Tribal Poultry Farmer Success : नंदुरबार जिल्ह्यातील मिरची विशिष्ट चव, गंधासाठी प्रसिद्ध आहे. ओल्या लाल मिरचीचा मोठा बाजार नंदुरबारात आहे. मिरचीसह पोल्ट्री, अंडी उत्पादनातही जिल्हा अग्रेसर आहे. अक्कलकुवा, धडगाव या सातपुडा पर्वतांमधील तालुक्यांमध्ये पोल्ट्री व्यवसाय वाढत आहे. देशी व संकरित पक्ष्यांची दोनशेहून अधिक संगोपनगृहे या भागात पाहण्यास मिळतात. या भागात शेतीला बारमाही पाणी देता येत नाही. खडकाळ, माळरानाची जमीन या भागात आहे. .रब्बीचे अल्प या भागात आहे. कारण पाण्याबरोबरच विजेचाही अभाव आहेत. जमीन तीव्र उताराची व हलकी देखील आहे. अशा प्रतिकूल स्थितीत येथील शेतकऱ्यांनी शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. अलीकडे धडगाव हा या व्यवसायाचे क्लस्टर म्हणून पुढे आला आहे. या भागात परसबागेतील कुक्कुटपालनाचे प्रयोग फलदायी ठरत आहेत. अंड्यांसोबत मांसल पक्ष्यांची विक्रीही केली जाते. त्यातून अर्थकारण मजबूत झाले आहे..व्यवसायाचे स्वरूपनंदूरबार भागात जोपासण्यात येणाऱ्या देशी कोंबड्या काटक असून त्यांच्या मरतुकीचे प्रमाण कमी आहे. वर्षभरात प्रति कोंबडी १३० ते १४० पर्यंत अंडी देते. गावरान, दर्जेदार अंड्यांना मोठा उठावही असतो. व्यवसायात स्वतंत्र मजुरीची गुंतवणूक, अधिकचा खर्च करावा लागत नाही. लेअर पोल्ट्रीसाठी आपल्या शेतातील खाद्यासह मक्याचा भरडा, सोयाबीनचा भुसा व अन्य खाद्य आणले जाते. अनेक शेतकरी घर, शेतांत कोंबड्या विहारासाठी सोडतात. धडगाव, तळोदा, अक्कलकुवा, शहादा भागातील दुर्गम क्षेत्रात झोपडीवजा किंवा लाकडांच्या साह्याने उभारलेली मात्र मजबूत संगोपनगृहे आहेत. त्यांची मध्यभागी उंची दहा फूट, तर बाजूला आठ फुटांपर्यंत असते. या गृहांमध्ये तापमान नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. गृहांचा मांजर, श्वान यांच्यापासून बचाव करण्यासाठी तारांच्या जाळ्या लावल्या जातात. पावसाळ्यात वरच्या बाजूस प्लॅस्टिकचा कागद अंथरला जातो. सुमारे १० हजार ते १५ हजार रुपयांत हे संगोपनगृह तयार होते..Desi Poultry Farming : देशी कोंबडीपालनातून उद्योजकता विकास.शासनाचे साह्यशासनाकडून अक्कलकुवा, धडगाव भागातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पोल्ट्रीसाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्पाकडून वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधारभूत असा उपक्रम राबविला आहे. त्यात अंडी उत्पादनासाठी १०० टक्के अनुदानावर ठरावीक वाणाचे ९९ पक्षी देण्यात आले आहेत. मिनी लेअर पोल्ट्रीची यंत्रणाही पुरविली आहे. त्यातून अंडी उत्पादनास मोठे बळ मिळाले आहे..विक्री व्यवस्थाधडगाव परिसरातील १५ हून अधिक गावांमधील अंड्यांची किरकोळ व घाऊक स्वरूपात विक्री केली जाते. बहुतांश शेतकरी परिसरातील हॉटेल, खरेदीदारांना अंडी पुरवितात. धडगाव बाजारासह मोलगी व स्थानिक भागातील ग्राहकांनाही अंड्यांचा थेट पुरवठा होतो. सोमाणा येथील अर्जुन पावरा परिसरातील अंगणवाड्यांना दररोज दोन हजारांपर्यंत अंडी पुरवतात.तसे करार झालेले असतात. त्यातून विक्री- खरेदीची हमी तयार झाली आहे. मागणी अधिक व उत्पादन कमी अशी स्थिती धडगावात आहे. अंडी उत्पादनासाठी पक्ष्यांचा अधिकाधिक उपयोग झाल्यानंतरच त्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. त्यादृष्टीने तळोदा, नंदुरबार, शहादा भागांतील खरेदीदार धडगाव भागात अंड्यांसह चिकनसाठी कोंबडी खरेदीसाठी येतात..वर्षभर मागणी व दर टिकूनगावरान अंड्यांचा घाऊक दर साडेसात रुपये, तर किरकोळ दर १० ते १५ रुपये प्रति नग असा बारमाही असतो. कायम मागणी असल्याने उन्हाळ्यात देखील दर घसरत नाहीत. अंडी विक्रीतून प्रति शंभर कोंबड्यांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्याला प्रति महिना चांगला आर्थिक आधार मिळतो. येथील शेतकऱ्यांच्या आहारातही अंड्यांचा नियमित उपयोग असल्याने कुटुंबाचे पोषण चांगल्या प्रकारे होते..Poultry Farming Success : कष्ट करण्याची जिद्द हवी, नोकरीपेक्षा शेतीच बरी .कडकनाथ, सातपुडा वाणाचेही संगोपनमूळचा मध्य प्रदेशातील झाबुआ, अलीराजपूर भागातील, तसेच जळगाव जिल्ह्यात विस्तार झालेला कडकनाथ हा कोंबडीचा वाण धडगाव भागातील सोमाणा, उमराणी, चोंदवाडा, धनाजे आदी गावांतील शेतकऱ्यांनी आणला आहे. हे वाण पोषक घटकांबाबत अधिक सरस मानले जाते. अनेक रुग्ण त्याची आगाऊ मागणी नोंदवितात. त्यांच्या अंड्यांचा पुरवठा धनाजे व अन्य भागातील शेतकरी शहादा, तळोदा या भागांत करतात. काही भागांत सातपुडा वाणही आहे..चितोड यांचा हातखंडाधडगाव तालुक्यातील मांडवी येथील पवन संजय चितोड यांचा परसबागेतील कुक्कुटपालनात हातखंडा आहे. अंडी व पक्ष्यांच्या थेट विक्रीतून त्यांनी चांगला आर्थिक स्रोत तयार केला आहे. त्यांची पाच एकर शेती डोंगराळ भागात असून ती मुरमाड, हलकी आहे. बारमाही पुरेल एवढा जलस्रोत नसल्याने पावसाळी हंगामावरच मुख्य भिस्त असते. शंभर ते ५० च्या संख्येने ते कोंबड्यांचे संगोपन करतात. परसबागेतील कुक्कुटपालनात खाद्यावरील खर्च कमी आहे. शिवाय कोंबड्यांची प्रतिकारशक्ती, वजनात वाढ, मरतुक कमी आदी लाभही दिसतात.पवन चितोड ७४९९६८५६६०.पावरा, पाडवी आहेत व्यवसायात अग्रेसरसोमाणा (ता. धडगाव) येथील अर्जुन बिलाड्या पावरा सहा वर्षांपासून सोनाली व कावेरी पक्ष्यांचे संगोपन करीत आहेत. त्यांची प्रत्येकी आठशे पक्षी असलेली दोन संगोपनगृहे आहेत. अलीकडे मजबूत, सुधारित संगोपनगृह त्यांनी उभारले आहे. आपल्या पाच एकर कोरडवाहू शेतीला कुक्कुटपालनाची जोड देत कुटुंबाला चांगला आर्थिक आधार दिला आहे. विविध संस्थांना ते पक्ष्यांचा पुरवठा करतात. सुरवाणी (ता.धडगाव) येथील सुहास पाडवी यांच्याकडे शंभरहून अधिक देशी पक्षी आहेत. त्यांचीही पाच एकर कोरडवाहू शेती आहे. अंडी व पक्षी यांची विक्री ते करतात.अर्जुन पावरा ९०२२२८०२५३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.