सूर्यकांत नेटके राजूर (ता. अकोले, जि. नगर) येथे ५८ वर्षांपासून डांगी जनावरांचे प्रदर्शन भरविले जाते. या प्रदर्शनामुळे डांगी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी हक्काचा बाजार उपलब्ध झाला. प्रदर्शनात नगर, नाशिक, पुणे, पालघर, ठाणे जिल्ह्यांमधील आदिवासी पशुपालक सहभागी होतात. जातिवंत डांगी गोवंशासाठी या बाजारपेठेला भेट दिलीच पाहिजे. अकोले तालुक्यात (जि. नगर) साधारण पंचेचाळीस गावांत तसेच नाशिक, पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यांमधील काही तालुक्यांत आदीवासी शेतकरी आहेत. या भागात दरवर्षी जोरदार पाऊस पडतो. या पावसात शेतीकामासाठी केवळ डांगी बैल उपयोगी ठरतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडे डांगी बैलजोडी दिसते. डांगी जनावरांचे जतन, संवर्धन करण्यासाठी राजूर (ता. अकोले) ग्रामपंचायत आणि डांगी गोसेवा संघाने १९६१ मध्ये डांगी जनावरांचे प्रदर्शन सुरू केले. या प्रदर्शनात डांगीमधील काळा, बाळा, काळा-बाळा, ढवळा, लाल्या हे उपप्रकारदेखील पहावयास मिळतात. प्रदर्शनातूनच जातिवंत जनावरांची खरेदी- विक्रीही सुरू झाली. पहिल्या प्रदर्शनात साधारण दोन ते तीन हजार जनावरे आली होती. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. गेल्या दहा वर्षापासून जनावरांची संख्या वाढली. यंदा ५० हजारांच्या जवळपास जनावरे प्रदर्शनात आली होती. साधारण दहा वर्षापासून माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड या प्रदर्शनासाठी मदत करत आहेत. यंदा जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे दीड कोटींची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरुण आभाळे यांनी दिली. स्पर्धेतून मिळते प्रोत्साहन
डांगी गोवंशाला मागणी
वर्ष | जनावरांची खरेदी | विक्री उला ढाल (रुपये) |
२०१६ | १०८० | ८८ लाख ७८ हजार |
२०१७ | ५२९ | ५० लाख २२ हजार |
२०१८ | ७९५ | ६१ लाख १३ हजार |
२०१९ | ५१५ | ८० लाख २३ हजार. |
प्रदर्शनातील यंदाची स्थिती
जनावरांचे यंदाचे दर
देशी बियाण्यांबाबत जागृती
शेतकरी प्रतिक्रिया- डांगी जनावरांच्या संवर्धनासाठी अदात, दोन दाती, चार दाती, सहा दाती, आठ दाती, बैलजोडी, गाभण गाय, दुभती गाय, कालवड यांच्या स्पर्धा घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. बक्षिसापोटी एक लाख बारा हजार रुपयांची बक्षिसे दिली जातात. प्रदर्शनाच्या निमित्ताने सहभागी लोकांची संख्याही मोठी असते. - बाळासाहेब आंबरे, (ग्रामसेवक, राजूर, जि. नगर) अनेक वर्षांपासून आम्ही प्रदर्शनात सहभागी होत असतो. आदिवासींचा सांस्कृतिक मेळावा आणि डांगी जनावरांचे जतन व्हावे यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना डांगी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. - गंगाराम धिंदळे (शेतकरी, शिरपुंजे, जि. नगर) अकोले तालुक्यासह शेजारच्या जिल्ह्यामधील शेतकरी प्रदर्शनात डांगी जनावरे घेऊन येतात. प्रदर्शनाच्या निमित्ताने जनावरांची खरेदी-विक्री आणि स्पर्धादेखील होते. या प्रदर्शनासाठी दरवर्षी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर आणि पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, नगर यांचे चांगले सहकार्य मिळते. - गोकूळ कानकाटे, ९९७०४५६४१४ (उपसरपंच, राजूर, जि. नगर) संपर्क- अकोले बाजार समिती, ०२४२४-२२२१५४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.