Agriculture Success Story : वाशीम जिल्ह्यातील खरोळा येथे दीपक वारकड यांचे संयुक्त कुटुंब राहते. पारंपरिक पीकपद्धती, पूरक व्यवसाय, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, खर्चावर नियंत्रण आदी बाबींचा सुरेख मेळ साधत त्यांनी एकात्मिक शेती साधून विविध प्रयोग केले आहेत. उत्पादकता टिकवली आहे. रासायनिक निविष्ठांचा वापर ते अजिबात करीत नाहीत. आज वाशीम जिल्ह्यात त्यांची शेती अभ्यासाचे ठिकाण म्हणून पुढे आली आहे.सुभाषराव हे कुटुंबाचे प्रमुख. त्यांची सुरुवातीला साडेचार एकर शेती होती. मेहनतीच्या जोरावर त्यांनी ३०-३५ वर्षांत हे क्षेत्र १६ एकरांपर्यंत आणून ठेवले..त्यासाठी कुटुंबाची एकी महत्त्वाची ठरली आहे. सुभाषराव यांच्या कुटुंबात पत्नी नंदाबाई, मुलगा दीपक, त्यांची पत्नी दुर्गा, मुलगा सुनील, त्यांची पत्नी उमा व नातवंडे असा परिवार आहे. गरजेवेळीच मजुरांची मदत घेतली जाते. कुटुंब आठ ते १० वर्षांपासून रसायनमुक्त शेती पद्धतीत रमले आहे. खरिपात सोयाबीन, हळद तर रब्बीत हरभरा, गहू ही मुख्य पिके असतात. दोन एकरांत आंबा, चंदन, सीताफळ, फणस, चिकू, अंजीर, रामफळ अशी मिश्र फळबाग आहे..शेतातच सेंद्रिय निविष्ठांची निर्मितीखतनिर्मितीत बायोडायनॅमिक पद्धतीचा वापर होतो. याशिवाय जिवामृत, दशपर्णी अर्क, कडुनिंब अर्क यांचीही निर्मिती होते. सुमारे १५ म्हशी, चार गीर, एक जर्सी गाय, पाच वासरे आहेत. त्यापासून वर्षाला २५ ते ३० ट्रॉली शेणखत मिळते. त्यासह गोमूत्र, पिकांचे अवशेष यांच्यापासून उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार केले जाते. मागील वर्षी त्यासाठी ३५, तर यंदा ५० बेड्स तयार केले. प्रति बेडपासून दोन टन खत तयार होते. लवकरच शंभर बेड तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे रासायनिक खतांच्या वापरात बचत झाली आहे..Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती.यंत्र- तंत्राचा वापरवारकड कुटुंबाची शेती म्हणजे जणू प्रयोगशाळाच झाली आहे. पेरणीपासून ते मळणीपर्यंत लागणारी सर्व उपकरणे, ट्रॅक्टर, हळद उकळण्यासाठी बॉयलर, जिवामृत फिल्टर करणारी बॅग (बलून) अशी आधुनिक साधने त्यांच्या अंगणात दिसतात. प्रति ३०० लिटर ड्रममध्ये गोमूत्र, शेण, ताक, गूळ, जैविक अवशेष यांच्यापासून द्रावण तयार केले जाते. ते जिवामृत बॅगमध्ये सोडले जाते. त्यातून दर आठ दिवसाला एकरी २०० लिटर याप्रमाणे प्रत्येक प्लॉटला त्याचा वापर केला जातो. एका ड्रममध्ये गांडुळे सोडली असून, दररोज अर्धा ते पाऊण लिटर गांडूळ अर्क मिळतो. तो फवारणीद्वारे तसेच ठिबकद्वारे पिकांना देण्यात येतो. एकेकाळी रासायनिक निविष्ठांसाठी सव्वादोन लाख रुपये खर्च व्हायचे. आज हा खर्च जवळपास शून्यावर आला आहे. दीपक आज डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत गटाचे सदस्यही झाले आहेत..फळबागांची विविधतावारकड यांनी एकाच झाडावर तीन ते पाच प्रकारच्या जातीच्या आंब्याचे कलम करण्याचा प्रयोग केला आहे. दोन एकरांतील या आमराईत केसर, दशहरी, पायरी, हापूस अशी एकूण १०० पर्यंत झाडे आहेत. अलीकडेच उत्पादन सुरू झाले असून, ग्राहक थेट बांधावरून खरेदी करतात. त्यातून दोन- अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. याशिवाय प्रत्येकी १०० चंदन व सीताफळ, ५० हनुमान फळ, पाच अंजीर, प्रत्येकी पाच चिकू व रामफळ, पेरू अशी झाडे आहेत. आंब्याच्या झाडांवर त्यांनी स्वतः वेगवेगळ्या जातींचे कलमीकरण दीपक यांनीच केले आहे. आंब्याप्रमाणेच शेताच्या बांधावर उगवलेल्या सुमारे ३५ बोरझाडांचे संवर्धन केले आहे. त्यावर वेगवेगळ्या जातीचे कलम बांधून वर्षाला ३५ हजारांपर्यंत उत्पन्न घेतले जाते. त्यापासून वर्षाला हंगामात दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळते..Agriculture Success Story: जिद्द सुनेला ‘सीए’ करण्याची.....हळद उत्पादन सातत्यवाशीम जिल्हा हळद उत्पादनात अग्रेसर आहे. वारकड कुटुंबही दरवर्षी तीन ते चार एकरांत हळद पिकवते. एकरी २८ ते ३२ क्विंटलपर्यंत त्याची उत्पादकता टिकवली आहे. हळदीचे संपूर्ण व्यवस्थापन अर्थातच सेंद्रिय पद्धतीने केले जाते. बेडवर घेतलेल्या या हळदीत सोयाबीनचे आंतरपीक घेतात. त्याचे सात ते आठ क्विंटलपर्यंत एकूण उत्पादन मिळते. त्यातून मुख्य पिकाचा बराच खर्च निघून जातो..पूरक व्यवसायांचा आधारबहुविध पीक पद्धतीचा अंगीकार करताना कुटुंबाने अनेक वर्षांपासून दुग्ध व्यवसायही जोपासला आहे. दररोज ४५ ते ५० लिटर दूध खासगी डेअरीला देण्यात येते. देतात. सुभाषराव किराणा दुकान तसेच गावातील दुधाचे संकलन या जबाबदाऱ्या सांभाळतात. सुमारे ७५ पर्यंत देशी कोंबड्या पाळल्या आहेत. कुटुंबाचे किराणा दुकान आहे. त्या माध्यमातून दररोज ३० ते ३५ अंड्यांची १० रुपये प्रति नग या दराने विक्री होते. दररोज ताजा पैसा हाती येतो. कोंबड्या शेतात फिरून अळ्या, गोचिड वेचून गोठा स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.दीपक वारकड ९८३४२८७१४०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.