स्पेनमधील मुर्सिया प्रांतातील रंगीत ढोबळी मिरचीच्या एका प्लॉटने ‘प्रिसिजन फार्मिंग’(काटेकोर शेती) प्रत्यय दिला. सुमारे सात हेक्टर क्षेत्रात संबंधित शेतकऱ्याने मल्टिटनेल व पारंपरिक अशा दोन्ही स्ट्रक्चर्समधील पॉलिहाउसेस उभारली आहेत. जाणवलेली ठळक निरीक्षणे
काटेकोर व्यवस्थापन - ठळक बाबी
सूर्यप्रकाश मोजूनच देतात प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या मोजून मापून केली जाते. मिरचीला सूर्यप्रकाश किती देता असा प्रश्न दौऱ्यात सहभागी गणेश मोरे यांनी विचारला. त्यावर पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार ३००० ते ३५०० लक्स तीव्रतेचा सूर्यप्रकाश दिला जातो. तो दिवसातले १२ तास मिळतो असे चर्चेतून निष्पन्न झाले. (स्पेनमध्ये दिवस खूप मोठा असतो. भारतात सहा वाजता होणारी संध्याकाळ स्पेनमध्ये रात्री १० वाजता होते.) मोरे यांनी आपल्या मोबाईलमधील ॲपद्वारे सूर्यप्रकाश तत्काळ मोजून पाहिला. तो १८०० ते २००० लक्स आढळला. वजनदार मिरची इथल्या प्लाॅटमधील रंगीत मिरची आकाराने मोठी, आकर्षक लाल व वजनदार होती. त्यात पोकळपणा कुठेही नव्हता. प्रत्येक मिरचीचे वजन २०० ते ३०० ग्रॅमपेक्षा कमी नसावे असाच सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला. पाण्याचे व्यवस्थापन सुधारावे लागेल गणेश मोरे म्हणाले की इथले शेतकरी पीक फार जोमाने वाढू देत नाहीत असे दिसले. अन्यथा फळे लागत नाहीत. ‘फ्रूट सेंटिंग’नंतर नत्राची गरज भासली तरच काही प्रमाणात पोटॅशियम नायट्रेट देतात. पाण्याचा पीएच ८ आहे. मात्र साडेसहा पीएच असलेले पाणी वापरतात. नायट्रिक ॲसिडचा वापर करून पीएच कमी केला जातो. आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत सुधारण्याची गरज आहे. मित्रकीटक ठरले रसायनांनाही भारी कीड नियंत्रणात व्यावसायिक मित्रकीटकांचा वापर हे स्पेनच्या ‘रेसिड्यू फ्री’ शेतीचे खरे रहस्य आहे. मिरचीचा हा प्लॉटही त्याला अपवाद नव्हता. पुढील भागात त्याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी हा रंजक किस्सा पाहूया. या फार्मचे कंसल्टंट म्हणाले, की १९८७-९० च्या दरम्यान या भागात थ्रिप्सचा (फुलकिडे) प्रचंड उद्रेक झाला. आठवड्याला होणारी रासायनिक फवारणी दिवसातून दोन वेळा करण्यापर्यंत वेळ आली. तरीही कीड आटोक्यात येईना. रसायनांचा अतिवापर करण्यारा भाग म्हणून आमचे नाव खराब होत होते. अखेर रसायनांचा वापर हे थ्रिप्स कंट्रोलवरचे उत्तर नाही. शाश्वत पर्यायच शोधावा लागेल याची जाणीव झाली. त्यातून मिळाला मित्रकीटकांचा पर्याय. ते रसायनांनाही भारी पडले. त्यांनी काम फत्ते करण्यास सुरवात केली. थ्रीप्स, मावा, पांढरी माशीदेखील नियंत्रणात येऊ लागली. आता थ्रिप्सच्या समस्येतून आमची सुटका झाल्याचे सांगताना कंसल्टंटच्या चेहऱ्यावर विजयश्री मिळवण्याचा भाव उमटला होता. ते म्हणाले की जितक्या जास्त प्रमाणात रसायने वापराल तेवढ्या अधिक समस्या तयार होतील. पूर्वी रसायनांचा खूप वापर करायचो, तेव्हा पक्षीही नजरेस पडायचा नाही. आता ते मुक्तपणे विहार करतात हेच आदर्श शेतीचे लक्षण आहे. रस्ते - देशाच्या प्रगतीची वाहिनी
संपर्क- मंदार मुंडले- ९८८१३०७२९४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.