उरुण इस्लामपूर (जि. सांगली) येथील सिद्धांत शंकरराव जाधव या अभियंता तरुणाने नोकरीच्या पाठीमागे न लागता स्पिरुलिना शेवाळापासून टॅब्लेटस निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. आॅनलाईन पद्धतीने त्याला पाच ते सहा राज्यांत बाजारपेठ मिळवण्यातही जाधव यशस्वी झाले आहेत. आजच्या काळात प्रथिनयुक्त आहाराला असलेली मागणी लक्षात घेऊन त्यानुसार व्यवसायाची आखणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. उरुण इस्लामपूर (जि. सांगली, ता. वाळवा) येथील सिद्धांत जाधव यांच्या कुटुंबाची सुमारे २५ एकर शेती आहे. मात्र, पाण्याअभावी त्याकडे फारसे लक्ष देणे त्यांना शक्य दिलेले नाही. जाधव यांचा इस्लामपूर येथे मंगल कार्यालयाचाही व्यवसाय आहे. सन २०१५ मध्ये त्यांनी ‘बीई मॅकेनिकल’ ही पदवी घेतली. घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असल्याने याच क्षेत्रात काहीतरी करावे असे ठरवले होते. अनेक पर्याय शोधून पाहिले. पाॅंडेचेरी परिसरात स्पिरुलीना शेवाळाची शेती त्यांच्या पाहण्यात आली. प्राथमिक माहिती व अधिक अभ्यास करून या व्यवसायात उतरण्याचे ठरवले. व्यवसायाची पूर्वतयारी स्पिरुलीना ही शेवाळवर्गीय वनस्पती आहे. तिच्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. प्रक्रिया करून ती वाळवून पावडर तयार करायची व त्याच्या टॅब्लेटस बनवून विक्री करायची असे व्यवसायाचे मुख्य स्वरूप होते. उत्पादनाला सुरवात करण्यापूर्वी बाजारपेठांचाही अभ्यास केला. उत्पादन कसे तयार होते?
मार्केटिंग व विक्री
बाजारपेठ होती आव्हानाची बाब सिद्धांत म्हणाले, की निर्मिती माझ्या हातातील गोष्ट होती. परंतु, बाजारपेठ निर्माण करणे कष्टाचे व जिकिरीचे होते. मात्र प्रयत्नपूर्वक व सातत्याने काम करून हे आव्हान पेलले. या उत्पादनासाठी सुशिक्षित वर्ग हा ग्राहक म्हणून नजरेसमोर ठेवला. उत्पादनांविषयी सविस्तर माहिती घेत त्याचा दर्जा चांगला ठेवण्यावर भर दिला. हळूहळू ‘मार्केटींग’ वाढवले. काही ठिकाणी ‘कमीशन बेसीस’वर तरुणांची नेमणूक केली. घरोघरी जाऊन ते विक्री करतात. व्यवसायाची ठळक वैशिष्ट्ये
संपर्क- सिद्धांत जाधव- ७५०७५१६००६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.