ऊस उत्पादनाचा गाठला एकरी १३० टनाचा टप्पा

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील अमर पाटील यांनी धडपड, प्रयोगशीलता, शिकाऊ वृत्ती, सातत्य, चिकाटी व उत्कृष्ट तंत्रज्ञान व्यवस्थापन यामधून ऊस शेतीत मास्टरी मिळवली आहे. एकेकाळी एकरी ४० टनांपर्यंत असलेले उत्पादन १३० टनांपर्यंत पोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत.आता एकरी १५१ टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन त्यांचे व्यवस्थापन सुरू झाले आहे.
अमर पाटील यांची या वर्षीची आडसाली ऊस लागवड. फुटवे व जाडी नजरेत भरणारी आहे
अमर पाटील यांची या वर्षीची आडसाली ऊस लागवड. फुटवे व जाडी नजरेत भरणारी आहे

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील अमर पाटील यांनी धडपड, प्रयोगशीलता, शिकाऊ वृत्ती, सातत्य, चिकाटी व उत्कृष्ट तंत्रज्ञान व्यवस्थापन यामधून ऊस शेतीत मास्टरी मिळवली आहे. एकेकाळी एकरी ४० टनांपर्यंत असलेले उत्पादन १३० टनांपर्यंत पोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत. आता एकरी १५१ टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन त्यांचे व्यवस्थापन सुरू झाले आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी हे पूर्वीच्या काळात कोरडवाहू असलेले गाव सिंचन योजना व विहीरी या स्त्रोतांमुळे बागायत बनले आहे. ऊस हे या भागातील मुख्य पीक. त्याचबरोबर रताळी, भाजीपाला पिकांसाठीही हा परिसर ओळखला जातो. पाटील यांची प्रयोगशीलता गावातील अमर तात्यासाहेब पाटील हे पट्टीचे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांचे वडील व दोन चुलते यांची एकत्रित जवळपास ३८ एकर शेती आहे. जमिनीचे क्षेत्र जास्त असले तरी उत्पन्न कमी होते. काही जमिनी पडीक होत्या. अमर यांनी बारावीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पडीक जमिनींची उत्तम मशागत करून लागवडीयोग्य बनवल्या. एकत्र कुटुंबातील तीन विहिरींची खोदाई केली. पाणीस्त्रोत वाढवले. पाइपलाइन, संपूर्ण क्षेत्रात ठिबक ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली. ऊसशेती सुरू झाली. पूर्वीच्या काळात या जमिनीत एकरी ३० ते ४० टनच ऊस पिकायचा. अमर परिसरातील कै. राजारामबापू सहकारी ऊस कारखान्याच्या संपर्कात आले. त्यातून शास्त्रीय दृष्टया व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन मिळाला. मग प्रयोगांची गोडी वाढली. मग व्यवस्थापनात बदल करीत, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत एकरी ६० ते ६५ टन व पुढे ९० ते ९५ टन उत्पादनापर्यंत मजल मारली. अलीकडील काही वर्षांत एकरी १२० टन उत्पादनाचा टप्पा ओलांडण्यात ते यशस्वी झाले आहेत. ऊस व्यवस्थापनातील ठळक बाबी

  • अमर उसाचा खोडवा ठेवतात. पण तो तुटल्यानंतर पुन्हा ऊस असे ते कधीच करीत नाहीत.
  • त्यावर हळदीची फेरपालट करतात. हळदीचेही ते एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात.
  • हळदीचे पीक निघाल्यानंतर जेवढे उसाचे क्षेत्र आहे तेवढ्या भागात ताग किंवा ध्यैंचा (४ ते ५ एकर) घेण्यात येतो. त्यावर रोटावेटर फिरवला जातो.
  • एकरी २५ टन कंपोस्ट विस्कटले जाते. तीन टन कोंबडी खत व कारखान्याची राख (सिलीकॉनसाठी) दोन टन विस्कटली जाते.
  • पुन्हा नांगरट, सरी सोडून रान तापवले जाते.
  • जूनचा पहिला आठवडा किंवा मेच्या अखेरच्या आठवड्यात लागवड केली जाते. -
  • दहा महिन्याचे निवडक बियाणे वापरतात. बेणे प्रक्रीया करतात.
  • एक डोळा पद्धतीने लागवड. दीड फुटावर एक डोळा
  • बेसल डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट सहा बॅग्ज, पोटॅश २, ह्युमिक ॲसिड ५ किलो, मँगेनिज २५ किलो, हुमणीला रोखण्यासाठी दाणेदार कीटकनाशक ५ किलो, निंबोळी पेंड २ बॅग
  • ३० ते ३५ दिवसांनी युरिया दोन पोती
  • महिन्याने तुटाळी भरून घेतात.
  • ४५ ते ४७ दिवसांनी पुन्हा खतांचे व्यवस्थापन
  • वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) शिफारसीत नत्र, स्फुरद, पालाश विरघळवणाऱ्या जीवाणूखतांचा वापर
  • पुढे भरणीच्या वेळी सिंगल सुपर फॉस्पेट, युरिया, जोडीला ह्युमिक, झिंक, फेरस, बोरॉन, गंधक, मँगेनीज तसेच संजीवकांचाही शिफारसीप्रमाणे वापर
  • मिळालेले उत्पादन (एकरी)

  • सन २००७-०८- १०९ टन
  • २०१३-१४ - १२२ टन
  • (‘व्हीएसआय’ चा पुरस्कार)
  • मागील वर्षी- सुमारे १२२ टन
  • यंदाचे उत्पादन- १२९ टन ९६४ किलो- (सुमारे १३० टन)
  • सध्या एकरी १५१ टन उत्पादनाचे टार्गेट असलेला प्लॉट शेतात उभा आहे.
  • खोडवा उत्पादन- ९० टनांपर्यंत
  • हळद साडे चार फुटी गादीवाफा. झिगझॅग पद्धतीने लागवड यंदा एकरी २७. ४१९ क्विंटल उत्पादन रताळी येडेनिपाणी परिसर रताळ पिकाचे आगर आहे. जून महिन्यात लागवड होते. दसऱ्याच्या कालावधीत असलेली मागणी लक्षात घेऊन नियोजन केलेले असते. त्या दरम्यान पीक काढणीस येते. एकरी ८ ते ९ टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यास किलोला १२ ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळतो. अमर यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी परिसरातील अनुभवी शेतकऱ्यांकडील चांगल्या बेण्याची निवड
  • उसात शक्यतो आंतरपीक घेणे टाळले जाते. मात्र घरगुती वापरासाठी भुईमूग किंवा अन्य पिकांची थोडक्या क्षेत्रात लागवड.
  • वेळोवेळी माती परीक्षण. मातीचा सेंद्रिय कर्ब ०.७ टक्के आहे.
  • दोनवेळा पाचट काढले जाते. त्याची कुट्टी करून वापर होतो.
  • प्रयोगशीलतेचा गौरव ऊस शेतीतील धडपड व सातत्याने केलेले प्रयत्न यांची दखल घेत अमर यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘व्हीएसआय’ संस्थेचा २०१३-१४ चा, तसेच २०१२-१३ वर्षाचा राजारामबापू कारखान्याचा ऊस भूषण तर २०१५ चा शासनाचा वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. अमर यांना प्रगतिशील व प्रसिद्ध ऊस उत्पादक संजीव माने, एस. एन. पाटील, विश्‍वास सहकारी कारखाना येथे अधिकारी असलेले नातेवाईक संदीप पाटील, विजय जाधव, जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी, तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. संपर्क- अमर पाटील- ९९७०६७५००७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com