Poultry Business Success : नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर मात्र संगमनेर तालुक्यात (जि. अहिल्यानगर) देवकौठे गाव वसले आहे. दुष्काळी पठारी अशी परिसराची ओळख आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची कायम टंचाई असते. त्यामुळे शेती कोरडवाहू स्वरूपाची असते. त्यामुळे शेतीला बळकट आधार म्हणून गावातील एकनाथराव मुंगसे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी खाजही कंपनीसोबत करार शेती करून लेअर पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. अन्य शेतकऱ्यांनाही व्यवसायाची प्रेरणा मिळाली. सन २०१२ च्या सुमारास याच व्यवसायाच्या आधारे जगदंबा शेतकरी गटाची स्थापना गावातील पोल्ट्री उत्पादक राजेंद्र कहांडळ यांनी केली. .तत्कालीन तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, ‘आत्मा’चे तालुका समन्वयक वैभव कानवडे यांची त्यासाठी मदत झाली. तेरा वर्षांच्या कालावधीनंतर गटाचे पुढील पाऊल म्हणून कृषीस्नेह शेतकरी कंपनीची मागील वर्षी स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष कहांडळ असून गटाचे अध्यक्ष म्हणून अशोक मुंगसे यांच्याकडे जबाबदारी आली आहेत. सुभाष शेवकर, सतीश कहांडळ, तुकाराम कहांडळ, नवनाथ गुडघे, सुदाम कुरकुटे, शत्रुघ्न मुंगसे, निवृत्ती मुंगसे, आकाश मुंगसे, योगेश सांगळे, दत्तु आरोटे, राजेंद्र कहांडळ, ज्ञानेश्वर कहांडळ, शरद जोशी हे गटाचे सभासद आहेत. गटाच्या प्रेरणेतून गावात अजून तीन शेतकरी गट स्थापन झाले आहेत..Layer Poultry Business : तपश्चर्येतून विस्तारलेला मराठवाड्यातील लेअर पोल्ट्री व्यवसाय.पोल्ट्री उत्पादनातील शेतकरी गटजगदंबा गटातील शेतकऱ्यांकडे पाच हजारांपासून ते पन्नास हजार लेअर पक्षिक्षमतेचे फार्म आहे. गटाचे संस्थापक कहांडळ यांचा सुमारे ३५ हजार पक्ष्यांचा फार्म आहे. ते म्हणाले, की आमचे गावच पोल्ट्री व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. गावात सुमारे दीडशेच्या दरम्यान पोल्ट्री फार्म असावेत. त्या माध्यमातून दिवसाला सुमारे साडेसहा लाखांच्या दरम्यान अंडी उत्पादन होते. पैकी आमच्या गटातील पंधरा शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिवसाला दीड लाख अंड्यांचे उत्पादन होते. गुजरात, सुरत, वापी, जळगाव, भुसावळ, मुंबई आदी ठिकाणी आमच्या पोल्ट्रीमधील अंडी पाठवली जातात. त्यातून हमीची व हक्काची बाजारपेठ तयार झाली आहे. गावातील तरुण मुलेच व्यापारात उतरली असून, सुमारे २५ पर्यंत मालवाहू वाहने गावात दिसून येतात. गटातील ज्ञानेश्वर कहांडळ या तरुणाने कोइमतूर येथे अंडी उत्पादनासंबंधीचे प्रशिक्षण घेतले आहे. तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला यश मुंगसे हा तरुणही पूर्णवेळ याच व्यवसायात उतरला आहे. पक्षिसंगोपनसाठी पिल्लांच्या पुरवठ्यासाठी गटाने दोन आघाडीच्या कंपन्यांसोबत करार केले आहेत..अर्थकारणवर्षातील काही काळ, सण वगळता अंड्यांना बाराही महिने मागणी असते. दर मात्र सतत अस्थिर राहतात. तरीही प्रति नग ३.७० ते कमाल साडेसहा तर सरासरी दर साडेचार ते पाच रुपये मिळतो. गटातील शेतकऱ्यांची मिळून दररोजची काही लाखांची तर वर्षाला काही कोटींची उलाढाल होते. गटातील एकूण पक्षांचा विचार करता महिन्याला एक हजार टनांहून अधिक खाद्य लागते. ते सुरुवातीला बाहेरून आणले जायचे. आता मात्र प्रत्येक शेतकऱ्यांने स्वतःचेच खाद्यनिर्मिती युनिट सुरू केले आहे. त्यासाठी लागणारा मका याच भागातील शेतकऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी करण्यात येतो. कोंबडीखतालाही मोठी मागणी आहे. वर्षाला ५० किलो वजनाच्या सुमारे १७०० च्या आसपास गोण्या मिळतात. प्रति किलो ४ ते ५ रुपये दराने त्याची विक्री होते. केवळ या खतातून जगदंबा शेतकरी गटातील शेतकरी काही लाखांची स्वतंत्र उलाढाल करतात..मजुरांना रोजगारमागील वर्षापासून गावाला निळवंडे धरणाचा लाभ होऊ लागला आहे. तथापि, हा दुष्काळीच भाग आहे, पूर्वी रोजगाराचा प्रश्न असल्याने भागातील लोक संगमनेर व अन्य भागात स्थलांतरित व्हायचे. आता पोल्ट्री व्यवसायातून गावातच रोजगार मिळाला आहे. जगदंबा गटातील शेतकऱ्यांकडे सत्तरहून अधिक मजूर कार्यरत आहेत. मध्य प्रदेशातील सुमारे साडेतीनशेपर्यंत मजुरांना गावात या व्यवसायासाठी रोजगार मिळाला आहे..Automatic 'Layer Poultry Farm' : मराठवाड्यात आधुनिक, स्वयंचलित ‘लेयर पोल्ट्री फार्म’.कोरोनात सावध भूमिकेने नुकसान टाळलेकोरोना काळात चिकन आणि अंडी खाण्याबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आले होते. त्याचा परिणाम अंडी विक्रीवर मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्या वेळी जगदंबा गटासह गावांतील पोल्ट्री उत्पादकांनी सावध भूमिका घेत अंड्यांची चांगल्या प्रकारे साठवणूक केली. जसजसे गैरसमज दूर होऊ लागले तसतशी अंड्यांना मागणी वाढू लागली. त्या वेळी प्रति नग साडेसहा रुपयांपर्यंत दरही साध्य झाला. पोल्ट्री उत्पादकांना त्याचा फायदा झाला असे गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव कहांडळ यांनी सांगितले..एकमेकां साह्य करूजगदंबा गटातील सदस्यांनी स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येकी पाचशे रुपये प्रति महिन्याला बचत केली. दोन हजार रुपये प्रत्येकी भागभांडवल (शेअर) जमा केले. त्यातून गरज असणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के व्याजदराने पोल्ट्री उभारणीसाठी रक्कम दिली. भागभांडवलातून रक्कम देण्यासाठी सुरुवातीला प्रति व्यक्ती दहा हजारांची मर्यादा होती. आता पाच लाखांपर्यंत ती दिली जाते. गटाकडे आजमितीला ४५ लाखाचे भागभांडवल जमा झाले आहे. पोल्ट्री व्यवसायाच्या विस्ताराला या रकमेची मोठी मदत झाली. गटातील शेतकऱ्यांनी बॅंकाकडून कर्ज न घेता याच रकमेतून विस्तार केला आहे. सुरुवातीला बॅंका गटाला कर्ज देण्यास धजावत नव्हत्या. आता गटातील सदस्यांची बॅंकेत चांगली पत तयार झाली आहे. अर्थात, एकमेकां साह्य करू या तत्वावरच गटाने प्रगती साधली आहे.राजेंद्र कहांडळ ९८२२१०८६६८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.