कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी संत सावंता माळी यांच्या अभंगातील या ओळी भाजीपाला शेतीलाच देव मानलेल्या शेतकऱ्याच्या भावना प्रकट करतात. कवलापूर (जि. सांगली) येथील माळी कुटुंबाने अनेक वर्षांपासून किमान १० गुंठ्यांत माठ, पालक, चाकवत आदींच्या लागवडीत सातत्य ठेवले आहे. वर्षभर किमान सातजणांचे कुटुंब सुरळीत चालू शकेल एवढे उत्पन्न देण्याची या पिकांत क्षमता असल्याचे या शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. . सांगली जिल्ह्यात सांगली तासगाव राज्यमार्गावर वसलेले कवलापूर हे गाजरांसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. भाजीपाला पिकांसाठीही गावाने ओळख तयार केली आहे. ऊस, द्राक्ष हीदेखील गावची पिके आहेत. गावातील (जखीणमळा) येथे राजेंद्र पुंडलिक माळी, महादेव बाळू माळी आदी भाजीपाला उत्पादक राहतात. या कुटुंबाचा मोठा परिवारच आहे. कुटुंबातील वाडवडिलांनी कष्ट करून या भागात सुमारे २५ एकर शेती खरेदी केली. अनेक वर्षांपासून त्यांनी भाजीपाला लागवडीत सातत्य व चिकाटी ठेवली आहे. ती अशा अर्थाने की शेती बदलत गेली. आव्हानं वाढली. तरी प्रत्येक कुटुंब किमान १० गुंठ्यांत भाजीपाला घेताना दिसतो आहे. कुटुंब विस्तारले तरी प्रत्येक घरातील चार पिढ्या भाजीपाल्याच्या शेतीला जोडले गेले आहेत. भाजीपाला उत्पादकांचे अनुभव भाजीपाला हाच पर्याय शेतकऱ्यांच्याच शब्दात सांगायचे तर जखीणमळ्यात पाणी सवळ म्हणजे क्षारयुक्त आहे. यामुळे दुसरे पीक वटत नाही. दावणीला जनावरं असल्याने चाऱ्यासाठी किमान पाच एकरांवर वैरण असते. यामुळे घरच्या घरीच चारा उपलब्ध होतो. जमिनीची स्थिती पाहाता भाजीपाला हाच मुख्य पर्याय असतो. घरातील सदस्यांचे कष्ट भाजीपाला म्हटलं की वेळेत काढणी आली. तरच बाजारपेठेत चांगला दर मिळतो. या कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र घरातील सर्व सदस्य राबून कामे वेळेत करतातच. शिवाय मजुरी खर्चात बचत करतात अस सौ. शोभा माळी सांगतात. मार्केटचा अभ्यास महत्त्वाचा ऋषिकेश माळी म्हणाले, की मी शेती विषयातील शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतात राबण्यातून प्रात्यक्षिकाचाही आनंद मिळतो. विक्रीचीही जबाबदारी सांभाळतो. दर सातत्याने बदलत असल्याने सांगली येथील शिवाजी मंडईत दररोज सकाळी जावेच लागते. मंडईत गेल्याने कोणत्या भाजीला किती मागणी आहे, दर काय आहेत याचा पूर्ण अंदाज येतो. त्यानुसार त्या भाजीची निवड केली जाते. म्हणूनच अपेक्षित दर मिळण्यास मदत होते.
लागवडीचे नियोजन
विक्रीचे नियोजन
बाजारपेठ
दहा गुंठ्यांतील अर्थशास्त्र
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.