सातारा जिल्ह्यात कोयना खोऱ्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या वाळणे गावात दिलीपतात्या व लक्ष्मीबाई हे नलावडे दांपत्य राहते. कुटुंबाला एकत्र बांधून ठेवत अत्यंत कष्टपूर्वक दिलीपतात्यांनी फळबाग शेती विकसित केली. जमिनीचे सपाटीकरण, विहीर खोदाई, दगडी बांध घालून त्यावर फळलागवडीचे प्रयोग केले. विक्री किंवा व्यवसाय हा उद्देश त्यांनी कधीच ठेवला नाही. कोयनेच्या रानात प्रयोगशील शेती करणारा आनंदी माणूस अशीच त्यांची ख्याती झाली आहे. .सातारा जिल्ह्यातील कोयना खोऱ्यात महाबळेश्वर भोवतालच्या पर्वतरांगांमध्ये अनेक गावे वसली आहेत. भौतिक प्रगतीच्या जगापासून दूर या गावांपैकीच ‘वाळणे’ हे गाव. धरण झाल्यानंतर कोयना क्षेत्रातील अनेक गावांचे स्थलांतर झाले. मात्र डोंगरधारेत उंचावरील व चार वाड्या असलेले ६०० लोकसंख्येचे वाळणे गाव स्थलांतरापासून वाचले. सुमारे ६७ वर्षांचे दिलीप बाबूराव नलावडे ऊर्फ ‘तात्या हे या गावातील जिद्दी शेतकरी..गावातील वयोवृद्धांपासून अगदी तरुण शेतकरीही त्यांचे नाव आदरपूर्वक घेतात. ‘कोयनेच्या रानात प्रयोगशील शेती करणारा आनंदी शेतकरी’ अशीच त्यांची ख्याती झाली आहे. दिलीपतात्यांची शेती पद्धती बघता पैशांची गरज भासते. पण त्यातून तसा पैसा मिळत नसला तरी पत्नी लक्ष्मीबाई, मुलगा अरुण, कन्या मंदा अशोक जाधव,.Agriculture Success Story: कोरोनात समजले प्रक्रियेचे महत्त्व .नंदा संदीप शिंदे, सीमा संजय शेलार हे कुटुंबातील सर्वजण तात्यांना भरभरून पाठिंबा देत असतात. दिलीपतात्या सांगतात की मुलगा अरुण याच दऱ्याखोऱ्यांत दहावीपर्यंत शिकला. पदवीधर झाला. आता मुंबईत व्यवसाय करतोय. मला मात्र मुंबईपेक्षा गाव आवडतं. शेती परवडत नसली तरी मी करीत असलेल्या प्रयोगांना मुलाचा पाठिंबा असतो. तो पैसा पुरवतो. तिन्ही मुलीही काळजी घेतात..शेतीसह आईचाही आशीर्वादगावात ५०-६० वर्षांपूर्वी शेती वगळता अन्य पर्याय नव्हते. शेती तोट्याची होती. त्यामुळे वडील बाबूराव मुंबईत गेले. वय झाल्यावर ते मुंबई सोडून पुन्हा गावी आले. त्यांच्या पश्चात पत्नी म्हणजे माझी आई एकटी पडली. कारण माझा भाऊ बाळकृष्णचेही निधन झाले. आता मी ९५ वर्षीय आईचा (अनसूया आजी) सांभाळ करतो आहे. शेती आणि आई असे दोघांचे आशीर्वाद असल्याने परिवार सुखी आहे. तीस वर्षांपासून आजी गावाबाहेर पडलेल्या नाहीत. विशेष म्हणजे कुटुंबाची आठ एकर शेती आजीच्याच नावे ठेवली आहे. तात्यांचा हा वेगळा आदर्श म्हणावा लागेल..कुटुंबाने एकत्रित खोदली विहीरवाळणे गावासमोरील पाली गावच्या लक्ष्मीबाईंसोबत तात्यांची लग्नगाठ जुळली. दोघे जिद्दीने शेती करू लागले. दोन भागांत त्यांची शेती आहे. तात्या सांगतात की दहावीपर्यंत गावात शिकलो. शेतीला लागलो. तेव्हा भात, नाचणी, वरई अशी पिके घेत असे. पुढे मुंबईला दरमहा १६५ रुपये पगारावर ‘हेल्पर’ म्हणून कामाला लागलो. पण परवडेना म्हणून पुन्हा गावी आलो..कोयनेच्या बेसूर खोरे भागातील चार एकर शेतीचे रूप बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काही मजूर आणि आम्ही पती-पत्नीने जमीन सपाट केली. बांध घातले. विहीर खोदली. मुलगा, तिन्ही मुली देखील सतत दोन वर्षे राबल्या. फक्त ‘ब्लास्टिंग’ चे काम बाहेरून करून घेतले. पण विहिरीतील दगड काढून ते वाहून नेण्याचे कामही कुटुंबानेच केले. विहिरीला सोळा फुटांवर पाणी लागले. तेथे गहू आणि मग बटाट्याची शेती केली..Agriculture Success Story: असंख्य संकटातूनही फुलविले डाळिंबाचे स्वप्न.प्रयोगशील वृत्ती जपत राहिलोदिलीपतात्या आनंदाने अनुभव विषद करतात. एकदा ७० हजार रुपये खर्चून जिरॅनियमची लागवड केली. पण शुद्ध रोपे न मिळाल्याने प्रयोग फसला. पण निराश झालो नाही. जिद्दीने पुढील प्रयोगाला लागलो. त्यासाठी गावाकाठच्या दुसऱ्या शेतीच्या तुकड्याचा विकास करण्याचे ठरवले. तेथे जेसीबी यंत्राचा वापर न करता बैलांचा वापर केला. आठ एकरच्या जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती स्वतः राबून केली..पुन्हा घरच्याच मंडळींनी शेतीचे चार प्लॉट तयार केले. त्यावर सातशे झाडांची फळबाग उभारली. कांदा, बटाटा, लसूण, निळा कोबी, झुकिनी असे प्रयोग केले. रासायनिक अवशेषमुक्त असा हा भाजीपाला गावात विकायचो. पुण्यातून कोयनेच्या खोऱ्यात येणारी मंडळीही हा भाजीपाला घ्यायची. दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेतले. रोपेही त्यांच्याकडूनच घेतली..बांधावरील लागवडीचा प्रयोगबांधावरची फळबाग तयार करण्यासाठी सात फूट उंचीचा दगडी बांध उभारला आहे. त्यावर चार फूटरुंदीचा पट्टा केला. कोल्हापूर जिल्ह्यातील कण्हेरी मठात प्रयोगशील शेतकऱ्यांचे व्याख्यान ऐकून ही प्रेरणा मिळाली. बांध घालण्यासाठी दोन वर्षे लागली. पूर्वीच्या तीन बायतीन फूट अंतरावर खड्डे घेण्याच्या पद्धतीला फाटा दिला..कारण त्या नुसार झाडांची वाढ खुंटण्याचा धोका वाटला. गावातील जुनेजाणते शेतकरी फळांचे बी बांधावर पुरण्यास सांगत. तेच तंत्र विचारात घेतले. गावातील मित्र रघुनाथ सपकाळ यांनी जुन्या पद्धतीनुसार साडेसात हजार फळझा़डे लावली होती. ती शेती मीच सांभाळायचो. त्यासाठी शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला होता. नारळ, काजू, आवळा, आंबा अशी झाडे होती. परंतु पुढे या बागा कलत गेल्या. हा अनुभव लक्षात घेऊनच माझ्या शेतात तंत्र बदलले. त्यासाठी दगडाच्या तालीच्या बांधावर कलमाच्या पिशवी आकाराचे खड्डे तयार केले. त्यात झाडे लावत गेलो. कमी खोलीच्या खड्ड्यात लावलेल्या या कलमांच्या मुळ्या बांधावरच्या दगडात वेगाने खाली घुसून झाड ताकदीने चांगले उभे राहू लागले. बागा न कलल्याने हा प्रयोग यशस्वी झाला. यात चिकू, पेरू, आंबा, काजू, आवळा यांचा समावेश आहे..विक्री हा उद्देशच नाहीदिलीपतात्यांचा उतरत्या वयातील उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. ते दररोज बागेत राबतात. प्रत्येक झाडाकडे प्रेमाने पाहतात. विक्रीपेक्षा शेती करण्याचे समाधान त्यांना जास्त महत्त्वाचे वाटते. एका आवळा खरेदीदाराला त्यांनी सांगितले की माल आधी वापरून बघ. योग्य वाटला तर पुढील वर्षी पुन्हा खरेदी कर. मग पैसे दे. त्यांच्याकडे मोठ्या आकाराचा आंबा आहे. पंधरा ते १६ पोते भात होतो. मात्र तो विकत नाहीत. हळद, आले आहे. बहुतेक शेतमाल स्वतः आणि नात्यागोत्यातील मंडळींसाठी वापरण्यात येतो. विक्री हा उद्देशच नाही. मग तुम्ही म्हणाल की मी जगतो कसा? तर मुलगा आणि मुली पुरेसे पैसे पाठवतात. त्यामुळे दऱ्याखोऱ्यातील गावात आनंदाने प्रयोगशील शेती करणे शक्य झाल्याचे तात्या सांगतात..समूह शेतीची मुहूर्तमेढगावात तात्यांनी १६ शेतकरी मित्रांसोबत समृद्धी सेंद्रिय शेतकरी बचत गट स्थापन केला आहे. त्यातून हळद लागवड झाली आहे. तात्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई व अन्य महिलांनी मिळूनही महिला बचत गट तयार केला आहे. तात्या पाणी फाउंडेशनच्याही संपर्कात आहेत. त्यातून कंदवर्गीय शेतीचे धडे घेण्याचा संकल्प आहे. तात्यांची ही धडपड पाहून सेवागिरी फाउंडेशनने त्यांना ‘आदर्श शेतकरी’ म्हणून विशेष पुरस्कार दिला आहे. गावातील शिक्षक अमोल विठ्ठल नलावडे कौतुकाचे दोन शब्द व्यक्त करताना म्हणतात की गावच्या शेतीत प्रयोगशीलता तात्यांनीच रुजवली. मी आणि पत्नी लक्ष्मी दोघेही गावात शिक्षक आहोत. गटातील शेतकऱ्यांची धडपड पाहून विविध योजना, तंत्रज्ञानाची माहिती पुरवत समूह शेतीला प्रोत्साहन देत आहोत.- दिलीपतात्या नलावडे ९४२३३२९९७२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.