काळ्या तांदळाचा लागवड प्रयोग यशस्वी; दर मिळाला विक्रमी

औषधी गुणांनी युक्त असलेल्या काळ्या तांदुळाच्या शेतीच्या उत्पादनाचा तालुक्यातील भोळवली येथील तरुणांनी केलेला प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना काळ्या तांदुळाची लागवड करण्याची प्रेरणा व मार्गदर्शन भोळवलीतील यशस्वी प्रयोगामुळे उपलब्ध झाले आहे
Black Rice
Black Rice

मंडणगड : औषधी गुणांनी युक्त असलेल्या काळ्या तांदुळाच्या शेतीच्या उत्पादनाचा तालुक्यातील भोळवली येथील तरुणांनी केलेला प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना काळ्या तांदुळाची लागवड करण्याची प्रेरणा व मार्गदर्शन भोळवलीतील यशस्वी प्रयोगामुळे उपलब्ध झाले आहे.

आठ गुठे क्षेत्रावर जगातील सर्वाधिक मौल्यवान गणल्या गेलेल्या काळ्या तांदुळाची लागवड यंदा तालुक्यातील भोळवली येथील श्रीकांत कदम, सुनील घाडगे, संदेश सुगदरे, भावेश सुगदरे, शांताराम सुगदरे यांनी तरुणांनी केली होती.

खरीप शेतीचा हंगाम संपला असून या संदर्भात या तरुणांशी संपर्क साधला असता, लागवड केलेल्या शेतीमधून ६० किलो इतका तांदूळ निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या तांदुळाचे प्रत्येक एक किलो इतक्या वजनाचे पँकेट करून त्यांची विक्री सुरू केली आहे. या तांदुळास ५०० रुपये प्रती किलो इतका विक्रमी दर मिळाला असून या तांदुळास बाजारात प्रचंड मागणी आहे.

हे देखिल पहा - 

गरजूंना मार्गदर्शन करणार काळा तांदुळाच्या भात उत्पादनाची बातमी स्थानिक माध्यमांनी उचलून धरलेली असल्याने देशातून व अगदी विदेशातून मालास मागणी असल्याची माहिती उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. आगामी काळात संपूर्ण तालुक्यात काळ्या तांदुळाचे लागवडीचे उत्पादन वाढावे, यासाठी प्रयत्न करून गरजूंना मार्गदर्शन उपलब्ध करून देणार असल्याचे प्रगतशील शेतकरी श्रीकांत कदम तरुणाने सांगितले.

एक दृष्टिक्षेप.. *तालुक्यात शेतकऱ्याना मार्गदर्शन * सुरवातीला आठ गुठ्यांत प्रयोग * या तांदुळाला बाजारात मागणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com